29 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeसोलापूरगळफास लावून तरुणाची आत्महत्या

गळफास लावून तरुणाची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

सोलापूर : अज्ञात कारणावरून एका ४० वर्षीय इसमाने किचन रूममध्ये नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भवानी पेठेत शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली. मनोज उमाकांत कस्तुरे (४०, रा. भवानी पेठ) असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. मयत व्यक्तीच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर किचन रूमचे बांधकाम चालू होते.

किचन रुममधील छताच्या लोखंडी हुकला मनोज कस्तुरे यांनी गळफास घेतल्याचे शनिवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास कुटुंबीयांच्या निदर्शनास आली तेव्हा
नातेवाइकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे शिपाई नितीन भोगशेट्टी यांनी नातेवाइकांच्या मदतीने खाली उतरवून त्यांना बेशुध्द अवस्थेत छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या