25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeसोलापूरगणेश विसर्जनादरम्यान युवकाचा बुडून मृृृत्यू

गणेश विसर्जनादरम्यान युवकाचा बुडून मृृृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : वीज महामंडळ म्हणजेच महावितरण मध्ये तंत्रज्ञ या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा श्री गणेश विसर्जनादरम्यान विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना विमानतळ परिसरातील हत्तुरे वस्ती येथे घडली.

विजय भीमाशंकर पनशेट्टी (वय 32 वर्ष, रा, हतुरे वस्ती, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने हतुरे वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे. मयत विजय पनशेट्टीला चार वर्षांचा मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी विजयच्या पत्नीने देखील आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.
आपल्या आई वडिलांसोबत विजय आपल्या चार वर्षीय मुलाचा सांभाळ करत होता. महावितरणमध्ये ड्युटी करत मुलाचा सांभाळ करत असल्याचे पाहून आजूबाजूचे शेजारी विजयचं कौतुक करत होते. पण आता विजय पनशेट्टी गणेश विसर्जनादरम्यान मृत झाल्याने चार वर्षीय मुलाचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न पडला आहे. त्यामुळेच हळहळ व्यक्त होत आहे.

सोलापूर शहरातील हतुरे वस्ती येथे विजय पटशेट्टीने आपल्या मित्रांसोबत विश्वविनायक हरी ओम गणेश मंडळ स्थापन केले होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीचे निर्बंध असल्याने गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल झाल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. विजय हा या गणेश मंडळाचा अध्यक्ष होता. ९ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास टिकेकरवाडी येथील एका विहिरीत विजय आपल्या मंडळासोबत मिरवणूक काढत गणेश विसर्जनासाठी गेला होता. गणेश मूर्ती घेऊन विहिरीत गेला आणि मूर्तीसोबत विजय देखील बुडाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्यात आला पण विजय पनशेट्टी सापडला नाही. शनिवारी पहाटेच्या सुमारास जीवरक्षक व पोलिसांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.

पत्नीची कौटुंबिक वादातून आत्महत्या, त्यात तणाव विजय पनशेट्टी हा महावितरण मध्ये गेल्या दहा वर्षांपासून तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होता. सोलापूर शहरातील गुरुनानक चौक येथील कार्यालयात त्याची नियुक्ती होती. त्याने पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, आई वडील असा त्याचा परिवार होता. कौटुंबिक वादातून पत्नीने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.

तेव्हापासून विजय मानसिक तणावात होता, पण चार वर्षीय मुलाने विजयचे सर्व मानसिक ताण हलके केले होते. गेल्या दोन वर्षांपासून विजय आई वडील व मुलगा हतुरे वस्ती येथे राहत होते. ड्युटी करून मुलाचा सांभाळ करण्यात तो नेहमी व्यस्त असायचा. पण गणेश विसर्जनादरम्यान विजयचा मृत्यू झाल्याने चार वर्षीय मुलगा पोरका झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या