23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeसोलापूरविनयभंगाच्या आरोपातून तरुणास अटकपूर्व जामीन

विनयभंगाच्या आरोपातून तरुणास अटकपूर्व जामीन

एकमत ऑनलाईन

सोलापूर : म्हैसलगी, ता अक्कलकोट येथे ३१ मार्च २०२२ रोजी एका विवाहित महिलेचा विनयभंग केला व तिला मारहाण केली या आरोपावरून विश्वास देसाई या म्हैसलगीच्या तरुणाविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. त्याने केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता.

सदर निर्णयाविरुद्ध आरोपीने अ‍ॅड. जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर होऊन न्यायमूर्तीींनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

सदर महिलेचा पती व दीराविरोधात आरोपीच्या भावाने अ‍ॅट्रॉसिटीची केस दाखल केलेली होती. त्या फिर्यादीस शह देण्यासाठी आरोपीस या खटल्यात खोटेपणाने गुंतवण्यात आले आहे असा आरोपी पक्षाचा बचाव होता. या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे अ‍ॅड. जयदीप माने, अ‍ॅड. विलासिनी बालसुब्रमण्यम यांनी तर सरकारतर्फे अ‍ॅड. एस. व्ही. गावंड यांनी काम पाहिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या