24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeसोलापूरअनैतिक संबंधांच्या संशयावरून तरूणाचा खून

अनैतिक संबंधांच्या संशयावरून तरूणाचा खून

एकमत ऑनलाईन

माळशिरस : कुसमोड (ता. माळशिरस) येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून झाला आहे. ही घटना शनिवार दि. ६ रोजी रात्री घडली आहे. विकास सोपान वाघमारे (३७) रा. कुसमोड असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत विकास सोपान वाघमारे हा त्याच्या रा हत्या घरातून विहिरीवर विद्यूत मोटार चालू करण्यासाठी रात्री ८ च्या सुमारास गेला होता.

बराच वेळ उलटून गेला तरी विकास परत आला नाही म्हणून पत्नीने फोन केला. फोनची रिंग वाजत होती, मात्र फोन उचलला जात नव्हता. दरम्यान विकास वाघमारे यांचा खून झाला असल्याची बातमी शिवारात पसरली. जवळपास च्या नागरिकांनी पोलिस चौकीला फोन वरून कळविल्याप्रमाणे माळशिरस तालुका पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी पोलिस उपनिरीक्षक शशिकांत शेळके, हवालदार सतीश नाही, धुमाळ, दत्तात्रय खरात, अमित जाधव यांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी रितसर पंचनामा करून डेडबॉडी माळशिरस येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आहे. पोलिसांनी झिजेवस्ती येथील दोघा संशयिताना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मयत विकासच्या पश्चात पत्नी, आई एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या