22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeसोलापूरसोलापूरात युवकाचा गळा आवळून खून

सोलापूरात युवकाचा गळा आवळून खून

एकमत ऑनलाईन

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ तांड्यातील ३९ वर्षीय युवकाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. संजय भुताळी पुजारी (रा. नाईक नगर तांडा, वडकबाळ, ता. दक्षिण सोलापूर) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. खुनामागील नेमके कारण समजू शकले नाही.

मृताचा भाऊ कन्नप्पा भुताळी पुजारी याने मंद्रुप पोलिस ठाण्यात या घटनेची फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अज्ञात इसमाने त्याच्या कपाळावर आणि कानावर लाकडी फळीने जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर दोरीने त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगीतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या