32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeसोलापूरजि.प. च्या वरिष्ठ अधिका-याला कोरोनाची लागण

जि.प. च्या वरिष्ठ अधिका-याला कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

सोलापूर : जिल्हापरिषदेच्या वरिष्ठ अधिका-याला कोरोनाची लागण झाल्यामुळे मुख्यालयात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ अधिका-याला कोरोनाची लागण झाल्यामुळे अनेक कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत. शहर परिसरात शनिवारी कोरोना संसर्गाने उपचारादरम्यान चौघांचा तर ग्रामीण परिसरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत जि.प. च्या आरोग्य विभाग आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकूण 255 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दोन हजार 197 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी दोन हजार 642 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 255 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. याबरोबरच आज पुन्हा एकदा नऊ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. सलग दुस-या दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे आजच्या अहवालावरून स्पष्ट होते.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 10 हजार 871 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 317 एवढी झाली आहे. अद्यापही रुग्णालयात दोन हजार 902 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी गेलेल्यांची संख्या सात हजार 652 एवढी झाली आहे. अक्कलकोट तालुक्­यातील किणीवाडी, सतलापूर, मैंदर्गी, शिवाजीनगर तांडा, बार्शीतील अलीपूर रोड, बारंगुळे गल्ली, बावी, बोरगाव, चुंब, दाणे गल्ली, दत्तनगर, देवगाव, गाडेगाव रोड, गौडगाव, जावळी प्लॉट, कसबा पेठ, कुर्डूवाडी रोड, मिरगणे अपार्टमेंट, नागणे प्लॉट, नळे प्लॉट, उत्तरेश्वर मंदिराजवळ, पानगाव, ंिपपळकर प्लॉट, शिवाजी नगर, सोलापूर रोड, सोमवार पेठ, तुळशीराम रोड, उपळे दुमाला, माढ्यातील अकुलगाव, अरणगाव, भोसरे, कुर्डूवाडी, टेंभूर्णी, वडाचीवाडी, वडशिंगे, मोहोळमधील अनगर, एकुरके, पाटकुल, उत्तर सोलापूर तालुक्­यातील नंदुर, पंढरपुरातील अंबाबाई पटांगण, आंबे, भंडीशेगाव, भोसले चौक, बोहाळी, चळे, चिलाईवाडी, दाळे गल्ली, धोंडेवाडी, गोकुळनगर, गोपाळपूर, गोंिवदपुरा, इंदिरा गांधी भाजी मार्केट, इसबावी, जुना कराड नाका, कडबे गल्ली, करकंब, कासेगाव, खेड भोसे, किश्­ते गल्ली, कोर्टी, ंिलक रोड, नाथ चौक, ओमकार नगर, पुळूज, संत पेठ, स्टेशन रोड, सुस्ते, उत्पात गल्ली, वाखरी, दक्षिण सोलापूर तालुक्­यातील भंडारकवठे, बोरामणी, इंगळगी, माळकवठा, एनटीपीसी, विडी घरकुल, सांगोला तालुक्­यातील अचकदाणी, कोळा, महूद रोड, परीट गल्ली, तिप्पेहळी, यलमार मंगेवाडी, करमाळ्यातील मंगळवार पेठ, माळशिरस तालुक्­यातील अकलूज, बोंडले, बोरगाव, चांदापुरी, दहिगाव, दसूर, गारवाड, गिरवी, गोरडवाडी, गुरसाळे, जाधववाडी, जांभूळ, जानकर प्लॉट, कमल मळा, खुडूस, माळीनगर, मारकडवाडी, मोरोची, नातेपुते, पानीव, पठाण वस्ती, ंिपपरी, पुरंदावडे, संग्राम नगर, शंकर नगर, श्रीपूर, सिद्धार्थ नगर, तामशिदवाडी, तरंगफळ, वेळापूर, यशवंनगर, ंिझजेवाडी, मेडद या गावांमध्ये आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

तसेच शहरातील जनजीवन पूर्ववत होत असताना बाजारपेठा, रस्त्यांवरील गर्दी वाढू लागली आहे. तरीही नागरिकांच्या पुढाकारातून महापालिका प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग कमी करण्यात काही प्रमाणात यश मिळविले आहे. आज एक हजार 295 संशयितांपैकी 39 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, मृतांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचीचिंता असून मृतांमध्ये 52, 57, 64 आणि 73 वर्षीय व्यक्­तींचा समावेश आहे. दरम्यान, सोशल डिस्टंिन्सगचे पालन, मास्कचा वापर, हात स्वच्छ धुवावेत, या त्रिसुत्रीचा वापर केल्यास कोरोनाचा धोका निश्­चितपणे टाळता येऊ शकतो, असा विश्­वास महापालिका प्रशासनाने व्यक्­त केला आहे.

गदगी नगर (जुना विडी घरकूल), गांधी नगर, सोलापूर जेल, गंगा निवास, चंद्रकिरण अपार्टमेंट, विजय अपार्टमेंट (रेल्वे लाईन्स), मंत्री चंडक रेसिडेन्सी, निर्मिती विहार (विजयपूर रोड), गोल्डंिफच पेठ (किल्ला बागेजवळ), यशवंत नगर, द्वारका नगरी, शिवयोगी नगर, ज्ञानेश्­वर नगर (जुळे सोलापूर), भद्रावती पेठ, रंगराज नगर, दिक्षित नगर, श्रीराम नगर (नई ंिजदगी), निता नगर (अक्­कलकोट रोड), सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र. सहा, हत्तुरे वस्ती, नवी पेठ, कल्याण नगर भाग-दोन, ईश्­वरी अपार्टमेंट (अशोक नगर), आयोध्या नगर (हैदराबाद रोड), नाथ प्लाझा (सात रस्ता), सोरेगाव, महाराणा झोपडपट्टी, बेडरपूल (लष्कर), गुलमोहर वसंत विहार, सेटलमेंट फ्रि कॉलनी क्र. एक, लक्ष्मी नारायण टॉकिजजवळ, आदित्य नगर, अशोक चौक, कविता नगर (पोलिस लाईन), साखर कारखान्याजवळ, काडादी नगर (होटगी रोड), स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती) या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सर्व नियमांचे पालन करण्याची गरज आहे. सोलापुकरांनी या नियमांचे पालन केल्यानेच शहरातील कोरोनाचा संसर्ग आटोक्­यात येऊ लागल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे पूर्वीचा गंभीर आजार असतानाही वेळेत त्याचे निदान होऊ न शकल्याने मृत्यू होणा-यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही चित्र आहे.

आज माळशिरस तालुक्­यातील मेडद येथील 70 वर्षाचे पुरुष, महर्षी कॉलनी अकलूज येथील 73 वर्षाची महिला, चौंडेश्वरीवाडी येथील 85 वर्षाचे पुरुष, अक्कलकोटच्या नवीन राजवाड्याजवळील 60 वर्षाचे पुरुष, ढेमरेवाडी (ता. बार्शी) येथील येथील 90 वर्षाची महिला, कुर्डूवाडी (ता. माढा) येथील 56 वर्षाची महिला, करमाळ्यातील भवानी पेठेतील 50 वर्षाचे पुरुष, सावडी येथील 72 वर्षाचे पुरुष, किल्ला बाग येथील 67 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरातील अक्­कलकोट रोडवरील नितीन नगरातील 64 वर्षीय पुरुषाचा, उत्तर कसब्यातील 73 वर्षीय महिलेचा, मुरारजी पेठेतील 52 वर्षीय, तर कुंभार गल्लीतील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने आज बळी घेतला आहे.

मंदिरे सुरु करण्यासाठी भाजपाच्यावतीने घंटानाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या