22.9 C
Latur
Monday, July 7, 2025
Homeराष्ट्रीयसोनिया गांधींच्या पोटात संसर्ग

सोनिया गांधींच्या पोटात संसर्ग

गत ३ दिवसांपासून रुग्णालयात दाखल टीम आरोग्य आणि आहारावर लक्ष ठेवून सद्यस्थितीत प्रकृती स्थिर

नवी दिल्ली : प्रतिनिधी
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पोटात संसर्ग झाला असून सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती मंगळवार दि. १७ जून रोजी नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाच्या अध्यक्षांनी प्रसारमाध्यमांना दिली.

डॉ. अजय स्वरूप म्हणाले की, सोनियाजींची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या आहारावर लक्ष ठेवले जात आहे. खबरदारी म्हणून त्यांना डिस्चार्ज दिला जात नाही. रुग्णालयाच्या अध्यक्षांनी सांगितले की, डॉ. एस. नंदी आणि डॉ. अमिताभ यादव सोनिया गांधी यांच्या आरोग्यावर आणि आहारावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. १५ जून रोजी रात्री ९ वाजता सोनियांना सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले. यापूर्वी शिमला येथेही त्यांची प्रकृती बिघडली होती. त्या सुटी घालवण्यासाठी त्यांची मुलगी प्रियंका गांधींच्या फार्महाऊसवर गेल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR