सौरव दास पुन्हा संसद मार्ग पोलिस ठाण्यात दाखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात शनिवारी दिल्लीत झालेल्या निदर्शनादरम्यान एका महिला पत्रकारासोबत गैरवर्तन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कव्हरेज करत असताना एसीपी विवेक भगत यांनी आपल्याशी लैंगिक छळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप या महिला पत्रकाराने केला आहे. या प्रकरणावरून आता दिल्लीत प्रचंड राजकारण आणि संताप पाहायला मिळत असून, सिव्हिल राइट्स अँड जस्टिसचे कार्यकर्ते संसद मार्ग पोलिस ठाण्याबाहेर जोरदार निदर्शने करत आहेत. तर सिजेपीचे सौरव दास व त्यांच्या सहका-यांनी ठाण्यात चर्चसाठी बैठकीस एका वरिष्ठ अधिका-याने उपस्थिीत राहण्याची मागणी केली आहे.

या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेले सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी पुन्हा एकदा संसद मार्ग पोलिस ठाण्याबाहेर धडक दिली आहे. तेथे उपस्थित पोलिसांवर दबाव वाढवत सौरव दास थेट बॅरिकेटवर चढल्याचे पाहायला मिळाले. पिडितेसोबत एक प्रतिनिधी मंडळ सध्या पोलिस ठाण्याच्या आत दाखल झाले आहे. या शिष्टमंडळामध्ये रत्ना सिंह, वृंदा करात, आयशी घोष आणि ऋषभ रंजन हे प्रमुख चेहरे सामील आहेत. एका वरिष्ठ अधिका-याने या संपूर्ण बैठकीत उपस्थित राहावे, अशी ठाम मागणी या नेत्यांनी केली आहे.

आम्ही बळजबरीने आत घुसणार
पोलिसांनी सुरुवातीला सहकार्य न केल्यामुळे सौरव दास अत्यंत आक्रमक झाले होते. त्यांनी प्रशासनाला सज्जड चेतावनी देत म्हटले होते की, पिडिता तिचे वकील आणि आम्ही सर्वजण येथे उपस्थित आहोत, मग पोलीस आमच्याशी चर्चा का करत नाहीत? आम्ही त्यांना दोन-तीन मिनिटांची वेळ दिली आहे, अन्यथा आम्ही बळजबरीने आत घुसणार असा इशारा दिला आहे. त्यांनी पुढे संताप व्यक्त करत सांगितले की, ज्या महिला पत्रकारासोबत एसीपी विवेक भगत यांनी छेडछाड केली आहे, त्या पिडितेला भेटण्यास पोलीस तयार नाहीत; जे अजिबात सहन केले जाणार नाही.

दिल्ली पोलिसांची भूमिका
एका बाजूला निदर्शक आणि आंदोलक सातत्याने संबंधित दोषी एसीपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत, तर दुस-या बाजूला दिल्ली पोलिसांनी यावर आपली बाजू मांडली आहे. पोलिसांच्या मते, याप्रकरणी तीन वेगवेगळया तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारी रविवार, ४ ऑक्टोबर रोजी तपासासाठी क्राईम ब्रँचकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nana Patekar Speech|अभिनेते नाना पाटेकर आपल्या भाषणात भावूक का झाले? काय म्हणाले
24:31
Video thumbnail
Nana Patekar|ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
01:31
Video thumbnail
Nanded|निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासह SIRविरोधात इंडिया आघाडीचा नांदेडमध्ये मोर्चा
03:34
Video thumbnail
लातूरच्या कन्हेरी चौकातून अपहरण करत बर्दापूर येथील खडी केंद्रावर मारहाण; ३२वर्षीय तरुणाचा मृत्यू
02:56
Video thumbnail
Nanded|डॉक्टर होण्याचं स्वप्न, हातात विळा! MBBS विद्यार्थी आईसोबत सोयाबीन काढतोय
03:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये पाणी चोरीविरोधात धडक कारवाई; ५ दिवसांत ४०० मोटारींची कनेक्शन कट
02:36
Video thumbnail
Latur|आदर्शवर बुलडोझर फिरणार? फरार बशीर शेखच्या अडचणी वाढल्या!
03:39
Video thumbnail
Latur|ठाकरे चौकातील कोयता हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर; शहरात सरप्राईज नाकेबंदी
03:41
Video thumbnail
शिक्षक द्या, नाहीतर कार्यालयातच शाळा! शिरूर अनंतपाळमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अनोखे आंदोलन
02:56
Video thumbnail
Latur|दुष्काळात लाखो लिटर पाणी आगीवर नियंत्रणासाठी खर्च; आग लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी?
06:18
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा दणका! अखेर चायनीज सेंटर दुकानदाराला न्याय
05:27
Video thumbnail
Latur|१३ तासांच्या झुंजीनंतर कचरा डेपोची आग नियंत्रणात; ३८ तासांनंतरही धुराचे लोट कायम!
04:02
Video thumbnail
ऐन दुष्काळात शेतकऱ्यावर चोरट्यांचा दरोडा; पाटोदा बुद्रुकमधून ३ दुभत्या म्हशी पळवल्या
02:22
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
18:54
Video thumbnail
पंचनाम्याचा फार्स थांबवा, थेट बँक खात्यात मदत टाका; शिरूर अनंतपाळमधील शेतकऱ्यांची आक्रमक मागणी!
02:03

Latest news