28.1 C
Latur
Friday, January 16, 2026
Homeक्रीडाआफ्रिकेला ११७ धावांवर रोखले

आफ्रिकेला ११७ धावांवर रोखले

एकटा एडन मारक्रम लढला

धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी २० मॅच धर्मशाला येथे सुरु आहे. भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवचा हा निर्णय अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा या दोघांनी सार्थ ठरवत सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला धक्के दिले. आफ्रिकेचे फलंदाज यातून शेवटपर्यंत सावरु शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना ११७ धावा केल्या. अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताला विजयासाठी आता ११८ धावा करायच्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी दुस-या टी २० सामन्यात भारताच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. मात्र, तिस-या टी २० सामन्यात अर्शदीप सिंग आणि हर्षित राणाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फटकेबाजी करु दिली नाही. पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३ बाद २५ अशी होती. अर्शदीप सिंगनं दुस-या टी २० मॅचमध्ये ४ ओव्हरमध्ये ५४ धावा दिल्या होत्या. अर्शदीपने तिस-या टी २० मॅचमध्ये कमबॅक करत ४ ओव्हरमध्ये २ विकेट घेत १३ धावा दिल्या.

भारताच्या गोलंदाजांपुढे दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाजांना फटकेबाजी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवर २ धावांवर तंबूत परतले. रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डीकॉक, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, मार्को यानसेन या फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या देखीलल करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मारक्रम याने ६१ धावा केल्या. तर, डोनोवेन फेरेइरा याने २० धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR