17.6 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeविशेषउसाच्या रसाचे फायदे -२

उसाच्या रसाचे फायदे -२

एकमत ऑनलाईन

उसाचा रस ऊस वनस्पतीच्या खोडापासून मिळतो. जो प्रक्रिया केलेल्या साखरेचा आणि गुळाचा व पाकाचा चांगला स्त्रोत आहे. या रसामध्ये सुक्रोज सारखं घटक असतात. ज्यामुळे हा रस चवदार व गोड लागतो. आपल्या शारीरीक व मानसिक आरोग्यासाठी उसाचा रस अत्यंत गुणकारी आहे. मुळातच उसाचा रस हा अत्यंत पौष्टिक असतो. या रसामध्ये कमी कॅलरी उष्मांक असल्यामुळे या रसाच्या सेवनाने आपल्या शरीराला अनेक मार्गांनी फायदा होऊ शकतो. उस ही एक प्रकारची जादुई वनस्पती आहे. त्यापासून काढलेला रस पिल्यास आपले शरीर हिवाळ्याच्या मोसमात उबदार आणि उन्हाळ्याच्या दिवसांत थंडावा देण्यास मदत करते. या उसाच्या रसात थोडेसे मिठ आणि लिंबाचा रस मिसळून पिल्यास तो आणखीनच चवदार लागतो आणि त्यामुळे आपल्या शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. उसाच्या रसामध्ये तंतुमय पदार्थाची मात्रा जास्त असते त्यामुळे अशक्तपणा, आम्लपित्त व त्याचप्रमाणे कावीळीसारखा आजाराची समस्या कमी होण्यास फायदा होतो.

उसाचा रस हा आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या अनेक पोषक घटकांनी ठासून भरलेला आहे. आयुर्वेदानुसार उसाचा ताजा रस रेचक असून अल्कधर्मी गुणधर्माचा आहे. ज्यामुळे आपल्या आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. या रसाच्या सेवनाने पोटात जळजळ होणे आणि बध्दकोष्ठतेसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. उसाचा रस हा फक्त तहानच भागवत नाही तर त्यात असलेल्या अनेक औषधीयुक्त घटकांमुळे आपल्या शरीराचे संरक्षण होते. त्याचबरोबर उसाचा रस पिल्याने नुसते गर्मीपासून बचाव होत नाही तर अपल्याला आजारापासून दूर ठेवण्यास मदत होते. उसाचा रस पोटासाठी सुध्दा अत्यंत प्रभावी मानला जातो त्यामुळे आपल्या शरीराला थंडावा तर मिळतोच पण जठराला आराम देण्याचे काम देखील होते.

आरोग्य चांगले असण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे ही काळाची गरज आहे. उसाच्या रसामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि जीवनसत्व क मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे आपल्या शरीरात बिलरूबनची पातळी स्थिर राहण्यास मदत होते व त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते व तसेच विविध संसर्गापासून संरक्षण मिळते. उसाच्या रसात मोठ्या प्रमाणात खनिज द्रव्ये असतात. प्रामुख्याने कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखी खनिजे दाताचे संरक्षण करतात. व दाताच्या मुलामाची सुरक्षा करतात व त्यामुळे दात मजबूत राहतात. यामुळे दातांना किड लागत नाही परिणामी दातांचे आरोग्य चांगले राहते. उसाचा रस तंतुमय पदार्थानी समृध्द आहे. हे तंतुमय पदार्थ पोटाला जास्त काळ तृप्त ठेवतात त्यासाठी नियमितपणे रिकाम्या पोटी रस (उसाचा) प्यायल्याने वजन कमी होऊ शकते. उसाचा रस रेचक गुणमर्धाचा आहे.

तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थितरित्या होते. त्याच बरोबर उसाच्या रसामध्ये पोटॅशियमची मात्रा असल्यामुळे सामू संतुलन उत्तम राखले जाते. बध्दकोष्ठोची समस्या असल्यास नियमितपणे उसाचा रस प्यायल्यास त्रास कमी होईल. प्रामुख्याने महिलांनी गरोदर असताना उसाचा रस अवश्य सेवन करावा. गरोदरपणात सेवन केलेला उसाचा रस पचन सुधारण्यासाठी चयापचय वाढविण्यासाठी मदत करतो. नियमित उसाचा रस पिल्याने नैसर्गीकरित्या रोगप्रतिकार शक्ती वाढते. उसाचा रस आपल्या चेह-यावरील पुरळ कमी करण्यास अत्यंत गुणकारी आहे. उसाचा रस नियमित घेतल्यास त्वचेची जळजळ , संक्रमण व त्वचेवरील डाग काळी वर्तुळे, सुरकुत्या कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर कोरडी त्वचा ओलसर व मुलायम राहण्यास मदत होते त्यासाठी दररोज नियमितपणे एक ग्लास उसाचा ताजा रस सेवन केल्यास त्वचा तजेलदार राहते. आम्लपित्त प्रकारामध्ये जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव्य) तयार होतो व त्यामुळे पोटात जळजळ, तोंडात आंबट पाणी येणे, छातीत जळजळ होणे अशा तक्रारी निर्माण होतात. आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे आणि ब-याच माणसांना याची कधी ना कधी अनुभव येतोच. उसाचा रस क्षार युक्त असल्यामुळे अल्कधर्मी आहे.

त्यामुळे नियमितपणे उसाच ताजा रस एक ग्लास पिल्याने पोटातील आम्ल कमी होण्यास मदत होते. ब-याच वेळा घशामध्ये जीवाणू किंवा विषाणूचे संक्रमण होऊन घसा तडतड करतो. ज्यामुळे जेवण करताना व श्वास घेताना त्रास होतो. उसाचा रसात मुबलक जीवनसत्व क असते ज्यामुळे आजार कमी होतात व त्यामध्ये असलेल्या अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे जिवाणूचे किंवा विषाणूचे संक्रमण होण्यापासून प्रतिबंध केला जातो. त्यासाठी एक ग्लास ताज्या रसामध्ये चिमुटभर मीठ व लिंबाचा रस घालून पिल्यास फायदा होतो. नखाचे आरोग्य हे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या आरसा असतो. नखाचा संबंध केवळ सौंदर्याशी नसून आरोग्याशी आहे. सुंदर नखे आरोग्याचे प्रतीक मानले जातात. ते उत्तम आरोग्याचे निदर्शक मानले जातात. ब-याच वेळा नखे ठिसळ, फुगीर, काळी, निस्तेज, वाकलेली किंवा कोरडी व आडव्या रेषा असलेली होतात. नखासाठी कॅल्शियम युक्त आहार महत्त्वाचा असतो. त्यासाठी दररोज एक ग्लास उसाचा रस सेवन करावा. ब-याच वेळा मुत्रमार्गात संक्रमण झाल्यामुळे वेदना होतात. त्यामुळे लघवी करताना अतीव वेदना व जळजळ होणे, शरीराचे तापमान वाढणे, थंडी वाजणे, उलटी झाल्यासारखे वाटणे, वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला दुधी येणे अशी लक्षणे दिसतात व अस्वस्थता वाटते अशा लोकांनी उसाचा ताजा रस एक ग्लास दररोज घेतल्यास फायदा होतो. अनेक वेळा तोंडात राहिलेले अन्नाचे कण कुजल्यामुळे व जीवाणू संक्रमणामुळे तोंडाला दुर्गधी येते. त्यामुळे स्वत:लाही आणि दुस-यांनाही त्रास होतो. उसाच्या रसामध्ये असलेली खनिजे पोटॅशियम आणि अल्कधी गुणधर्मामुळे उसाचा रसाचा जीवाणू विरोधी प्रभाव पडतो. त्यासाठी दररोज एक ग्लास उसाचा रस पिल्यास तोंडातील दुर्गंधी कमी होतो. आपल्या शरीरातील स्रायु म्हणजे पेशीचा समूह असतो जे आकुंचन पावतात व शिथिल होऊन पुर्ववत होतात. यामुळेच सर्व सजिवांना हालचाल करणे शक्य होते. उसाच्या रसामध्ये प्रथिने व सुक्रोजची मात्रा भरपूर असते. ज्यामुळे स्रायुची वाढ होऊन आरोग्य चांगले राहते म्हणून उसाचा ताजा रस एक ग्लास नियमित पिल्यास लाभदायक होते. ताप हा आजार (रोग) नाही तर तो फक्त कोणत्या तरी रोगाचे लक्षण आहे.

मुख्यत: ताप म्हणजे आपल्या शरीरावर जीवाणू किंवा विषाणूच्या संक्रमणाचा होणारा परिणाम असतो व त्याचबरोबर वाढणारे तापमान रोजच्या संक्रमणाची पातळी दाखवतो उसाच्या रसात प्रथिनाचे प्रमाण भरपूर असते जे शरीराचे उच्च तापमान कमी करण्यास मदत करतात. केस गळतात किंवा लवकर पांढरे होतात अशी लक्षणे दिसतात. या सर्वांपासून बचाव करण्यासाठी उसाचा रस अत्यंत गुणकारी आहे. यामध्ये असलेले अ‍ॅन्टीऑक्सीडेंट आणि फ्लेवोनॉईडस त्वचेला ओलावा प्रदान करून कोमल बनवते. व यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा चमकदार व तरूण होते. १५) उसाच्या रसाच्या सेवनाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तरी सुध्दा १) नेहमीच उसाचा ताजा रस अर्ध्या तासाच्या आत प्यावा. कारण नंतर तो खराब होऊ शकतो. २) उसाचा रस जास्त प्रमाणात सेवन केल्यास डोकेदुखी वाढून चक्कर येऊ शकते. ३) अती सेवन केल्याने पोट बिघडते व मळमळ करणे या समस्या उद्भवू शकतात. ४) बर्फ घातलेला रस अजिबात पिऊ नये. ५) मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच उसाच्या रसाचे सेवन करावे. ६) कफाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी उसाचा रस पिणे टाळावे. टिप:- वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या