18.9 C
Latur
Thursday, January 20, 2022
Homeविशेषतांत्रिक विश्लेषण ट्रेडिंगचा आत्मा

तांत्रिक विश्लेषण ट्रेडिंगचा आत्मा

एकमत ऑनलाईन

तरुण वर्गासाठी आतापर्यंत आपण ट्रेडिंग संदर्भामध्ये माहिती घेत होतो. ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग कशी करावी, त्यासाठी कोणती साधने वापरणे गरजेचे आहे? इत्यादी संदर्भामध्ये माहिती आपण घेतली. नवीन भागामध्ये तांत्रिक विश्लेषण या संदर्भामध्ये अधिक माहिती घेणार आहोत. ज्यात बेसिक ऑफ टेक्निकल विश्लेषणची माहिती घेत असताना नवीन युवा या क्षेत्रांमध्ये उतरत आहेत, त्याने जास्त दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ट्रेडिंग करीत असताना आर्थिक फटका बसणार नाही. हा ट्रेडिंगचा मूळ उद्देश ट्रेडिंगमधून होणा-या व्यवहारातून अधिक नफा यांचा विचार येतो. यासाठी ट्रेडिंग करणा-या ट्रेडर्स तांत्रिक विश्लेषणाचा पाया हा भक्कम स्वरूपामध्ये असायला हवा. या संदर्भातील कन्सेप्ट क्लिअर असणे गरजेचे आहे. त्यातील पहिला मुख्य विभाग आहे तो म्हणजे, सप्लाय अँड डिमांड यासंदर्भातील माहिती मिळवणे होय. जेव्हा एखादा व्यक्ती शेअर्स खरेदी करीत असतो. शेअर बाजारांमध्ये असा एकच व्यक्ती शेअर खरेदी करीत नसतो तर त्यांच्यासारखे अनेक व्यक्ती शेअर्स खरेदी करीत असतात. स्टॉक एक्स्चेंजमध्ये संबंधित शेअर्सचा पुरवठा किती आहे? हा भाग खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर शेअर्स स्टॉक एक्स्चेंजमध्ये किती मागणी आहे? यावर संबंधित कंपनीच्या शेअर्सची किंमत ठरत असते.

मागणी आणि पुरवठा याचा अभ्यास करीत असताना सर्वांत महत्त्वाचा कल म्हणजे प्राईस ट्रेंड होय. प्राईस ट्रेंड म्हणजे संबंधित कंपनीच्या शेअर्सची भविष्यामध्ये वाटचाल कोणत्या दिशेने होणार आहे हे ओळखता येणे. अशा कलाची ज्या ठिकाणाहून सुरुवात होते तो कल जर समजला असेल तर ट्रेडर्सला ट्रेडिंग करीत असताना कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो. हे जलद गतीने व अचूक पद्धतीने मांडता येऊ शकते. थोडक्यात बोलायचे झाले तर ट्रेडर्सच्या मनोवैज्ञानिक अभ्यासावरून चार्टवर कालांतराने तयार होणा-या ठराविक प्रकारच्या रचनेला ओळखता येणे होय. अशा प्रकारची स्थिती ही भूतकाळामध्ये अनेक वेळा झालेली असते. त्याची पुनरावृत्ती होत असते. म्हणजेच चार्ट भावावरून संबंधित कल असेल तर, उच्चांकी तळ व उच्चांकी टॉप तयार होतो. तो ट्रेडर्सला ओळखता यायला हवा. जेव्हा शेअर बाजार संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये मंदीसदृश परिस्थिती असते. तेव्हा नीचांकी टॉप व अधिक खालचा तळ तयार होत असतो. अशा प्रकारची परिस्थिती ही भूतकाळामध्ये यापूर्वी झालेली असते. त्याची पुनरावृत्ती मात्र होत असते. यामध्ये तिसरा प्रकार म्हणजे शेअर बाजारातील कल हा समांतर स्वरूपाचा असतो. ज्याला अनेकदा ट्रेडर साईड वे असे म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये संबंधित कंपनीच्या शेअर्सची समांतर वाटचाल होत असताना रेंजमध्ये टॉप तसेच प्रकारची स्थिती निर्माण करीत असते. हे होत असताना शेअर बाजारात डिमांड सप्लाय या तंत्राचा अवलंब होत असतो. अशावेळी संबंधित कंपनीच्या शेअर्सचा मागणी जास्त व पुरवठा कमी असतो. जेव्हा बाजारामध्ये मंदी असते, अशावेळी संबंधित कंपनीच्या शेअर्सला मागणी कमी व पुरवठा जास्त असतो. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते. जेव्हा मागणी आणि पुरवठा यामध्ये जास्त तफावत नसते, तेव्हा साईड बॅक किंवा समांतर शेअर्सच्या किमतीमध्ये वाटचाल सुरू होत असते.

ट्रेडिंगचा अभ्यास करीत असताना जेव्हा शेअर बाजारांमध्ये मंदी प्रस्थापित असते, तेव्हा मागणी कमी व पुरवठा जास्त असतो. ट्रेडच्या दिशेने सोबत अशा ट्रेडचे वर्गीकरण पुढील प्रकारे होत असते. पहिल्या प्रकारामध्ये मुख्य व दीर्घकालीन कालावधीसाठी ट्रेंड होय. दुसरा प्रकार म्हणजे मध्यम कालावधीसाठी स्थापित झालेला ट्रेंड तिसरा प्रकार म्हणजे कमी कालावधीसाठी स्थापित झालेला ट्रेंड होय. या तिन्ही कालावधीसाठी ट्रेंड निर्माण होत असतो. अनुभवी ट्रेडर्स हा आलेखाच्या सहाय्याने चार्टवरती मांडत असतो. त्यानुसार दीर्घकालीन रेषा, मध्यकालीन रेषा व अल्पकालीन रेषा या संबंधित ट्रेंडचे प्रतिनिधित्व करीत असतात. त्यानुसार शेअर बाजारातील ट्रेडिंग करणारा ट्रेडर हा आपले निर्णय योग्य प्रकारे घेत असतो.

अनेक जण फ्युचर ट्रेडिंग संदर्भामध्ये याचा आधार घेत असतात. यासाठी चार्टवर मुख्य दीर्घ कालावधीसाठी निर्माण झालेला ट्रेड या रेषेला क्रॉस करून मध्यमकालीन व दीर्घकालीन रेषा वर जाते का? खाली जाते हे महत्त्वाचे ठरत असते. ज्यामुळे ट्रेडरला ट्रेडिंग करीत असताना संबंधित शेअर्स खरेदी करावा का विक्री करावा? ट्रेडिंग करीत असताना ट्रेडर्स सपोर्ट लेव्हल आणि रेजिस्टन्स लेव्हल समजून घेणे गरजेचे असते. सपोर्ट लेवल हा अशा प्रकारचा असतो की, ज्या ठिकाणी डिमांड संबंधित शेअर्स खूप मजबूत झालेली असते. त्यामुळे संबंधित कंपनीच्या शेअर्सचा भाव खाली जाण्यापासून रोखला जातो. अशा स्तरावर पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते.

रेजिस्टन्स लेवलला अनेक ट्रेडर सप्लाय लाईन देखील म्हणत असतात. असे ट्रेडर्स हे कोणत्या एका स्तरावर संबंधित शेअर्सची वारंवार विक्री होते. अनेक ट्रेडर्स करीत असतात. अशा वेळेला त्या स्तरावर प्रतिरोध स्थापन होऊ शकतो. अनेक वेळा रेजिस्टन्स लेवलवरून सपोर्ट लेवलकडे गोल फिरत असतो. अनेक ट्रेडर या संदर्भामध्ये सपोर्ट लेवलचा फायदा घेऊ शकतात. नवीन तरुण वर्गाने या संदर्भामध्ये सपोर्ट लेवल व रजिस्टर सिम्बॉल म्हणजे काय त्याचे संकेत काय असतात? अशावेळी कोणत्या प्रकारचा निर्णय घ्यावा लागतो? वास्तविक पाहता ट्रेडर व गुंतवणूकदाराच्या अपेक्षा स्टॉक एक्स्चेंजवर नेहमी होत असतात. अशा अपेक्षांचे प्रतिबिंब हे स्थापित होत असताना सपोर्टवर रेजिस्टन्स लेवलमध्ये ते दिसत असतात.

शेअर बाजारांमध्ये अनेक वेळा संबंधित शेअर्सची खरेदी आणि विक्री होत असते. त्याची संख्या किती आहे हे समजून घेणे म्हणजेच खरेदीदार किती आहेत व विक्री करणारे किती आहेत या आधारावर ती सर्व काळ किती ट्रेडिंग झाले हे व्हॅलूमद्वारे समजत असते. शेअर बाजारामध्ये किंवा संबंधित शेअर्सच्या किमतीमध्ये दिसून येणारी वाढ किंवा घट दरम्यान व्हॅलूम किती वाढला किंवा घटला आहे? हे समजणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. जेव्हा शेअर्स बाजारामध्ये संबंधित शेअर्सची किंमत वाढते व अशा वेळेस वरून वाढत असेल तर चांगले समजले जाते परंतु शेअरची किंमत वाढत असताना घटला असेल तर खराब संकेत समजले जातात. जेव्हा शेअरचा भाव घटत असतो तेव्हा व्हॅलूम घटला असेल तर ते चांगले समजले जाते. परंतु जेव्हा शेअरचा भाव वाढतो आणि व्हॅल्यूम देखील बघत असतो. हे वाईट सिग्नल्स ठरत असतात. याचा परिणाम ट्रेडरवरती होत असतो.
एखाद्या कंपनीचा शेअर तेजीमध्ये ट्रेंड प्रस्थापित करीत असेल आणि भविष्यामध्ये परीकक्षांच्या दरम्यान तो ट्रेड घटून पूर्वीच्या किमान पातळी जी शेअर्सची आहे, तिथपर्यंत पोहोचला असेल तर त्याला ट्रेड रिव्हर्स असे म्हणतात. भविष्यामध्ये ट्रेंड रिव्हर्स झाल्यानंतर तो तेजीमध्ये वाटचाल करणार आहे की मंदीमध्ये वाटचाल करणार आहे का साईड जाणार आहे याची दिशा संबंधित ट्रेडला समजणे गरजेचे असते? जेव्हा शेअर्स भाव हा एखादी दिशा पकडून पुढे वाटचाल करत असतो. मग तिथे तेजी असो किंवा मंदी असो त्याच्यानुसार त्या शेअर्सचा बाजारभाव ठरत असतो. तोदेखील बाजारभाव कमी किंवा जास्त होतो.

जो उच्चाकांचा स्तर न बघता सुधारतो त्या शेअर्सचा भाव हा ज्यामुळे ठरत डायवर्जण असतो. अशा प्रकारचे डायवर्जन हे सकारात्मक व नकारात्मक असू शकतात. त्याची पारख असावी लागते. ट्रेडिंग करीत असताना किती पैसे खरेदी किंवा विक्रीसाठी वापरावेत याची माहिती नवीन ट्रेलरला असावी लागेल. अन्यथा नुकसान होऊ शकते. अशा वेळेस ट्रेडिंग करीत असताना किती रक्कम शेअर्समध्ये गुंतवावी याचा निर्णय हा खूप महत्त्वाचा ठरत असतो. अशा प्रकारे सिग्नल्स न मिळता वाटचाल करणे म्हणजे, आगीमध्ये उडी टाकण्यासारखे होय. हे नवीन ट्रेलरला समजणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टीचा अभ्यास करून ट्रेडरने सुरुवातीला गृहपाठ सरावासाठी करूनच मग ट्रेडिंगच्या मैदानामध्ये उतरल्यास कॉन्फिडन्ससोबत नफा वाढत असतो. हे तरुण पिढीने सातत्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

-प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या