27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeविशेषराणी एलिझाबेथ आणि भारत

राणी एलिझाबेथ आणि भारत

एकमत ऑनलाईन

राणी एलिझाबेथच्या कारकीर्दीचा हीरकमहोत्सव साजरा करण्यासाठी दोन जून ते सहा जून या कालावधीत विविध समारंभांचे आयोजन केले असताना, याच कालावधीत आपण मागे वळून पाहणे औचित्याला धरून होईल. ब्रिटनच्या महाराणींनी १५० पेक्षा अधिक देशांना भेटी दिल्या आहेत, शंभर स्टेट व्हिजिट्सचे आयोजन केले आहे आणि ज्यांचा शंभरावा वाढदिवस आहे अशा ३ लाखांहून अधिक लोकांना अभिनंदनाची कार्डे पाठविली आहेत. राजेशाहीच्या विरोधात असलेले लोकही राणीचा आदर करतात. तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी एका रेडिओ प्रसारणात महाराणी म्हणाल्या होत्या, माझ्या संपूर्ण आयुष्यात मी तुमचा विश्वास जिंकण्याचा मनापासून प्रयत्न करेन. तिने हे वचन पाळले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच ब्रिटिश राजघराण्याबाबत भारतीयांना इतकी उत्सुकता का आहे? राणी एलिझाबेथ द्वितीय यांना भारतीयांची आजची पिढीही ओळखते. आपण लहानपणी नर्सरीच्या -हाइम्समध्येही ऐकले आहे-पुसी कॅट पुसी कॅट, व्हेअर हॅव यू बीन? आय हॅव बीन टू लंडन टू लुक अ‍ॅट द क्वीन! नंतर ‘द क्राऊन’ आणि ‘ज्वेल इन द क्राऊन’ यांसारख्या टीव्ही मालिकांनी आपल्या वसाहतिक भूतकाळाच्या आठवणी ताज्या केल्या. इंग्रजी ही अजूनही भारतातील उच्चभ्रूंची पसंतीची भाषा आहे. दुसरे म्हणजे, राणीसोबत भारताचे संबंध फार पूर्वीचे आहेत. अगदी हैदराबादच्या निजामानेही त्यांना लग्नाची भेट म्हणून हि-याचा मुकुट दिला होता. प्रसिद्ध कोहिनूर हिरा त्यांच्याच मुकुटात जडलेला आहे. ब्रिटिशांनी ‘ज्वेल इन द क्राऊन’ म्हणून भारताचे वर्णन केले होते आणि वसाहतोत्तर जगात विशेष स्थान भारताला प्राप्त झाले होते. तिसरी बाब अशी की, राणीने तिच्या प्रदीर्घ कारकीर्दीत तीन वेळा भारताला भेट दिली. लोकांनी (माझ्या लहानपणी माझ्यासह) शाही जोडप्याचे स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या कडेला रांगा लावल्या होत्या. भावी राजा चार्ल्स यांच्यासह त्यांची मुले त्यांच्या दौ-याच्या वेळी भारतात आली होती.

राणी एलिझाबेथच्या कारकीर्दीचा हीरक- महोत्सव साजरा करण्यासाठी दोन जून ते सहा जून या कालावधीत विविध समारंभांचे आयोजन केले जात असताना, याच कालावधीत आपण मागे वळून पाहणे औचित्याला धरून होईल. १९६१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निमंत्रणावरून शाही जोडप्याचा पहिला दौरा झाला होता. ते बॉम्बे (आताचे मुंबई), मद्रास (आताचे चेन्नई), जयपूर, आग्रा आणि कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे गेले होते. प्रजासत्ताक दिनाच्या संचालनाचे ते सन्माननीय अतिथीही होते. जयपूरच्या महाराजांनी त्यांच्यासाठी शिकारीचे आयोजन केले होते. त्यांचा दुसरा दौरा १९८३ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या निमंत्रणावरून झाला होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रपती भवनात मुक्काम केला. राणीने मदर तेरेसा यांना सन्माननीय ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान केले.

राणीने ऐतिहासिक लाल किल्ल्यालाही भेट दिली. शाही पाहुण्यांना कोणत्याही संभाव्य दुर्घटना किंवा अडचणी टाळण्यासाठी आधाराविना बांधलेल्या नकली पुतळ्यात नेण्यात आले. १९९७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा तिसरा दौरा झाला. शाही जोडपे अमृतसरला जाणार होते; पण जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ अनेकांनी निदर्शने केली. राणीने भारतीय भूमीवर पाऊल ठेवण्यापूर्वीच संकट सुरू झाले होते. आपल्या शाही मेजवानीच्या वेळी केलेल्या भाषणात राणीने कबूल केले की आमच्याकडून भूतकाळात काही अनुचित घडामोडी झाल्या आहेत आणि आता ते रहस्य राहिलेले नाही. जालियनवाला बागेला मी उद्या भेट देणार आहे. तेथे घडलेली घटना हे एक दु:खद उदाहरण आहे. दुस-या दिवशी, १४ ऑक्टोबरला शाही जोडपे जालियनवाला बागेत गेले. तेथे त्यांनी माथा टेकला आणि शहिदांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला; परंतु रोष कायम राहिला आणि निदर्शने सुरू राहिली. राणी तीन भारतीय राष्ट्रपतींची होस्टसुद्धा बनली- १९६३ मध्ये डॉ. राधाकृष्णन, १९९० मध्ये आर. वेंकटरामन आणि २००९ मध्ये प्रतिभा पाटील! मेजवानीच्या वेळी त्यांनी शाही जोडप्याचे स्वागत करणा-या भारतीयांबद्दल प्रशंसोद्गार काढले.

सर्वांत अलीकडील घडामोडी म्हणजे २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यावेळच्या आहेत. त्यांनी त्यांना लग्नाची भेट म्हणून क्रोशिया कॉटनची लेस भेट दिली. त्यांनी १९६१ च्या दौ-यात काढलेली छायाचित्रे आणि बंगालमधील मकाबरी इस्टेटमधील काही विशिष्ट चहांचे नमुनेही भेट दिले. इंग्लंड या महिन्यात ऐतिहासिक प्लॅटिनम ज्युबिली कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. ट्रूपिंग द कलर सेलिब्रेशनने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर राणीच्या अधिकृत वाढदिवसानिमित्त परेड होईल. संपूर्ण इंग्लंड आणि राष्ट्रकुल गटातील देशांमध्ये १५०० पेक्षा अधिक प्रकाशस्तंभ या कार्यक्रमाची शोभा वाढवतील. दुस-या दिवशी राणी एप्सम डाऊन्स येथील डर्बीत सामील होईल. दुस-या दिवशी ती सेंट पॉल चर्चमधील आभार सेवेला उपस्थित राहणार आहे. प्लॅटिनम ज्युबिली पीझंट पाच जून रोजी लंडनमध्ये होणार आहे. प्लॅटिनम ज्युबिलीसाठी राणीच्या वाचन यादीत सात भारतीय लेखकांनीही स्थान पटकावले आहे. या यादीत आर. के. लक्ष्मण, अरुंधती रॉय. वि. स. नायपाल, कमला मार्कंडेय आणि राज कमाल खान यांचा समावेश आहे. बंकिंगहॅम पॅलेसने एक प्रेस स्टेटमेन्ट जारी केले आहे. त्यात राणीबद्दल अभावानेच माहिती असणा-या बाबी आहेत. त्यांनी १४ अमेरिकी अध्यक्षांना भेट दिली असून, १४ ब्रिटिश पंतप्रधानांनी महाराणींची सेवा केली आहे.

महाराणींनी १५० पेक्षा अधिक देशांना भेटी दिल्या आहेत, शंभर स्टेट व्हिजिट्सचे आयोजन केले आहे आणि ज्यांचा शंभरावा वाढदिवस आहे अशा ३ लाखांहून अधिक लोकांना अभिनंदनाची कार्डे पाठविली आहेत. त्यांना पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसेन्सची गरज भासत नाही, कारण ते राणीच्या नावाने जारी केले जातात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने सांगायचे झाल्यास राणीने २६ मार्च १९७६ रोजी पहिला ईमेल पाठवला. महाराणी त्यांचा मुकूट प्रिन्स चार्ल्सकडे हस्तांतरित करेल की नाही, याबाबत अनेकांना शंका होती. प्लॅटिनम ज्युबिलीनिमित्त दिलेल्या राष्ट्रीय संदेशात याबाबत मौन सोडून महाराणींनी सांगितले की, माझी प्रामाणिक इच्छा आहे, की जेव्हा वेळ येईल तेव्हा कॅमिला हिला क्वीन कॉन्सोर्ट म्हणून ओळखले जाईल, कारण तिने प्रामाणिकपणे सेवा सुरू ठेवली आहे. राजेशाहीच्या विरोधात असलेले लोकही राणीचा आदर करतात. तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी एका रेडिओ प्रसारणात महाराणी म्हणाल्या होत्या, माझ्या संपूर्ण आयुष्यात मी तुमचा विश्वास जिंकण्याचा मनापासून प्रयत्न करेन. तिने हे वचन पाळले आहे.

-विनिता शाह

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या