23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeविशेषडाळिंब रसाचे फायदे डाळिंब हे फळ निसर्गाच्या

डाळिंब रसाचे फायदे डाळिंब हे फळ निसर्गाच्या

एकमत ऑनलाईन

कलेचा व रूपाचा आश्चर्यकारक अविष्कार आहे. हे फळ बाहेरून आणि आतुनही अत्यंत देखणी रचना असलेले आहे. या फळाच्या आतमध्ये लालचुटूक व मनाला भुरळ घालणारे दाणे असतात. या नाजूक दाण्याची नुकसान होऊ नये म्हणून त्यावर जाड सालीच आवरण असतं. हे फळ दिसायला आकर्षक दिसते. हे फळ कोणत्याही ऋतूंमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असते. भारतामध्ये डाळिंब फळ खाणा-यांची संख्या भरपूर आहे. त्यात काही लोक डाळिंबाचे दाणे आवडीने खातात तर काही लोकांना याचा रस प्यायला जास्त आवडते. या फळातील दाणे वेगळे करण्यासाठी वेळ लागत असला तरीही फळ आपल्या आरोग्यासाठी अनेक महत्वाचे फायदे देऊन जाते. वैज्ञानिक संशोधनानुसार डाळिंबाच्या दाण्याचा रस करून पिल्याने पटकन फायदे मिळतात कारण रसातील पोषक घटक ताबडतोब आपल्या शरिरात विरघळतात/ मिसळतात त्यामुळे आरोग्याला लवकर फायदा होतो.

४ उपयोग : रोगप्रतिकार शक्ती : डाळिंबाचा रस जीवनसत्व-क ने समृध्द असलेला आहे. दैनंदिन ४० टक्के जीवनसत्व-क फक्त डाळिंबाच्या रस सेवनाने मिळते. ज्यामुळे आपल्या शरिराची रोगाशी प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. डाळिंबातील घटक आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याच्या पेशींना मजबूत बनविण्याचे कार्य करतात. त्यासाठी दररोज नियमितपणे डाळिंबाचा रस पिल्यास शरीराची रोगाशी लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. ४ पौष्टिकता : डाळिंबाचा रस हा अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासाठी उपयुक्त असलेले अन्न आहे. या रसामध्ये जीवनसत्वे (क/के) इतर आवश्यक तत्वे व शरीराला मजबूत ठेवणारे घटक व ऊर्जा भरपूर प्रमाणात असतात. १०० ग्रॅम डाळिंबापासून सुमारे ८० कॅलरी उष्मांक मिळतात. विशेष म्हणजे डाळिंबाच्या रसात संतृप्त चरबी किंवा खराब चरबी अजिबात नसते तसेच यामध्ये तंतुमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हे पचायला सोपे असते .
४ मेंदूची सक्रियता : डाळिंबाचा रस अ‍ॅन्टीऑक्सिडंटने समृध्द असलेला आहे.
मज्जातंतू क्रियाशील राहण्यासाठी व त्याचे संरक्षण होण्यासाठी अ‍ॅन्टीऑक्सिडंट अत्यंत महत्वाचे समजले जातात. त्यामुळे मेंदू आणि मेंदूच्या पेशीसाठी डाळिंबाचा रस अत्यंत फायदेशिर आहे.

४ दाहक विरोधक : डाळिंबाच्या रसात दाहकता विरोधी गुणधर्म आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात तेलकट, तिखट, जंकफूड (बाहेरचे) खावे लागते व त्याचा परिणाम म्हणून पोटाच्या समस्या निर्माण होतात. प्रामख्याने आतडे व जठरात जळजळ होते किंवा अल्सरचा त्रास होतो. त्यासाठी नियमित डाळिंबाचा १०० मिली रसाचे सेवन केल्याने जळजळ कमी होऊन आराम मिळतो.

४ वजन नियंत्रण : डाळिंबाच्या दाण्यामध्ये (रसात) तंतुमय पदार्थाचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते व सुरळीतपणे आतड्यातून पुढे- सरकत जाते. पचनशक्तीमध्ये सुधारणा झाल्यामुळे आपले पोट दिवसभर भरल्यासारखे राहते. परिणामी आपण कमी खातो ज्यामुळे वजन वाढत नाही. सर्वसाधारणपणे एक कप डाळिंबाच्या रसातून ७ ते ८ ग्रॅम तंतुमय पदार्थ मिळतात.

४ कर्करोग : सध्याच्या काळात कर्करोग म्हणजेच हा घातक रोगापैकी असून त्यातून बाहेर येण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागतो. डाळिंबाच्या रसामध्ये असलेले अ‍ॅन्टीऑक्सिडंट हे कर्करोग विरोधी कार्य करतात. त्यामळे कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते. या रसातील अ‍ॅन्टीकॅन्सर गुणधर्म आपल्या शरीरात वाढणा-या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. ४ हृदयाचे आरोग्य: डाळिंबाचा रस आपल्या हृदयासाठी अत्यंत फायदेशिर आहे. डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने आपले हृदय निरोगी राहण्यास फायदा होतो. डाळिंबाच्या रसामुळे रक्तवाहिन्यामधील रक्त प्रवाह सुधारून सुरळीत होतो व रक्त वाहिन्या घट्ट होण्यापासून प्रतिबंध सुध्दा होतो. कारण यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे धमन्याची जाडी कमी होण्यास मदत होते.
४ उच्च रक्तदाब : डाळिंबाच्या रसात मॅग्नेशियम मुबलक प्रमाणत असते जी आपला रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यास अत्यंत प्रभावी ठरते. तसेच या रसात असलेले अ‍ॅन्टीऑक्सिडंट रक्त वाहिन्यामध्ये चरबी जमा होऊ देत नाहीत. त्यासाठी सतत १५ दिवस १५० मिली रस सेवन केल्यास रक्तदाब कमी होतो.

४ संक्रमण विरोधी : प्रामुख्याने पावसाळ्याच्या मोसमात अनेक संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. डाळिंबाच्या रसात प्रतिजैवीक गुणधर्म असल्यामुळे हा रस अनेक सामान्य (बुरशी, जिवाणू, विषाणू) संसर्गावर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध आहे. ४ हाडाचे आरोग्य : डाळिंबाचा रस कॅल्शियमने समृध्द असलेले आहे. कॅल्शियममुळे हाडाची मजबुती वाढण्यास फायदा होतो. विशेषत: वयस्कर माणसांमध्ये हाडाचा ठिसूळपणा वाढतो. तसेच रजोनिवृती नंतरच्या महिलांमध्ये हाडाची घनता कमी होण्याची समस्या दिसून येते. या समस्या कमी होण्यासाठी डाळिंबाचा रस अत्यंत फायदेशिर असतो.
कोलेस्टेरॉल : कोलेस्टेरॉल चरबीसारखा पदार्थ असून अनेक महत्वाच्या शारीरीक क्रिया व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक असतो. यामध्ये दोन प्रकार असून त्याचे संकुलन असणे अत्यंत गरजेचे असते. खराब, कोलेस्टेरॉलचा स्तर वाढल्यास हृदयाच्या समस्या निर्माण होतात. डाळिंबाच्या रसात असलेल्या तत्वामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होऊन चांगला कोलेस्टेरॉल वाढतो. त्यासाठी डाळिंबाच्या रसाच्या सेवनाने कोलेस्टेरॉलचे संतुलन राहण्यास मदत होते. ४ शारीरिक कार्यक्षमता : डाळिंबाच्या रसात नायट्रेटसचे प्रमाण मुबलक असते. ज्यामुळे रक्त प्रवाहात सुधारणा होऊन शारिरीक हालचाली सुलभ होण्यास फायदा होतो.

४ गर्भावस्था : गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान डाळिंबाचे त्याच्या रसाचे सेवन अत्यंत फायदेशिर असते. ज्यामुळे रक्ताची कमतरता भासत नाही. तसेच डाळिंबामध्ये फोलेट असते जे गर्भाशयात वाढणा-या बाळाच्या आणि गर्भवती महिलेल्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. त्याचप्रमाणे डाळिंबातील अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे गर्भधारणेदरम्यान प्लसेंटाचे संरक्षण होण्यास मदत होते.

४ तोंडाचे आरोग्य : ब-याच वेळा तोंडामध्ये हानिकारक जीवाणूची वाढ झाल्यामुळे तोंडाची दुर्गंधी येते. डाळिंबाच्या रसात/ दाण्यात दुर्गंधी कमी करण्याचे गुणधर्म आहेत. ४सुजविरोधी : अनेक वेळा अपघातामध्ये मुका मार लागतो किंवा किटक दंश झाल्यामुळे शरीरावर सुज येते व अतिव वेदना व जळजळ होते. डाळिंबाच्या रसात सूज विरोधी व वेदना शामक गुणधर्म आहेत. यात असलेल्या अ‍ॅन्टीऑक्सिडंटमुळे सुज कमी होऊन जळजळ सुध्दा कमी होते. टिप: वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

-प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या