19.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home विशेष विषाणू प्रसाराच्या ‘थिअरी’चा घोळ

विषाणू प्रसाराच्या ‘थिअरी’चा घोळ

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव कसा होतो, यासंदर्भात गेल्या काही दिवसांत नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे सांगण्यात येत असल्याने गांभीर्य वाढले आहे. काही शास्त्रज्ञांनी तर हा विषाणू हवेतून पसरतो, याचे पुरावे अभ्यासातून मांडलेही आहेत. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखणे आणि मास्कचा वापर हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (सीडीसी) ज्या प्रकारे या बाबतीत भूमिका बदलली, ते पाहता याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. सीडीसीने आधी सांगितले होते की, कोरोनाचा संसर्ग हवेतून पसरू शकतो. परंतु त्यानंतर हे वक्तव्य मागे घेतले. आता सीडीसीने पुन्हा एकदा हवेद्वारे संसर्ग पसरत असल्याचे नमूद केले आहे. अर्थातच, जर हवेतूनसुद्धा कोरोनाचा संसर्ग पसरत असेल, तर नागरिकांमध्ये घबराट निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेव्हा वायुप्रदूषण वाढते, तेव्हा प्रदूषणाचे कण कोरोना विषाणूंना हवेत तग धरून राहण्यासाठी सर्वाधिक मदत करतात, असे अनेक देशांच्या शास्त्रज्ञांनी अभ्यासांती सांगितले आहे.

कोरोना विषाणू केवळ संपर्कामुळे पसरतो, असे आतापर्यंत ढोबळपणे मानले जात होते. याखेरीज तोंडाच्या माध्यमातून कोरोनाचे विषाणू जमिनीवर पडतात आणि त्यापासून संसर्ग पसरण्याचा धोका फारसा नसतो. जर सुरक्षित अंतर राखले नाही, तर एका व्यक्तीमार्फत श्वासातून हवेत सोडले जाणारे विषाणू दुस-या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि तिलाही संसर्ग होतो, असे सांगितले गेले. परंतु आता नवेच वास्तव समोर आले असून, हवेतील कणांच्या माध्यमातून कोरोनाचे विषाणू पसरतात असे समोर आले आहे. हवेत असणारे विविध कण पाच मायक्रोमीटरपेक्षाही कमी आकाराचे असतात. हे कण हवेत सर्वत्र विखुरलेले असतात आणि श्वासामार्फत जे शिंतोडे बाहेर पडतात, त्यांच्या तुलनेत बराच काळ ते हवेत राहतात. नाका-तोंडावाटे निघणारे शिंतोडे काही वेळातच जमिनीवर पडतात. परंतु हवेत असलेले प्रदूषणाचे कण जमिनीवर येण्यासाठी सोळा ते अठरा तास लागू शकतात. अशा स्थितीत नाका-तोंडावाटे जे शिंतोडे उडतात त्यातील विषाणू हवेतील प्रदूषण कणांना चिकटून बसतात आणि हवेमार्फतच दुस-या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. जगभरात ज्या-ज्या ठिकाणी मोठ्या वेगाने संसर्ग पसरण्याची आणि संपर्काचा शोध घेण्याची प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न झाला, त्यातून हे स्पष्टपणे समोर आले आहे की, हवेतील कणाद्वारे पसरणारे विषाणू संसर्ग वेगाने पसरण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

हवेच्या कणांमधून विषाणू पसरतो या वास्तवास मान्यता देणारे विधान सीडीसीने जेव्हा मागे घेतले तेव्हा हवेतून विषाणूंचा प्रसार होतो की नाही, याबाबत मोठा वाद उद्भवला. १८ सप्टेंबर रोजी सीडीसीने आपल्या शिफारसी देताना प्रस्तावित परिवर्तनांचा एक मसुदा जारी केला होता. परंतु त्यावर चर्चा सुरू होताच नंतर २१ सप्टेंबर रोजी तो मागे घेण्यात आला. संसर्गग्रस्त रुग्णाच्या नाका-तोंडातून उडालेले सूक्ष्म थेंब म्हणजे शिंतोडे हवेच्या कणांचे स्वरूप धारण करतात. काही काळ ते हवेत तरंगत राहतात आणि विशिष्ट परिस्थितीत ते सहा फुटांपेक्षा अधिक अंतरापर्यंतही पसरतात. अशा दूषित हवेत श्वास घेणा-या निरोगी व्यक्तंना कोरोनाची लागण होऊ शकते, या गृहितकाला सीडीसीने आधी पुष्टी दिली होती. परंतु २१ सप्टेंबरला सीडीसीने जो नवा परामर्श जारी केला, त्यात विषाणूच्या संभाव्य वाहकांमध्ये हवेच्या कणांचा उल्लेख केलेला नव्हता. धक्कादायक बाब अशी की, आता सीडीसीने तिस-यांदा आपली भूमिका बदलली असून, हवेतून कोरोनाचा फैलाव होतो, हे मान्य केले आहे. एका पंधरवड्यात तीन वेळा सीडीसीने ज्याप्रकारे आपली भूमिका बदलली, त्यावरून त्याला अमेरिकेतील निवडणुकीच्या वातावरणाची पार्श्वभूमी असावी, असेही म्हटले जात आहे.

हवाई कणांमधून कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या सिद्धांताला स्वीकारार्हता खूप उशिरा मिळाली. वस्तुत: त्याचे शास्त्रीय पुरावे पूर्वीच समोर आले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ‘नेचर’ या विज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी पहिल्यांदाच असे सांगितले की, हा विषाणू वायुजनित माध्यमातून पसरू शकतो. हा लेख अशासाठी महत्त्वाचा आहे की, याच अध्ययनात संसर्ग पसरविणा-या कोरोना विषाणूची आनुवंशिक ओळख आणि अन्य वैशिष्ट्ये सर्वप्रथम सांगण्यात आली होती. हा विषाणू माणसांच्या पेशीत प्रवेश करण्यापूर्वी पेशीच्या बाहेरील आवरणाच्या संपर्कात येतो, हेही प्रथमच सांगण्यात आले होते. हवाई कणांच्या माध्यमातून संसर्ग पसरत असल्याचे वास्तव स्वीकारण्यास सीडीसीने विलंब केला. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) तर हवेतून कोरोनाचा प्रसार होत असल्याचे वास्तव जुलैमध्येच स्वीकारले होते आणि जगभरातील दोनशे शास्त्रज्ञांनी लिहिलेले पत्र त्यास कारणीभूत होते. हा विषाणू हवेतून पसरत चालला आहे, हे वास्तव स्वीकारण्याची गरज या शास्त्रज्ञांनी या खुल्या पत्रात व्यक्त केली होती.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जपानच्या किना-यावर डायमंड प्रिन्स या क्रूज शिपमधून प्रवास करणा-या साडेतीन हजारहून अधिक प्रवाशांपैकी १७१ लोक कोरोना संसर्गाने ग्रस्त असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि सिंगापूरमधील तुरुंग, वृद्धाश्रम, दक्षिण कोरियातील झुंबा-नृत्याची केंद्रे, ऑस्ट्रियामधील स्की-रिसॉर्ट आणि माऊंट वर्नोन आणि वॉशिंग्टनमधील एका चर्चमधून संसर्गाचा फैलाव झाल्याचे दिसून आले होते. या सर्व घटनांमध्ये जी साम्यस्थळे आणि सज्जड पुरावे मिळून आले, त्यामधून हा संसर्ग हवेमधूनच पसरला होता, असे स्पष्ट झाले. हवेतून संसर्ग पसरत असल्याचे पुढे आल्यानंतर हा संसर्ग सहा फुटांपेक्षा अधिक अंतरावरूनही एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे पोहोचतो, याचे पुरावे मिळाले. अशा स्थितीत लोकांना जास्तीत जास्त काळ मास्क वापरण्यास प्रोत्साहित करणे आणि लस उपलब्ध झाल्यानंतरसुद्धा मास्कचा वापर सुरू ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. हे सुरक्षिततेचे एक अतिरिक्त कवच ठरू शकते. हवेतून संसर्ग फैलावतो, या सिद्धांताला डब्ल्यूएचओ आणि सीडीसीने लवकर मान्यता दिली असती तर वेळीच सावधगिरी बाळगण्याच्या हेतूने लोकांना मास्क परिधान करण्यास लवकर प्रवृत्त करता आले असते आणि संसर्गाचा प्रसारही रोखता आला असता.

अर्थात हवेतून विषाणूचा फैलाव होतो, हे वास्तव उघड झाले म्हणून नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. कारण आता हेही स्पष्ट झाले आहे की, मास्कचा वापर केल्यामुळेच संसर्ग रोखता येऊ शकतो आणि मास्क वापरूनसुद्धा कुणाला संसर्ग झालाच तरी त्या व्यक्तीमध्ये विषाणूंची संख्या खूपच कमी असते आणि त्या व्यक्तीमध्ये लक्षणेही दिसून येत नाहीत.

-विनायक सरदेसाई

गरज निकष बदलण्याची

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

माधवराव, राजेशभाई, विलासराव,आर. आर. आबा, पतंगराव, आता अहमदभाई…

अहमदभाई गेले! ७१ वय हे अलीकडे जाण्याचे नाही. कोरोनाने अनेक चांगली माणसे नेली. जेवढी गेली, त्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहेच. सर्व माणसे कुटुंबासाठी महत्त्वाची...

चैतन्याचा मोहोर फुलवणारी पावन भूमी : हत्तीबेट महात्म्य

चैतन्याचा मोहोर फुलवणारी आणि प्रसन्नतेची भूपाळी गात पहाट उजळणारी पवित्र, पावन भूमी म्हणजे हत्तीबेट तीर्थक्षेत्र होय. या हत्तीबेटाचे महात्म्य ओवी रूपातून रसाळपणे आणि भावपूर्ण...

‘कायदा’च ‘बेकायदा’!

उत्तर प्रदेश सरकार कथित ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा करणार असून त्याबाबतचा अध्यादेश नुकताच काढण्यात आला आहे. ‘बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०’ असे या कायद्याचे नाव...

वारस

अरेरे... महाभयानक परिस्थिती! चितेला अग्नी देण्यासाठी वारसदार शोधण्याची वेळ आली. गडगंज संपत्ती पडून आहे आणि त्यासाठी वारस शोधायचा आहे, असे चित्र दिसले असते तर...

प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे…

महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक वळसे-वळणे पाहिली आहेत. या सर्वांमधील एक मोठे वळण गतवर्षी २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्याने पाहिले. ते म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना आणि मित्रपक्ष...

ये जो पब्लिक है….

नेतेमंडळी जातींचे राजकारण करीत असल्यामुळे त्यांच्या जाती जगजाहीर असतात. परंतु त्यांच्या स्वभाववृत्तीबद्दल माहिती मिळविणे अवघड असते. एकतर बहुतांश नेते वस्तुत: चांगले अभिनेते असतात. त्यामुळे...

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...