23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeविशेषअब की बार...

अब की बार…

एकमत ऑनलाईन

गतसप्ताहातील सदराच्या शीर्षकात नमूद केल्याप्रमाणेच भारतीय शेअर बाजाराच्या दोन्हीही निर्देशांकांमध्ये पाचही सत्रांमध्ये भरारी घेण्यासाठीचा आटापिटा दिसून आला. या प्रयत्नांना अखेरीस यश आले; पण ते अल्पजीवी ठरले. शुक्रवारी राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टीने १५,९६२.२५ ही सर्वकालीन उच्चांक पातळी गाठली होती. तथापि दिवसाखेरीस त्यामध्ये घसरण होत निफ्टी १५,९२३.४० अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सही या दिवशी ५२,९९७.०९ या सर्वकालीन उच्चांक स्तरावर पोहोचला होता; पण अखेरीस तो ५३,१४०.०६ अंकांवर बंद झाला. त्यामुळे निफ्टी १६ हजारांची पातळी कधी गाठणार या प्रश्नाची उत्सुकता आजही कायम राहिली आहे. गत आठवड्यातील तीन दिवसांमध्ये शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य २.२२ लाख कोटी रुपयांवर गेले आहे. गत सप्ताहात सेन्सेक्स ७५३ अंकांनी, तर निफ्टी २३३.६० अंकांनी वधारला आहे. मेटल, बँकिंग, आयटी आणि रिअल इस्टेट कंपन्यांच्या समभागांसह स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. तिमाही निकालांमुळे बाजाराची चढती भाजणी चालू आठवड्यातही कायम राहणार आहे.

मागील काळात शेअर बाजार जेव्हा वेगाने घोडदौड करत होता तेव्हा त्यामध्ये मेटल क्षेत्राने मोठी भूमिका बजावली. तथापि, गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मेटलची रॅली संपुष्टात आल्यासारखी स्थिती होती. चीनने घेतलेल्या काही निर्णयांमुळे धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात घसरण झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून धातू उत्पादन क्षेत्रातील सर्वच कंपन्यांचे समभाग वेगाने घोडदौड करत आहेत. चालू आठवड्याचा विचार करता नाल्को, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील यांबरोबरीने एनएमडीसी आणि सेल या कंपन्यांचे समभाग जबरदस्त फायदा मिळवून देऊ शकतात. भारतातील वॉरेन बफेट म्हणून ओळखल्या जाणा-या राकेश झुनझुनवाला यांनी सेलचे २ कोटींहून अधिक समभाग खरेदी केल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे सेलचे समभाग वेगाने वाढले. ही घोडदौड या आठवड्यात आणखी गतिमान होईल. पश्चिमेकडील देश मायनिंगवर ४५ टक्के कर लावण्याच्या विचारात आहेत. तसे झाल्यास भारतीय धातू कंपन्यांना आपले दर आणखी वाढवता येणार आहेत. त्यामुळे येणा-या काळाचा विचार करता धातू क्षेत्रातील गुंतवणूक ही निश्चितपणाने नफा मिळवून देणारी ठरेल, यात शंका नाही. नाल्कोचा समभाग लवकरच नव्वदी आणि त्यानंतर शंभरी पार करण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. तो आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करायला विसरू नका.

शेअर बाजाराला चालू आठवड्यात तेजीचा बूस्टर देण्यास काही अधिग्रहणाचे करारही कारणीभूत ठरतील. रिलायन्सने जस्ट डायलमधील ६६ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. हियरिंग स्टारबक्स आणि लार्सनही काही अधिग्रहण करणार असल्याची चर्चा आहे. टाटा पॉवरने एचपीसीएलसोबत एका सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. यानुसार जवळपास १८००० पेट्रोल पंपांवर टाटा पॉवरद्वारे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. भेल जगातील सर्वांत मोठा इलेक्ट्रिक वाहन बॅटरी प्लेअर बनण्याची शक्यता आहे. यादृष्टीने विचार करता या दोन्हीही समभागांमध्ये दीर्घकालीन बक्कळ नफ्याच्या हमीने गुंतवणूक करा. केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठीच्या योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे टेक्स्टाईल कंपन्यांच्या समभागांनी मोठी उसळी घेतली आहे. त्यादृष्टीने पाहता अरविंद, बॉम्बे डाईंग, गोकलदास या कंपन्यांचे समभाग घसरणीच्या काळात खरेदी करायला विसरू नका. वेलस्पून इंडियाचा समभाग १५० रुपयांचे मध्यमकालीन लक्ष्य ठेवून खरेदी करावा.

केवळ ६ जण कोरोना बाधित

रिअल इस्टेटच्या क्षेत्राचा विचार करता गोदरेज प्रॉपर्टीज, प्रेस्टिज प्रॉपर्टीज यांबरोबरच डीएलएफमधील खरेदी निश्चितपणाने फायदा मिळवून देईल. याखेरीज कोलते-पाटील डेव्हलपर्सचा समभाग २७५ रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करा. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग येणा-या काळात २२०० रुपयांचे लक्ष्य ठेवून खरेदी करावा. त्याचबरोबर वोडाफोनच्या समभागातही मोठी तेजी दिसून येण्याची शक्यता आहे.

देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर ६.५ ते ७ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. शेअर बाजाराचा गाढा अनुभव व अभ्यास असणा-या अनेकांकडून येणा-या चार ते पाच वर्षांत निफ्टी ३० हजारांच्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय अर्थव्यवस्था तेजीने घोडदौड करताना येणा-या काळात दिसून येईल. गेल्या एक महिन्यात भारतात १६ हजार नव्या व्यवसाय करणा-या कंपन्यांची नोंदणी झाली आहे. हा आकडा गतवर्षी जून २०२० मध्ये नोंदणी झालेल्या कंपन्यांपेक्षा २६ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी छोट्या-मोठ्या पडझडींमुळे घाबरून न जाता खरेदी करून फायद्याची संधी साधावी.

संदीप पाटील,
शेअर बाजार अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या