23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषमाजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून अ‍ॅड. हसन पटेल यांना श्रद्धांजली

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून अ‍ॅड. हसन पटेल यांना श्रद्धांजली

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
माजी आमदार पाशा पटेल यांचे चिरंजीव अ‍ॅड. हसन पटेल यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले आहे. यानिमित्ताने दि. ४ सप्टेंबर रोजी औसा तालुक्यातील लोदगा येथील फिनिक्स फाऊंडेशन येथे आयोजित श्रद्धांजली सभेस राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सहका-यांसह उपस्थित राहून अ‍ॅड. हसन पटेल यांच्या कबरीवर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

शेतक-यांचे नेते पाशा पटेल हे सर्वांच्या जिवाभावाचे मित्र आहेत. देशमुख कुटुंबीयांसोबतही त्यांचा स्नेह आहे, उच्चशिक्षित हसन यांच्या आकस्मित जाण्याने पटेल कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दु:खात देशमुख कुटुंबीय सहभागी आहे, असे नमूद करुन पटेल कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी, अशी प्रार्थना श्रद्धांजली सभेत बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली. यावेळी औसाचे आमदार अभिमन्यू पवार, कळवण नाशिकचे आमदार दिलीप बोरसे, माजी खासदार भूपेंद्रसिंग मान, राजस्थान येथील शेतकरी नेते रामपाल जाट, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, परवेज पाशा पटेल, अमर पाशा पटेल, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अ‍ॅड. समद पटेल, बाजार समितीचे माजी सभापती ललितकुमार शहा, अ‍ॅड. फारुक शेख, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, गणेश हाके, माजी महापौर सुरेश पवार, लोदगा गावचे सरपंच पांडुरंग गोमारे, आसिफ बागवान, मैनोद्दीन शेख आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक पटेल कुटुंबीय मित्र परिवार उपस्थित होते.

आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले की अ‍ॅड. हसन पाशा पटेल हे आपल्यातून निघून गेले आहेत. पटेल कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे, पटेल यांच्या कुटुंबासाठी आपण एकत्र आलो आहोत. माजी आमदार पाशा पटेल हे आपल्या सगळ्यांचे जीवाभावाचे आहेत त्यांचे देशमुख कुटुंबीय यासोबत पारिवारिक संबंध आहेत. लोकनेते विलासराव देशमुख यांचा जीव त्यांच्यावर होता हे सगळ्यांना माहित आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारे माजी आमदार पाशा पटेल ओळखले जातात. सामान्य माणसासाठी ते काम करीत असतात आम्ही सर्वजण पटेल कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. अ‍ॅड. हसन यांनी मुंबई उच्च न्यायालयात काम केले आहे. हसन यांनी पटेल परिवाराचे नाव उंचावण्याच काम केल आहे. देशभरातून आज लोक येथे आलेले आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाणा येथून लोक आले आहेत. पटेल कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची ईश्वर शक्ती देवो, असे सांगून आम्ही सर्वजण कायम माजी आमदार पाशा पटेल यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी माजी खासदार भूपेंद्रसिंग मान, शेतकरी नेते रामपाल जाट, ठाकुर, गणेश हाके, औसाचे आमदार अभिमन्यू पवार, कळवण नाशिकचे आमदार दिलीप बोरसे आदींनी आपले मनोगत व्यक्त करुन अ‍ॅड. हसन पाशा पटेल यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या शोकसभेचे सूत्रसंचालन व आभार गालिब शेख यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या