Wednesday, September 27, 2023

आयुर्वेदिक ब्रह्मकमळ

ब्रह्मकमळ ही एक आयुर्वेदीक औषधी वास्पती असा बहुवर्षायु (अनेक वर्षे जगणारी) एक लहानसे क्षुप आहे या झुडपाची सर्वसाधारण उंची २ ते ३ मीटर इतकी असते. मात्र आधार दिल्यास किंवा मिळाल्यास ५ मीटर पर्यंत उंच वाढू शकते. या वनस्पतीचे मुख्य खोड डेरेदार व फांद्या सपाट पानासारख्या असतात पण पर्णहिन असतात. या वनस्पतीचा पानासारखा दिसणारा मांसल, लांबट, हिरव्या रंगाचा भाग म्हणजेच या वनस्पतीचे हे रूपांतरीत खोड असून शास्त्रीय भाषेत त्याला पर्णकांड असे म्हणतात. या पर्णकांडाला दोन्ही कडांना खाचा असतात आणि या खाचेतूनच नवीन फांद्या (पानासारख्या) आणि मोठ्या आकाराची, पांढ-या रंगाची आणि मंद सुगंध असलेली फुले येतात.

ब्रह्मकमळ हे उपोष्ण आणि समशितोष्ण कटिबंधीय प्रदेशात वाढणारे निवडुंगाच्या वर्गातील पण बिनकाटेरी एक खूप आहे. निवडुंगाच्या कुळात जन्मलेली ही जात बागेची शोभा वाढविण्यासाठी भारतात आणली गेली व त्यामुळेच आज ब्रह्मकमळ ही वनस्पती जवळ-जवळ सर्व घरांमध्ये कुंडीत लावलेली आढळते. भारतात या वनस्पतीची लागवड सर्वत्र केलेली दिसून येते. ब्रह्मकमळ हे फूल धर्मामध्ये पवित्र समजले जाते.

खरे ब्रह्मकमळ आपल्याकडे जे ब्रह्मकमळ म्हणून परिचित असलेले फुल हे मुळात खरे ब्रह्मकमळ नाही आहे. तो एक निवडुंगाचा प्रकार आहे. खरे ब्रह्मकमळ भारताच्या पश्चिम दिसेला हिमालयात समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० मीटर पेक्षा जास्त उंचीवर खडकाळ व डोंगराळ भागात आढळते. याचे शास्त्रीय नाव सौसुरिया ओबव्हॅलाटा (Saussurea abvallata) असे आहे. ही वनस्पती सुर्यफुल कुळातील (एस्टरेसी Asteraceae) आहे. भारताचे सत्ताविसावे राज्याने (उत्तराखंड) फुलाला राज्यफुलाचा दर्जा दिलेला आहे. तसेच १९८२ मध्ये भारतीय टपाल खात्याने या फुलाचे पोस्टाचे तिकिट काढले आहे. या फुलाला लोटस ऑफ गॉड किंग, द किंग ऑफ हिमालय फ्लॅवर्स असेही म्हणतात.

Read More  वॉर रूम, टोल फ्री क्रमांकाचा नागरिकांनी फायदा घ्यावा

भारतामध्ये ब्रह्मकमळ हे फक्त काश्मीर, हिमाचल प्रदेश, गढवाल, चामोली, हेमकुंड व सिक्कीम या ठिकाणी आढळते. भारताशिवाय ही वनस्पती भूतान, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तान या देशामध्ये तुरळक प्रमाणात आढळते. ब्रह्मकमळ ही वनस्पती सुमारे ३० सें.मी. पेक्षा जास्त उंच वाढते. हे खरे ब्रह्मकमळ नसून तो एक प्रकारचा फुलोरा किंवा पुष्पविन्यास आहे. या वनस्पतीचे खोड पोकळ असून लालसर गुलाबी रंगाचे असते. याची पाने उभट प्रकारची, लांब आणि दंतूर कडा असलेली असतात. फुले लहान असून पांढरट पिवळसर सहपत्रानी आच्छादलेली असतात. ही कागदी सहपत्रे बोटीच्या आकाराची असून प्रदल मंडळात गुंडाळल्या सारखी दिसतात. हिमवृष्टीतही मुख्य फुलाच्या आतील तीन चार फुलाचे संरक्षण करण्यासाठी ही रचना असते. फुलोरे आकर्षक असून त्यांना तीव्र प्रकारचा गंध असतो.

उपयोग :
१) डोकेदुखी (मायग्रेन) च्या समस्येवर ब्रह्मकमळ अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी याच्या फुलांचा गुलकंद तयार करावा. हा तयार केलेला गुलकंद पाव चमचा घेऊन वाटीभर पाण्यात विरघळावा व त्यानंतर गुलकंद विरघळलेले पाणी प्यावे असे नियमितपणे कांही दिवस दररोज दोन वेळा सकाळ-संध्याकाळ घेतल्यास तीव्र डोकेदुखीचा त्रास कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते.
२) यकृत वृध्दीचा समस्येवर ब्रह्मकमल फुल अत्यंत उपयोगी औषधी आहे. त्यासाठी या वनस्पतीची फुले (सुकलेली) जाळून त्याची राख तयार करावी. ही राख मधाबरोबर रुग्णाला सेवन करण्यास द्यावी. त्यामुळे यकृताची झालेली वृध्दी कमी होण्यास मदत होते.
३)मुका मारामुळे सूज येऊन होणा-या वेदनावर ब्रह्मकमळ अत्यंत उपयोगी आहे. त्यासाठी या वनस्पतीच्या ताज्या मुळ्या स्वच्छ धुवून व बारीक वाटून त्याचा लगदा तयार करावा हा तयार केलेला लगदा मुका मार लागलेल्या भागावर लेप करावा. त्यामुळे वेदना व सूज लवकर कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते.
४) जखम लवकर दुरूस्त होण्यासाठी ब्रह्मकमळाचे फुल अत्यंत उपयुक्त औषधी आहे. त्यासाठी या वनस्पतीच्या ताज्या फुलाच रस तयार करावा. हा तयार केलेला रस जखमेवर वारंवार लावावा त्यामुळे जखमेतील जंतूसंसर्ग लवकर कमी होऊन जखम बरी होण्यास फायदा होतो.
५) भाजणे किंवा पोळणे या समस्येवर ब्रह्मकमळ अत्यंत उपयुक्त आहे. ब-याच वेळा महिलांना स्वयंपाकघरात भाजते किंवा पोळते अशा वेळी या वनस्पतीच्या सुकलेल्या पानांना उकळावे त्यात थोडे मीठ टाकून पुन्हा उकळून व थंड करून जखमेवर लावल्यास फायदा होतो.
६) मिर्गी/ अपस्मार या विकारावर ब्रह्मकमळ अत्यंत महत्त्वाचे औषध आहे. हा एक मानसीक आजार असून या आजारामध्ये रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता झटका येतो व शुध्द हरपते अशा वेळी या ब्रह्मकमळ फुलाचे तेल डोक्यावर लावून मालिश करावे. त्यामुळे मिर्गी सारखा मानसिक विकारापासून मुक्ती मिळते.
७) कर्करोगासारखा असाध्य रोगावर ब्रह्मकमळ हे उत्तम औषधी आहे. त्यासाठी ब्रह्मकमळाची फुले सुकविली जातात व नंतर त्यापासून औषध तयार केले जाते ज्यामुळे कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा होण्यास लाभदायक होते.
८) ताप (ज्वर) कमी होण्यासाठी ब्रह्मकमळ अत्यंत गुणकारी औषधी आहे. कोणत्याही आजारामध्ये ताप येतो व त्यामुळे अन्न खावे वाटत नाही अशा वेळी ब्रह्मकमळाची फुले गोळा करून त्याचा अर्क तयार करावा हा तयार केलेले अर्क एकच चमचा दिवसातून दोन वेळा घेतल्यास ताप दूर होण्यास मदत होते.
९) भूक लागत नसेल तर याचे सेवन अत्यंत फायद्याचे आहे. ब्रह्मकमळाच्या फुलांमध्ये (पाकळ्यामध्ये) अनेक पोषक व पौष्टिक तत्व आहेत त्याचे सेवन केल्यास भूक लागते. त्यासाठी कोणत्याही आजारामध्ये भूक लागत नसल्यास रुग्णाला या फुलांच्या पाकळ्या खायला दिल्यास लाभदायक होते.
१०) सर्दी-खोकल्यासारख्या सामान्य पण त्रासदायक समस्येवर ब्रह्मकमळ अत्यंत गुणकारी औषधी आहे. सर्दी-खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तींनी या फुलातील पाकळ्याचे सेवन केल्यास सर्दीखोकला कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते. ११) पित्ताशयामधील संक्रमणावर ब्रह्मकमळ अत्यंत उपयुक्त आहे. ब-याच वेळा पित्ताशयामध्ये जंतूसंसर्गामुळे सूज येते. त्यासाठी ब्रह्मकमळाची ताजी फुले स्वच्छ धुवून त्याचे सुप तयार करून रुग्णाला दिल्यास सुज कमी होण्यास मदत होते.
१२) गुलकंद – जुलै ते ऑगस्ट महिन्यात ब्रह्मकमळाला भरपूर फुले येतात व रात्री उमलतात आणि उजाडेपर्यंत कोमेजून जातात. ही ताजी फुले रात्रीच गोळा करून स्वच्छ धुवून बारीक तुकडे करावीत. ही बरणी अधून मधून सुर्यप्रकाशात ठेवावी व कोरड्या चमच्याने ढवळावी सुमारे दोन महिन्यात त्याचा खाण्यालायक गुलकंद तयार होतो.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

Read More  वॉर रूम, टोल फ्री क्रमांकाचा नागरिकांनी फायदा घ्यावा

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या