21.9 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home विशेष आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

एकमत ऑनलाईन

शिंगाडा ही वेल जलचर (पाण्यात वाढणारी) असून ती उष्ण आणि समशितोष्ण हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढते. या वेलीचे मुळस्थान ज्यास्त तापमानात असलेल्या युराशिया (युरोप आणि आशिया) प्रांतात असावे असा अंदाज आहे. येथून या वेलीचा प्रसार ऑस्ट्रेलिया, आमेरिका, इंडोनेशिया, भारत , पाकिस्तान , बांगलादेश, श्रीलंका ,थायलंड, चीन, या देशात झाला. भारतामध्ये जवळजवळ ३००० वर्षापासून या पिकाची लागवड करून उत्पादन घेतले जाते. गुजरात राज्यात ही वेल तलावामध्ये विपूल प्रमाणात आढळते. तसंच सुरतच्याजवळ तलावात याची लागवड करतात. महाराष्ट्रात या वेलीची ठाणे, कुलाबा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात लागवड केली जाते.

शिंगाडा पिकाची लागवड प्रामुख्याने चिखलात, पाणी असलेल्या ठिकाणी, भात खाचरात, तलावात किंवा बांध घालून केलेल्या बोडी (छोटे छोटे तलाव) आणि बांधीमध्ये केली जाते. पिकाची लागवड झाल्यानंतर ४५ ते ६० दिवसात फुले येतात व नंतर फळधारणा होऊन २० ते ३० दिवसात फळे काढणीला तयार होतात. फळाची प्रत्येक १५ दिवसांनी काढणी केली जाते. सप्टेंबरच्या शेवटीशेवटी काढणीला सुरूवात होते. पहिल्या काढणीत सरासरी २ ते ३ क्विंटलपर्यत उत्पादन मिळते. प्रत्येक १५ दिवसांनी जानेवारी अखेरपर्यंत सात वेळा फळाची तोडणी केली जाते. दुस-या काढणीनंतर प्रत्येक वेळा ५ ते ६ क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळते. शिंगाडा फळामध्ये प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्व-ब आणि क लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सारखे खनिजे, रायबोफ्लेविन भरपूर प्रमाणात आढळतात.

आयुर्वेदानुसार शिंगाडामध्ये म्हशीच्या दुधापेक्षा २२टक्के जास्त खनिजे व अल्कली घटक असतात. त्यामुळे आयुर्वेदीक औषधीमध्ये याचा जास्त वापर होतो त्यामुळे याचा आपल्या आहारात समावेश केल्यास आजार होतच नाहीत. शिंगाडयाचे नियमित सेवन केल्याने शरिरात उर्जा वाढण्यास मदत होते. यामध्ये तुलनेने पिष्टमय पदार्थ कमी असले तरी १०० ग्रॅम शिंगाडामध्ये ११५ कॅलरी उष्मांक मिळतात. ज्यामळे कमी खाऊन सुध्दा पुरेशा अन्न खाल्याचे काम करते. आजकाल उच्च रक्तदाब ही एक मोठी समस्या झाली आहे. ज्यामुळे हृदयविकार, पक्षाघात किंवा किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो आहे. शिंगाडामध्ये पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असते. ज्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रीत राहतो. हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी शिंगाड्याची नियमित सेवन करणे अत्यंत फायदेशिर असते.

गहू, हरभरा व ज्वारीसाठी विमा योजना लागू

शिंगाडामध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रीत होतो. व तसेच रक्तवाहिन्यामधील रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी यातील पोषक घटकांची मदत होते. शिंगाडामध्ये कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शिंगाड्याचा आहारातील वापर हाडे आणि दात मजबुत होण्यास लाभादायक होतो. तसेच यामध्ये फॉस्फरसची मात्रा सुध्दा चांगली असते. फास्फरस दाताच्या मजबुतीसाठी आवश्यक असतो. गरोदरपणामध्ये शिंगाडा खाणे अत्यंत उपयुक्त असते कारण यामुळे गरोदरपणात वाढणा-या उच्य रक्तदाब नियंत्रीत ठेवण्यास मदत होते.शिंगाडा खाल्याने आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते व गर्भाची वाढही चांगली होते तसेच तसेच गर्भपाताचा धोकाही कमी होतो.

या व्यतिरिक्त शिंगाडा खाल्याने मासीक पाळीमध्ये उद्भवणा-या समस्या सुध्दा कमी होतात. ब-याच वेळा पायांच्या टाचांना भेगा पडतात त्यामुळे चालताना अतिव वेदना होतात. शिंगाड्यामध्ये मँगनीज आणि जीवन सत्वाचे प्रमाण जास्त असते. (टाचा भंगल्याची समस्या शरीरातील मँगनीजची कमतरतेमुळे होते) त्यामुळे शिंगाड्याचे नियमित सेवन केल्याने शरीरात मँगनीजच्या कमतरता भासत नाही व शरीर निरोगी राहते. शिंगाडामध्ये सुजविरोधी व वेदनाविरोधी गुणधर्म आहेत. शरिरावर मुक्का मार लागल्यावर सुज येते व वेदना होतात. त्यासाठी शिंगाडा फळे बारीक वाटुन पाण्यामध्ये मिसळून त्याची पेस्ट (लगदा) तयार करावी. ही तयार केलेली पेस्ट सुज आलेल्या भागावर लेप करावी त्यामुळे सुज व वेदना कमी होऊन आराम मिळण्यास मदत होते.

शिंगाड्यामध्ये जीवनसत्व ब -६ डोळ्याच्या इतर समस्येबरोबरच वयाशी निगडीत मॅक्युलर अपघटन (हास) कमी होण्यासाठी मदत करतात. मॅक्यूला आपल्या डोळ्याच्या समोर येणा-या कोणत्याही वस्तुला शोधण्यासाठी मदत करतो. त्यामुळे डोळ्याच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या आहारात शिंगाड्याच्या अवश्य समावेश करावा. शिंगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. या तंतुमय पदार्थाचा दररोजच्या आहारात नियमित समावेश असणे अत्यंत गरजेचे असते त्यामुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते. त्यामुळे मुळव्याधीच्या समस्येमध्ये बध्दकोष्ठताचा त्रास होऊन शौचास नीट होत नसल्यास शिंगाड्याचा आहारातील वापर फायद्याचा होतो. वाढते वजन आणि लठ्ठपणामुळे अनेक आजाराचा सामना करावा लागतो. यातील समृध्द तंतुमय पदार्थामुळे आणि प्रथिनामुळे लठ्ठपणाची समस्या कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर दुसरी बाजू म्हणजे सडपातळ व्यक्तीसाठी वजन वाढवून शक्तीशाली होण्यास मदत करतात. शिंगाडामध्ये जीवाणू विरोधी गुणधर्म आहेत.

गहू, हरभरा व ज्वारीसाठी विमा योजना लागू

जीवाणूसारखे सुक्ष्मजीव शरीरामध्ये लवकर पसरतात व त्यामुळे अनेक आजरांना सामोरे जावे लागते. शिंगाडाच्या सेवनामुळे यातील जीवाणू विरोधी गुणधर्मामुळे जीवाणूची वाढ थांबण्यास मदत होते. शिंगाडा फळामध्ये पित्त-शामक, थंड आणि तुरट गुणधर्म आहेत ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यासाठी मदत होते. पित्त वाढल्यामळे त्वचा काळी पडणे, चेह-यावर मुरमे (फोड) येणे किंवा त्वचेत जळजळ होणे अशा समस्या उद्भवतात त्यासाठी शिंगाडाचे सेवन तर करावेच पण त्याची पेस्टी त्वचेवर लावावी. शिंगाडामध्ये पोटॅशियम, झींक, जीवनसत्व-ब आणि ई सारखे पौष्टिक घटक असतात जे केसांसाठी फायदेशिर असतात. पित्त दोषामुळे केस कमकुवत होणे व केस गळणे असे प्रकार होतात अशा वेळी शिंगाडाच्या सेवनाने केसांच्या मूळांना पोषण मिळण्यास मदत होऊन केस मजबूत होऊन केस गळती थांबते. पित्ताचे असंतुलन झाल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित न होणे, किंवा भूक न लागणे अशा समस्या निर्माण होतात अशा वेळी पाचकाग्नि मंद होतो.

त्यासाठी शिंगाड्याचे सेवन केल्यास पाचन तंत्र कार्यान्वीत होण्यास मदत होते. ब-याच लोकांच्या हिरड्या सुजतात किंवा त्यातून रक्त येते त्यांनी शिंगाडयाचे सेवन अवश्य करायला हवे त्यामळे पायरिया सारख्या आजाराचा धोका कमी होतो व तसेच हिरडयांची नैसर्गीक धमक सुध्दा वाढण्यास मदत होते. टिप:- वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

एक भन्नाट क्रांतिकारी तंत्रज्ञान

एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात रोबोटिक्स, स्वयंंचलित (ड्रायव्हरविना) वाहने, नॅनो टेक्नॉलॉजी, प्राण्याशिवाय मांस, स्टेम सेलच्या आधारे औषधोपचार आणि थ्रीडी...

अलिप्ततेतच शहाणपण

रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसीईपी) नावाचा करार जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्यासह १५ देशांनी केला आहे. भारताने मात्र गेल्या वर्षी या करारात सहभागी...

यातला एक तरी ….काँग्रेसचा नेता होऊ शकेल?

बिहार निवडणुकीचे निकाल लागले. नितीशकुमारांना शिक्षा मिळाली. दुय्यम भूमिका घ्यावी लागली. ज्या रुबाबात २०१५ साली मुख्यमंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली होती तो रुबाब यावेळी त्यांच्या...

नितीश कुमारांचा काटेरी मुकूट

‘बिहार में बहार बा, फिरसे नितीशकुमार बा’ असा नारा एके काळी नितीशकुमारांचे निवडणूकविषयक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला होता. परंतु आज प्रशांत किशोर नितीशकुमार...

दीदींना ‘टक्कर’

बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. प्रमुख मुकाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...