23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषबाबा वांगा आणि त्यांची भविष्यवाणी

बाबा वांगा आणि त्यांची भविष्यवाणी

एकमत ऑनलाईन

फ्रान्सचा जगद्विख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेम्स याने शतकांपूर्वी आपल्या ‘लेस प्रोफेटिस’ या प्रसिद्ध पुस्तकात अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. अनेकांच्या मते या भविष्यावाण्या ख-याही ठरल्या आहेत, ठरत आहेत. सन २०२१ मध्ये दुष्काळ, जागतिक महामारी यासारखी संकटे येणार असल्याची भविष्यवाणी नॉस्ट्राडेम्सने केली असल्याचे सांगण्यात आले. अनेकांनी या भविष्यवाणीला कोरोना महामारीशी जोडून पाहिले. हिटलर सत्तेचा उदय, फ्रेंच राज्यक्रांती, दुसरे महायुद्ध, ११ सप्टेंबरचा दहशतवादी हल्ला आणि अणुबॉम्बचा विकास यासारखी त्याची अनेक भाकिते तंतोतंत खरी ठरली.

तसेच कोरोना साथीच्या आजाराचा अंदाज वर्तवला होता. वार्षिक कुंडलीनुसार, त्याचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त अंदाज आतापर्यंत खरे झाले आहेत. आता नॉस्ट्राडेम्सप्रमाणे बल्गेरियाच्या मॅसेडोनियात ३ ऑक्टोबर १९११ मध्ये जन्मलेल्या बाबा वांगांच्या भविष्यवाण्या ख-या ठरत असल्याचे बोलले जाते. विशेषत: जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या बाबा वांगांची सोशल मीडियापासून ते सर्व ठिकाणी चर्चा होत आहे. बाबा वांगा ख-या अर्थाने चर्चेत आल्या त्या भारताविषयी केलेल्या भविष्यवाणीमुळे. बाबा वांगा यांनी यंदा भारतात उपासमारीचा अंदाज वर्तविला होता. सन २०२२ मध्ये जगभरातील तापमानात घट होईल आणि त्यामुळे टोळांचा प्रादुर्भाव वाढेल, जो भारतावरही हल्ला करेल. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय भारतात तीव्र उपासमारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

बाबा वांगा यांनी १११ वर्षांपूर्वी ही भविष्यवाणी केली होती, ज्याबद्दल जगभरात भीतीचे वातावरण आहे. बाबा वांगा यांनी २०२२ वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी २ आतापर्यंत ख-या ठरल्या आहेत, त्यानंतर आता २०२३ च्या भविष्यवाण्यांवर चर्चा होत आहे. बाबा वांगांच्या भविष्यवाणीनुसार, २०२३ मध्ये पृथ्वीची कक्षा बदलेल, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याशिवाय २०२८ साली अंतराळवीर शुक्र ग्रहावर प्रवास करणार आहेत. बाबा वांगांच्या भविष्यवाणीनुसार, २०४६ मध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या मदतीने लोक १०० वर्षांहून अधिक जगू शकतील. बाबा वांगा यांनी २०२२ या वर्षासाठी एकूण ६ भाकिते केली होती, त्यापैकी २ आतापर्यंत खरी ठरली आहेत.

ऑस्ट्रेलियाशिवाय बाबा वांगा यांनी काही आशियाई देशांमध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवली होती आणि ऑस्ट्रेलियात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर पाकिस्तानमध्ये आलेल्या पुरामुळे १३०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय अनेक शहरांमध्ये पाणीटंचाईचा अंदाज त्यांनी वर्तवला आणि पोर्तुगालमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे, तर इटलीमध्ये दुष्काळाचे सावट आहे. याशिवाय बाबा वांगा यांनी सायबेरियातून २०२२ मध्ये नवीन प्राणघातक विषाणूचा उदय होण्याची भविष्यवाणी केली होती. यासोबतच परग्रहवासींचा हल्ला, टोळांचे आक्रमण आणि आभासी वास्तवात वाढ होण्याचीही भविष्यवाणी केली. भारतात, जेथे तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचते आणि टोळांमुळे पिकांचे नुकसान होते असे म्हटले जाते, तेथे बाबा वांगा यांनी देखील दुष्काळाचा अंदाज घेतला होता. आता यावरून अंदाज घ्यायचा असल्यास गतवर्षी राजस्थानसह पंजाबमधील काही भागात पाकिस्तान मार्गे टोळांचे आक्रमण झाले. हे आपणही पाहिले.

दरम्यान बाबा वांगा यांनी भारतातील प्रदूषणावरून काही भाकिते केली असून त्यात असे म्हटले आहे की प्रदूषणावरून अनेक प्रकारच्या आजारांची उत्पत्ती होणार आहे. यावर बोलायचे झाले तर नुकतेच डब्ल्यूएचओने भारतात दिल्ली हे शहर सर्वाधिक प्रदूषित असल्याचा अहवाल जारी केला आहे. किंबहुना त्या अहवालाला समोर ठेवून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यंदा दिल्ली राज्यात फटाक्यांवर बंदी आणली आहे. जर नॉस्ट्राडेम्स आणि बाबा वांगा तसेच यांच्यासारख्याच अनेक भविष्यवेत्त्यांनी वर्तविलेल्या अंदाजांचा, भाकितांचा विचार केला तर काही अंशी खरेही ठरत आहे आणि जर असे असेल तर मग या भविष्यवेत्त्यांच्या भाकितांचा अभ्यास करून देशावर किंबहुना जागतिक पातळीवर येणा-या संकटांना तोंड देता येईल. दरम्यान भविष्य, अंदाज, भाकिते याला काही वैज्ञानिक आणि वास्तविक आधार नसल्याकारणाने तसेच ठोस पुरावे नसल्याने याला १०० टक्के सत्य मानणे मनाला पटण्यासारखे नाही; मात्र केलेली भाकिते, अंदाज आणि भविष्यवाण्या याकडे कानाडोळा करूनही चालणार नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

-सुशीलकुमार मानवतकर
मोबा. : ९४२३६ ४३९०७

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या