34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषहळदीच्या दुधाचे फायदे

हळदीच्या दुधाचे फायदे

एकमत ऑनलाईन

फार पूर्वीपासून हळदीच्या दुधाचे फायदे माहित आहेत. सध्या मोठ मोठ्या कॅफे हाऊसमध्ये हळदीचे दूध सहज उपलब्ध होत आहे. यामध्ये आल, मध, दालचिनी आणि इतर मसाल्याचे पदार्थ वापरूनही हळदीचे दूध लोकांना आवडू लागले आहे. जगामध्येसर्वात जास्त हळदीच्या दुधाला प्राधान्य भारतातील लोक देतात त्याचे फायदेही भरपूर आहेत. अगदी सर्दी-खोकला झाल्यापासून ते घश्यात होणारी खवखव, मोसामानुसार येणारा ताप हे सर्व आजार बरे करण्यासाठी हळदीच्या दुधाचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे एखाद्या वेळी कांही दुखले किंवा कोणत्याही प्रकारची शारीरीक इजा झाली असल्यास हळदीचे दूध पिण्याचा डॉक्टरांकडून सल्ला मिळतो. हळदीच्या दुधाने जखम लवकर भरून येते. तसेच शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे आजार लवकर बरा होण्यास मदत मिळते.

हळद मिसळलेले दूध किंवा हळदीचे दूध अनेक आरोग्यकारक गुणांनी समृध्द आहे. हळदीच्या दुधाच्या सेवनाने शरीराला अनेक प्रकारच्या व्याधीपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये मिसळून पिल्यास अधिक फायद्याचे असते. आरोग्याचा अनेक समस्या दूर करण्यासाठी हळदीच्या दुधाचा नेहमीच प्रथम क्रमांक लागतो. हळदीच्या दुधात कर्क्युमिन नावाचे घटक असतात. ज्यामुळे प्रतिकार शक्तीचे नियमन करण्यास मदत होते. ज्यामुळे टी आणि बी पेशी समवेत निरोगी पेशीची वाढ होते. या सर्व पेशीच्या मदतीने शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते व तसेच हे कर्क्युमिन शरीरात प्रतिपिंडाच्या प्रतिसादास प्रोत्साहित करते. ज्याच्या मदतीने आपले शरीर संधिवात, कर्करोग, हृदयविकार, मधुमेह आणि अल्झायमर सारख्या त्रासदायक आजारापासून आपले संरक्षण होते. बदलत्या हवामानामुळे प्रदुषणात झालेली वाढ आणि भेसळयुक्त अन्नपदार्थामुळे झालेली कमकुवत प्रतिकारशक्ती यामुळे सर्दीची समस्या सामान्य झाली आहे. या परिस्थितीमध्ये दूध हळदीचा उपाय जादूसारखा आहे.

कारण हळद मिसळलेल्या दुधात विषाणू विरोधी आणि जिवाणू विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी पासून आराम मिळतो त्यासाठी दररोज हळद दुधाचे सेवन करावे. शरीराला बाहेरून कोणत्याही भागावर मार लागल्यामुळे किंवा अपघाताने जखमा होतात. त्यासाठी हळद हे उत्तम औषध आहे. तसेच या जखमांचा शरीराच्या आतही खोलपर्यंत त्रास होत असतो. हळदीमध्ये अ‍ॅन्टीसेप्टिक गुणधर्म असल्याने जखम सडत नाहीत. म्हणून हळदीच्या दुधाचे नियमित सेवन केल्यास आतील जखमाही लवकर ब-या होतात. प्रत्येक माणसाला स्मरणशक्ती अत्यंत आवश्यक असते. पण म्हातारपणी वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती हळुहळू कमी होते व आपण भूतकाळातील काही गोष्टीचा विसर होतो. हा विसरण्याचा आजार कमी करण्यासाठी दररोज हळद मिश्रीत कोमट दूध नियमितपणे प्यावे त्यामुळे स्मरणशक्ती वाढते. सध्या निद्रानाशाची समस्या लोकामध्ये वाढत चालली आहे. आजकालच्या व्यस्त आयुष्यात झोप घेण्यासाठी खूपच कमी वेळ मिळतो. आणि मिळाला तरीही चिंताग्रस्त असल्याने लवकर झोप लागत नाही. हळदीमध्ये अमिनो-आम्ल भरपूर असतात. जे चांगली झोप येण्यास मदत करतात.

१ कोटी २१ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक

अशा वेळी चांगली झोप येण्यासाठी एक ग्लास दुधामध्ये एक चमचा हळद मिसळून दररोज रात्री झोपण्याच्या अगोदर नियमितपणे घेतल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन दाहक विरोधी गुणधर्म असलेले आहे. ज्यामुळे शरीराला आतड्यासंबंधी अनेक विकारावर मात करण्यास मदत होते. जर आपले पोट आणि पचन क्रिया व्यवस्थितरित्या कार्य करीत नसतील तर त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. हळद असलेले दूध पिल्याने आपली आतडी निरोगी राहतात आणि पाचक प्रणाली सुधारण्यास मदत होते. तसेच पोटातील अल्सर आणि कोलाइटिस बरे होतात. हळदयुक्त दूध पिल्यास पचनक्रियेच्या सर्व तक्रारी दूर होतात. हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिनमध्ये सुज विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे सांधे आणि सांधेदुखीच्या वेदना कमी होण्यास मदत होते. सांध्याची वेदना व दाहकता कमी होण्यास मदत होते. सांधेदुखी हा फक्त उतारवयात होणारा आजार नसून तो तरूण वयातही होऊ शकतो. त्यासाठी दररोज रात्री हळदीचे दूध पिल्यास फायदा होतो सध्याच्या धावपळीच्या युगात व्यस्त दिनक्रम, अवेळी खाणे, खुर्चीवर जास्त वेळ बसणे, व्यायाम न करणे, ताण-तणाव व अधिकचे श्रम आणि इतर अनेक कारणांमुळे लोकांचा लठ्ठपणा वाढला आहे.

जसजसे वजन वाढत जाते तसतसे शरीराला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी हळद टाकलेले दूध घेतल्याने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते व वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. दूध कॅल्शियमने समृध्द असते व हळदीमध्ये भरपूर प्रमाणात प्रतिजैविक असतात. या दोन्ही घटकांमुळे हाडे निरोगी राहण्यास व हाडाची मजबूती अधिक चांगली होण्याचा महत्वपूर्ण फायदा होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे हाडाचे फ्रॅक्चर किंवा हाडाचा रोग असेल तर हळदीच्या दुधाचे सेवन करावे. त्यामुळे हाडाचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो. हळदीमध्ये जिवाणू विरोधी गुणधर्म आहेत. याचा औषध म्हणून ही उपयोग केला जातो. हळदयुक्त दूध मासिक पाळीच्या अनेक आजारावर उपयुक्त आहे. याशिवाय बाळाच्या जन्मानंतर आईची प्रकृती लवकर चांगली होण्यासाठी महिलांना हळदीचे दूध देण्यात येते. याचा एक अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे नवजात बाळाला मातेकडून अधीक चांगल्या प्रमाणात दूध मिळते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.

त्यामुळे हळदीच्या दुधाचे मधुमेह असणा-या व्यक्तीनी नियमितपणे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास मधुमेह बरा होण्यास मदत होते. महत्वाचे म्हणजे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच रक्त अधिक पातळ करण्यासाठी मदत करते. कॅन्सर हा शरीरातील पेशीच्या अनियंत्रीत वाढीमुळे होणारा रोग असून तो अत्यंत धोकादायक व प्राणघातक सुध्दा मानला जातो. म्हणून या आजाराला प्रतिबंधीत करणे अत्यंत आवश्यक आहे. हळदीच्या दुधामध्ये सुजविरोधी गुणधर्म असतात. हळद युक्त दुधामुळे प्रोस्टेट आणि पोटाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच त्यामुळे कर्करोगाच्या पेशीमुळे डी.एन.एला नुकसान पोहेचविणा-या पेशीचा प्रभाव सुध्दा कमी होतो. केमोथेरेपीचे होणारे दुष्परिणाम कमी होण्यास लाभदायक होते. हळदी या दुधामध्ये असलेल्या कर्क्युमिनमुळे शरीरात तयार होणारे सायटोकायनिन (एक प्रकारचे प्रथिने) प्रतिबंधीत होते. ज्याच्या तयार होण्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी होणारे विकार थांबविले जातात. तसेच हळदीबरोबर अद्रक वापरल्यामुळे रक्तवाहिन्यासंबंधी व हृदयाचे आजार वाढविणारे घटक देखील कमी होतात. विशेष म्हणजे आल्यामध्ये असलेल्या सक्रिय जैव-संयुगे हानीकारक कोलेस्टेरॉल कमी करून हानीकारक कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्टेरॉल वाढविण्यास लाभदायक ठरते.

बहुतेक लोकांना मसालेदार, तळलेले किंवा जंक फूड खायला आवडते त्यामुळे शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. ज्यामुळे यकृतावर ताण येतो. या समस्येत हळदीचे दूध घेतल्यास यकृताचे कार्य अधिक वेगवान होण्यास मदत होते. हळदीच्या दुधात असलेले कर्क्युमिन आपल्या मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात. हळदीच्या दुधाच्या सेवनाने मेंदूशी संबंधीत उदासिनता आणि स्मरणशक्ती नष्ट होण्याचा धोका कमी करण्यास फायदा होतो. तसेच पार्किनसन (कंपवात) सारख्या मानसिक विकारावर देखील सहज मात करता येते. मोकळ्या हेवेत काम करणा-या व्यक्तीच्या त्वचेची चमक धूळ व माती प्रदुषणामुळे सतत कमी होऊ लागते व त्याच बरोबर त्वचेच्या संसर्गाचा धोका सुध्दा वाढतो. त्यासाठी हळदयुक्त दुधाचे सेवन त्वचेसाठी फायदेशिर असते.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या