22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषकोट्यवधींची शाळा ‘सुटणार’?

कोट्यवधींची शाळा ‘सुटणार’?

एकमत ऑनलाईन

कोरोनाच्या साथीमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून, शिक्षणाच्या क्षेत्राचे नुकसान मोजणेही अवघड बनले आहे. असंख्य मुलांनी मोठ्या कष्टाने शिक्षणाच्या प्रवाहाशी स्वत:ला जोडून घेतले होते. कोरोनाच्या साथीनंतर त्यांना पुन्हा शाळेत पाठविणे त्यांच्या पालकांना शक्य होणार नाही. तसेच आॅनलाइन शिक्षणाच्या प्रयोगाची मयार्दा पहिल्याच दिवसापासून स्पष्ट झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी विशेष प्रयत्न आणि तरतूद आवश्यक आहे.

कोविड-१९ च्या विषाणू प्रसाराने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राचे अतोनात नुकसान केले आहे. विशेषत: शिक्षणाच्या क्षेत्राला या साथीने इतके पांगळे करून टाकले आहे, की नुकसानीचा अंदाजही बांधणे शक्य झालेले नाही. या क्षेत्राच्या बाबतीत जी प्राथमिक माहिती हाती येत आहे, ती अत्यंत चिंताजनक आहे. ‘सेव्ह द चिल्ड्रेन’ या मुलांसाठी काम करणा-या एका प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थेने काही दिवसांपूर्वी ‘सेव्ह द एज्युकेशन’ नावाचा अहवाल सादर केला आहे.

या अहवालानुसार जगात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जी मुले शिक्षणापासून दूर गेली आहेत, त्यापैकी सुमारे एक कोटी मुले अशी आहेत जी शाळेचे तोंड पुन्हा कधीच पाहू शकणार नाहीत. युनेस्कोकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीचा हवाला देऊन या अहवालात म्हटले आहे की, एप्रिल महिन्यात कोरोनामुळे जगभरातील १६० कोटी मुले शाळामहाविद्यालयांपासून दूर गेली आहेत.

जगभरातील एका संपूर्ण पिढीच्या शिक्षणाच्या मार्गात अशा प्रकारचा मोठा अडथळा येण्याची मानवी विकासाच्या प्रवासातील ही पहिलीच घटना आहे. अर्थात, शाळा आणि महाविद्यालये बंद असली तरी शिक्षण सुरू ठेवण्याचे प्रयत्न इंटरनेटच्या आणि लॅपटॉप, मोबाइलच्या माध्यमातून सुरू ठेवण्यात आले आहेत. परंतु या प्रक्रियेच्या मयार्दा पहिल्या दिवसापासूनच उघड झाल्या आहेत. शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या वर्गात शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेला मोबाइलवरील शिक्षण हा पर्याय ठरू शकत नाही.

परंतु त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा की, या सुविधा किती टक्के मुलांपर्यंत पोहोचू शकतात ? लॅपटॉप किंवा स्मार्टफोनसह इंटरनेटची कनेक्टिव्हिटी किती मुलांना आपल्या घरात उपलब्ध आहे ? जिथे बसून शाळेशी जोडले जावे आणि अभ्यास करावा, असा स्वतंत्र कोपरा किती मुलांना आपल्या घरात उपलब्ध आहे? किती मुलांना घरबसल्या आॅनलाइन लेक्चरकडे लक्ष केंद्रित करता येण्याजोगे वातावरण मिळते? त्याहन भयावह गोष्ट अशी की, कोरोना आणि लॉकडाउनमुळे ज्या कुटुंबांना आर्थिक अडचणी आल्या आहेत, जी कुटुंबे प्रचंड मोठ्या आर्थिक संकटात ढकलली गेली आहेत, त्यातील अनेक कुटुंबे आपल्या मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश घेण्याचा विचारसुद्धा करू शकत नाहीत.

अशा कुटुंबांमधील मुलांना घरात खायला अन्न मिळावे यासाठी आईवडिलांना कामात हातभार लावावा लागत आहे. ही कामे त्यांच्या हातन काढन घेऊन पन्हा त्यांना शाळेत पाठविणे. त्यासाठी पन्हा खर्च करणे या गोष्टींचा विचारही त्यांचे आईवडील सध्याच्या परिस्थितीत करू शकत नाहीत.

सरकारांनी आपल्या अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्च कमी करण्याचे धोरण स्वीकारणे हे कोविड काळानंतरच्या शिक्षण क्षेत्रासाठी हे एक मोठे आव्हान मानले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांचे उत्पन्न कोरोना काळात घटले आहे. त्यामुळे विविध बाबींवरील खर्चात कपात करणे आवश्यक ठरणार आहे आणि शिक्षणासारख्या क्षेत्रावरील खचार्ला कात्री लावणे हा सरकारांना जवळचा सर्वांत मार्ग वाटू शकतो. जसजसा काळ जाईल, तसतशी ही परिस्थिती अधिकाधिक गंभीर बनत जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या विषाणूने समाजात शिरकाव केला, त्यापूवीर्ही शिक्षण क्षेत्राची अवस्था फारशी चांगली नव्हतीच. जगभरातील २५ कोटींपेक्षा अधिक मुले साथीच्या आधीच्या काळातही शिक्षणाच्या प्रवाहाबाहेरच होती. असे आकडेवारी सांगते. परंतु मोठ्या कष्टाने ज्यांनी स्वत:ला शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडून घेतले होते, अशा कोट्यवधी मुलांसाठी ही साथ मोठे संकट ठरणार आहे. अशा कठीण परिस्थितीत जर आजाराची साथ आटोक्यात आल्याबरोबर शिक्षणाच्या बाबतीत विशेष प्रयत्न केले गेले नाहीत, तर २०३० पर्यंत जगातील सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट आणखी काही दशकांसाठी लांबणीवर पडू शकते. एवढ्या विवेचनावरून असे दिसून येईल, की या संकटाचे गांभीर्य ओळखून शिक्षणासाठी पुरेशी तरतूद होणे आणि कोरोनामुळे शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या जाणाºया मुलांकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे.

नोंद
विनिता शाह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या