34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषरक्तरंजित रणधुमाळी

रक्तरंजित रणधुमाळी

एकमत ऑनलाईन

पश्चिम बंगालमध्ये वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा करण्यावर बंदी घालणा-या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला पवित्रा यंदा बदलला. त्यांच्या तृणमूल काँग्रेसने वसंत पंचमीनिमित्तच्या कार्यक्रमांमध्ये सक्रियता दाखवली. भाजपला प्रत्युत्तर देण्यासाठी तृणमूल काँग्रेसने सरस्वती पूजनामध्ये कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. ममता बॅनर्जी या मुुस्लिम मतदारांची एकजूट केल्यानंतर आता हिंदू मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी हिंदुत्वाची चादर ओढू पाहत आहेत. मुस्लिमांबद्धल नेहमीच सकारात्मक भावना ठेवणा-या ममता बॅनर्जी यांना भाजपचा सामना करताना हिंदू मतदार आपल्यापासून दुरावण्याची भीती वाटत आहे. हिंदुत्वाची प्रतिमा दाखवण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणेला ‘जय सीयाराम’च्या घोषणेने उत्तर दिले. मशिदीच्या इमामांना मानधन दिल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी दूर्गा पूजेसाठी स्थापन केलेल्या समितीला ५० हजार रुपयांची घोषणा दिली. ८ हजार पुजा-यांना प्रत्येक एक हजार रुपये देण्याचीही घोषणा केली. हिंदूंना आकर्षित करण्यासाठी आणखी काही लोकप्रिया घोषणाही केल्या आहेत.

एकीकडे ममता बॅनर्जी या स्वत:ला हिंदू असल्याचे सिद्ध करत आहेत तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते ‘जय श्रीराम’ची घोषणा देणा-या भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांची हत्या करण्यासाठी आसूसलेले आहेत. भाजप नेत्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये २०२० मध्ये ३५ हून अधिक भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. तर हजारोंच्या संख्येने जखमी झाले आहेत. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या रॅलीत म्हटले की, बंगालच्या लोकांना ‘ममते’ची अपेक्षा होती, परंतु दहा वर्षात लोकांना ‘निर्ममता’ लाभली. या शासनकाळात कोणतेही परिवर्तन झाले नाही. केवळ डाव्यांचे पुनरुज्जीवन झाले. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनीही राज्यात भीतीचे वातावरण असल्याचे वारंवार सांगितले. बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी लोकशाही वाचण्यासाठी ममता सरकारला हद्दपार करणे हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले. एखाद्या राज्यपालाने थेट राज्य सरकार बदलाची मागणी करणे हा भारताच्या राजकीय इतिहासात पहिलाच प्रकार होय.

तृणमूल काँग्रेसचा त्याग करणारे माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी देखील राज्यातील ढासळत्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. आपल्या राज्यात होणारा हिंसाचार पाहून मला दिल्लीत त्रास होत आहे, असेही ते म्हणाले. आपण रविंद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस, खुदीराम बोस, स्वामी विवेकानंद यांसारख्या महान व्यक्तंच्या राज्यात राहतो. आपण सर्वजण आपल्या जन्मभूमीसाठी जीवन जगत आहोत. त्यामुळे मला आता ते पहावत नाही. बंगालमध्ये अत्याचार वाढले आहेत. माझा आत्मा मला म्हणतोय की, या ठिकाणी बसल्या बसल्या गप्प राहा. काहीच करू शकत नसाल तर राजीनामा द्या. मी बंगालसाठी पुढेही काम करत राहीन.’’ गेल्या दोन दशकांपासून तृणमूलसाठी काम करणारे त्रिवेदी यांच्या वक्तव्यातून पश्चिम बंगालमधील वास्तवाची जाणीव होते. अर्थात त्यांनी राजीनाम्याची घोषणा करताच भाजपमधून स्वागताची निमंत्रणे पाठवली गेली.

छोट्याशा रित्विकाकडून उंच गिरीशिखर सर

पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असताना हिंसाचाराचे प्रमाणही वाढले आहे. केवळ भाजपाच नव्हे तर डावी आघाडी आणि काँग्रेस देखील कार्यकर्त्यांवर होणा-या हल्ल्यांबाबत आवाज उठवत आहेत. ७ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हल्दिया येथील सभेपूर्वी नंदकुमार येथे त्यांचे प्लेक्स आणि पोस्टर फाडण्यात आले. पंतप्रधानांच्या सभेला जाणा-या कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ले केले. यात पाच कार्यकर्ते जखमी झाले. पंतप्रधानांच्या बंगाल दौ-यानंतर भाजप कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले होत आहेत. ९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा हे बंगालला पोचण्यापूर्वीच लालगडच्या झिटका येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बसवर गोळीबार झाला. १० फेब्रुवारी रोजी हुगलीच्या सेवडाफुल्ली येथे ‘जय श्रीराम’ लिहलेले मास्क वाटणा-या १९ भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले. तत्पूर्वी चांपदानी येथे जय श्रीराम लिहलेले मास्क वाटप केल्याने वाद झाला होता. विनापरवानगीने मास्क वाटप होत असल्याचे सांगत पोलिसांनी कारवाई केली. मास्क वाटपामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांना अटक केल्याचा दावा पोलिसांनी केला.

११ आणि १४ फेब्रुवारी रोजी दक्षिण चोवीस परगणाच्या डायमंड हार्बर येथे जखमी भाजप कार्यकर्ते पियूष कांति प्रमाणिक यांच्या आईचे निधन झाले. १ जानेवारीला प्रमाणिक यांचे भोलारहाट येथून अपहरण केले होते आणि तृणमूल काँग्रेसच्या लोकांनी बेदम मारहाण केली होती. त्यांच्या हत्येच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला घेरावही घातला होता. १२ फेब्रुवारीला बीरभूम जिल्ह्यात परिवर्तन यात्रेतून परतणा-या भाजप कार्यकर्त्यांना घेराव घालून मारहाण करण्यात आली. काही कार्यकर्त्यांंच्या घराचीही तोडफोड केली. सैतिया भागात भाजपचे दोन कार्यकर्ते संतू डोम आणि माखन डोम यांच्यावर उकळते पाणी टाकण्याचा नृशंस प्रकार घडला. दोघांनाही गंभीर स्थितीत दवाखान्यात दाखल केले होते.

१३ फेब्रुवारीला कोलकताजवळील उत्तर चोवीस जिल्ह्यात बासंती महामार्गावर भाजप नेते बाबू मास्टरची गाडी रोखली आणि त्यांच्यावर बॉम्बफेक व गोळीबारही केला गेला. या हल्ल्यात भाजप नेते आणि चालक गंभीर जखमी झाले. या भागात बाबू मास्टर यांचा मोठा प्रभाव आहे. गेल्या वर्षी ते तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. १३ फेब्रुवारीला उत्तर चोवीस परगणाच्या बारासात येथे रस्त्यालगत उभी असलेल्या भाजप खासदाराच्या गाडीला उडवण्यात आले. १६ फेब्रुवारीला कूचबिहार जिल्ह्यात बशीरहाटमध्ये जे.पी. नड्डा यांचे पोस्टर फाडण्यास विरोध करणा-या बादल शहा, त्यांची पत्नी आणि मुलावर हल्ला करण्यात आला. ११ फेब्रुवारीला डाव्यांच्या राज्यव्यापी नवान्न अभियानाच्या वेळी पोलिसांसमवेत संघर्ष झाला. यात जखमी कार्यकर्ते मैदूल इस्लाम यांचा उपचारादरम्यान १४ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. त्यानंतर डाव्या आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, मृत कार्यकर्त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत अणि सदस्यास नोकरी देण्यास सरकार तयार आहे. मात्र संतप्त कार्यकर्त्यांनी तालतल्ला भागातील पोलिस कर्मचा-यांवर हल्ला केला. या पोलिसांनी आपला जीव वाचवण्यासाठी एका हॉटेलचा आधार घ्यावा लागला. मालदा येथे माकप कार्यकर्त्याचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली.

तृणमूलमधील अंतर्गत राजकीय संघर्ष पेटल्याने कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. १६ फेब्रुवारी रोजी मालदा जिल्हा युवा तृणमूल काँग्रेस अध्यक्षाने तृणमूलचेच आमदार नीहार रंजन घोष यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. या हल्ल्याचा आरोप माजी मंत्री कृष्णेन्दू नारायण चौधरी यांच्या लोकांवरही केला जात आहे. त्यादिवशी आमदारांच्या घरावर शंभराहून अधिक लोकांनी हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. वर्धमान शहरातील एका क्लबचा ताबा घेऊन तृणमूल काँग्रेसच्या दोन गटात हाणामारी झाली. त्यात पक्षाचे कार्यकर्ते अकबर यांचा मृत्यू झाला. १६ फेब्रुवारी रोजी हुगलीच्या आरामबाग येथे तृणमूलच्या आपापसातील भांडणात पदाधिकारी शंकर कुमार दे यांना बेदम मारहाण करण्यात आली

रास बिहारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या