27 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home विशेष यातला एक तरी ....काँग्रेसचा नेता होऊ शकेल?

यातला एक तरी ….काँग्रेसचा नेता होऊ शकेल?

एकमत ऑनलाईन

बिहार निवडणुकीचे निकाल लागले. नितीशकुमारांना शिक्षा मिळाली. दुय्यम भूमिका घ्यावी लागली. ज्या रुबाबात २०१५ साली मुख्यमंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली होती तो रुबाब यावेळी त्यांच्या चेह-यावर नव्हता. कारण, बिहारच्या राजकारणात त्यांचा पक्ष तिस-या क्रमांकावर फेकला गेला. भाजपच्या ओंजळीने पाणी पिण्याची वेळ नितीशकुमारांवर आली. पण यासाठी तेच जबाबदार आहेत. त्यांच्याएवढा लबाड माणूस राजकारणात शोधून सापडणार नाही. एकेकाळी राम मनोहर लोहियांच्या तत्त्वनिष्ठ राजकारणाची शपथ घेऊन राजकीय जीवन सुरू केलेले नितीशकुमार देवाच्या आळंदीहून चोराच्या आळंदीला पोहोचले. सातव्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यांचे अभिनंदन पण विरोधी बाकावर बसणारा तेजस्वी यादव मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक तेजस्वीपणे सभागृहात बसेल. हे सरकार किती टिकेल आज सांगता येणार नाही.

नितीशकुमारांचे काय व्हायचे ते होईल. पण बिहार निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील कागदावर पुढारी असलेल्या नेत्यांनी पुन्हा एकदा चर्चा सुरू केली. या निवडणुकीत काँग्रेसचे अपयश या पुढा-यांना खूप ठणका देत आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात वकील कपिल सिब्बल यांना काँग्रेसच्या जागा कमी आल्यामुळे काँग्रेसने चिंतन करावे असे वाटते. निवडणुकीतले यश किंवा अपयश हे कोर्टात खटला लढविण्याएवढे सोपे नाही. या अपयशाची ज्यांना चिंता वाटावी असा एकही नेता बिहार निवडणूक प्रचारात सर्वस्व पणाला लावून उतरलेला नव्हता. सिब्बल किंवा चिदंबरम काय…. यापैकी कोणीही बिहारच्या रणधुमाळीत काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रचारात आघाडीवर नव्हते. जे निवडणुकीत प्रचारात सर्वस्व झोकून काम करीत होते त्यांनाच यश किंवा अपयशाची चर्चा करण्याचा अधिकार आहे. जे काठावर उभे आहेत, ज्यांच्या पायाला पाणी लागलेले नाही त्यांनी पूर आला किंवा पूर ओसरला याची चिंता करू नये. काँग्रेसच्या यश आणि अपयशाची चिंता त्यांनाच करण्याचा अधिकार आहे जे प्रत्यक्ष निवडणुकीत शूरासारखे लढले. यश आणि अपयश हे निवडणुकीतले अपरिहार्य भाग आहेत.

पण ज्यांना दिल्लीत बसून पत्रकबाजी करायची आहे त्यांच्या चिंतनाने कसलाही फरक पडणार नाही. काँग्रेस सत्तेत होती तेव्हा या सिब्बल महाशयांना केंद्रीय कायदामंत्री करण्यात आले होते. यांचा आणि सामान्य माणसांचा कवडीचाही संबंध नाही. काँग्रेसमध्ये असे बरेच लोक आहेत, ज्यांचा लोकांशी थेट संबंध नाही. पण प्रसिध्दीसाठी पत्रकबाजी करण्यात ते आघाडीवर आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी राहुल गांधींवर टीका करताना ‘सामुदायिक नेतृत्व हवं’ अशी मागणी केली होती. या तथाकथित २३ नेत्यांमध्ये आता कपिल सिब्बल यांची भर पडली म्हणजे हे नेते २४ झाले. ज्यांना काँग्रेसची चिंता वाटते आहे त्या दोन डझन नेत्यांनी लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवावी. जर, काँग्रेसबद्दल त्यांना खरोखर उमाळा असेल तर लोकांच्या प्रश्नावर जिथपर्यंत हे पत्रक काढणारे पुढारी रस्त्यावर उतरत नाहीत तिथपर्यंत यांच्या पत्रकाबाजीमुळे काँग्रेसमध्ये गांभीर्याने चिंतन होईल अशी शक्यता अजिबात नाही.

मंगळवेढयाच्या आवताडे कंपनीला ३१ कोटीचा दंड

गोवर्धन पर्वताची गोष्ट अशी सांगतात की, ‘तो पर्वत कृष्णाच्या करंगळीवर उचलला गेला होता. त्याचवेळी सगळ्या पेंद्यांनी आपल्या काठ्यांचा टेकू पर्वताला लावला होता. त्या पेंद्यांमध्ये सिब्बल, चिदंबरम असे पेंदे होते, त्यांना वाटत होतं की, पर्वत आपल्या टेकूवर उचलला गेला आहे’ त्यांची फसगत झाली. एक गोष्ट स्पष्ट मान्य केली पाहिजे की सोनिया किंवा राहुल यांचे नेतृत्व कोणाला आवडो किंवा न आवडो, कोणाला मान्य असो किंवा अमान्य असो…. या दोन नेतृत्वाखेरीज काँग्रेसचा पर्वत थोडासा जो काही पेलायचा आहे तिसरे नाव कोणाचे आहे? ते या २४ लोकांनी सांगावे. सोनिया आणि राहुल बाजूला झाले आणि या २४ लोकांनी आपल्या काठ्या लावल्या तर एका क्षणात पर्वत जमिनीला टेकेल. आतापर्यंत जी काही काँग्रेस उभी राहिली आहे ती नेहरू-गांधी घराण्याच्या त्यागावर, ताकदीवर, त्यांच्या पुण्याईवर उभी राहिली आहे.

दोन-दोन पंतप्रधानांचे देशासाठी बलिदान झालेले आहे, त्यामुळे या घराण्याला शिव्या घातल्या तरी काँग्रेसचा जो काही करिष्मा झाला होता तो नेहरू-गांधी घराण्यामुळेच झाला. स्वातंत्र्य चळवळीतील त्या घराण्याच्या त्यागातूनच झाला. यशाचे वाटेकरी व्हायला अनेकजण पुढे असतात. अपयशाचे वाटेकरी व्हायला कोणाची तयारी नसते. एका राष्ट्रीय राजकीय पक्षाने ७० वर्षे सातत्याने यश मिळवत रहावे. यश मिळाल्यानंतर यशाच्या मागे नेमके कोण? याचे चिंतन करायची गरज कोणाला वाटली नाही. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, नंतरच्या काळातील शास्त्रीजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यानंतर त्याच तोलामोलाची नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करण्याची चर्चा कधी कोणी केली नाही. यशाने हुरळून जाऊन गांधी-नेहरू घराण्याच्या जोरावर सत्ता भोगणारे अनेकजण या दोन डझनभर नेत्यांमध्ये आहेत. यशात श्रेय घ्यायला सगळे होते. देशात सध्या काँग्रेसला आलेले अपयश आणि राज्या-राज्यात येत असलेले अपयश त्याचे वाटेकरी व्हायला कोणी तयार नाही.

या स्थितीत बिहारमध्ये फक्त १९ जागा मिळाल्या म्हणून ज्यांना चिंता वाटते त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांच्या पक्षापेक्षा जनता दल-काँग्रेस महाआघाडीला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत आणि हा क्रमांक १चा पक्ष आहे. जवळपास या दोघांच्या ९६ जागा आहेत. भाजपा त्याच्या आसपास नाही. मुख्यमंत्री झालेले नितीशकुमार चौथ्या क्रमांकावर आहेत. भाजपाने अपमानित करून दिलेले मुख्यमंत्रिपद त्यांनी स्वीकारले…. लिहून ठेवा, नितीशकुमारांना प्रत्येक दिवशी अधिक अपमानित केले जाईल. त्या दिवशी त्यांना या सत्तेची घृणा निर्माण होईल आणि तेहून बाजूला होतील. आणखीन एक गोष्ट या दोन डझन नेत्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. काँग्रेसचे १९ उमेदवार आमदार झाले ते राहुल गांधी प्रचारात उतरले म्हणूनच झाले. सिब्बल, चिदंबरमच्या अंगावर ही निवडणूक असती तर, काँग्रेसचा चिराग पासवान झाला असता.

महाराष्ट्राने संपूर्ण देशाला लोकशाही दाखविली

२०१९ च्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची जरा आठवण करा. निकाल लागायच्या आदल्या दिवसापर्यंत (३० ऑक्टोबर २०१९) सर्व चॅनेलवाले काँग्रेस पक्षाला १५ जागांच्या वर एक जागा दाखवायला तयार नव्हते. काँग्रेस महाराष्ट्रात संपली असेही सांगितले जात होते. काँग्रेसचे ४६ उमेदवार विजयी झाले. २८ उमेदवार असे आहेत ते २०२ ते ८०० मतांच्या फरकात पडलेत. काँग्रेस संपली असे सांगण्यात आले होते. त्या काँग्रेसच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात महाआघाडीचे सरकार आलेले आहे. काँग्रेसला फार मोठा विजय मिळाला असे कोणीही म्हणत नाही. परंतु मर्यादित साधने, सत्ताधारी भाजपाकडून ओतला जाणारा पैसा, माणसांची फोडाफोडी या सगळ्या लढाईत काँग्रेस कमी पडली. शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मान्यच केले पाहिजे की, ५० वर्षंपूर्वीची काँग्रेस आणि त्यावेळचे पक्षाचे नेते लोकांच्या थेट संपर्कात होते. लोकांचा नेत्यांवर विश्वास होता. या विश्वासात झपाट्याने अंतर पडले हे कोणी अमान्य करत नाही. जिथे काँग्रेसचा नेता लोकांसाठी रस्त्यावर उतरतो तिथे लोक काँग्रेसबरोबर आहेत. हे भूपेश बघेल यांनी छत्तीसगढमध्ये दाखवून दिले.

कोणी मान्य किंवा अमान्य करा. भाजपाच्या हातून राजस्थान, मध्य प्रदेश काँग्रेसने खेचून घेतलं होतं. आजही देशातल्या प्रत्येक गावात काँग्रेस आहे, काँग्रेसचा विचार आहे, काँग्रेसचा झेंडा आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. नेते लोकांपासून दूर झालेत, अडचण ती आहे. लोक काँग्रेसच्या सोबत आहेत. नेते आहेत की नाही एवढाच प्रश्न आहे. अपयशाचे मुख्य कारण नेते लोकांपासून तुटल्यासारखे आहेत. सत्ता जास्त प्रिय आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांच्या घरी उतरण्याऐवजी सर्किट हाऊस जास्त प्रिय वाटू लागले. सर्किट हाऊस असते गावाच्या बाहेर. कारण ब्रिटिशांची कल्पनाच ही होती. सरकारपासून लोक दूर ठेवायचे. आता काँग्रेसच्या पुढा-यांच्या डोक्यात तीच गोष्ट भरलेली आहे. नेते आणि लोक यांचा संवाद तुटलाय. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांचे फोनसुध्दा नेते घेत नाहीत. मंत्र्यांचे दौरे झाले तर, मंत्र्याच्या गाडीत जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, तालुकाध्यक्ष दिसत नाहीत. गावातले वाळूउपसावाले असे भलतेच कोणीतरी असतात. काँग्रेसच्या पराभवाची या कारणाची चर्चा जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत मूळ दुखण्याला हात घातला जाणार नाही. शिवाय, काँग्रेसने जाती-पातीचे राजकारण कधीही केले नव्हते.

आपल्याच मनाला आपण प्रश्न विचारून बघूया… जात आणि पैसा या दोन गोष्टींचे राजकारणात ज्या दिवशी प्रभाव सुरू झाला त्या दिवशी राष्ट्रीय प्रश्न बाजूला पडले.. सामान्य लोकांचा विचार बाजूला पडला आणि पैसेवाल्यांचं महत्त्व वाढलं. काँग्रेसमध्ये याचे चिंतन झाले नाही. २८ डिसेंबर १९८५ च्या मुंबईत झालेल्या काँग्रेसच्या शताब्दी अधिवेशनात राजीव गांधी यांनी नेमका याच मुद्यावर हल्ला केला होता. या गोष्टीला ३५ वर्षे झालीत. पण प्रत्येक दिवशी पक्षनेते लोकांपासून दूर जातात. प्रसारमाध्यमांची शक्ती कोणत्या धार्मिक उन्मादाच्या मागे आज उभी आहे हे लोकांना आपण सांगत नाही. विचारात काँग्रेस कमी पडते आहे. प्रचारात कमी पडते आहे आणि म्हणून निकालात कमी पडते आहे.

दीदींना ‘टक्कर’

ज्या मंडळींचा सोनियाजी किंवा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर आक्षेप आहे त्यांनी अशा नेत्याचे नाव सांगावे जो देशात किंवा राज्यात काँग्रेस उभी करू शकेल? एक नाव तरी आहे का सांगा? सामुदायिक नेतृत्व ही भंपक कल्पना आहे. सर्वांच्यासोबत चर्चा करा पण निर्णय झाल्यानंतर एका व्यक्तीलाच संपूर्ण अधिकार देऊन कोणताही पक्ष चालत असतो. घरातसुध्दा सर्वांची मतं घेऊन निर्णय होत नाही. चांगले निर्णय एकालाच करायचे असतात. कोणत्याही आस्थापनेत, व्यवसायात सर्वांची मते घेऊन तो केला जात नाही. सर्वांचे ऐकून घेणे आणि शहाणपणाचा निर्णय करून दुकानसुध्दा चालवावे लागते. राजकीय पक्ष तर याचपध्दतीने चालतो. त्याचा अर्थ नरेंद्र मोदींसारखी संपूर्ण व्यवस्था बाजूला टाकून देशातील संस्था विकायला निघायची जी प्रवृत्ती आहे.. ती निषेधार्हच आहे; पण चार फुटांच्या माणसाने आपण नेतृत्व करताना सहा फुटांचे झालो असा समज करून घेणे यात पक्ष बुडेल. ज्यांना सोनिया किंवा राहुल अध्यक्ष नकोे त्यांनी याची आठवण करावी की, गांधी, नेहरू घराण्याऐवजी, सीताराम केसरींनंतर नरसिंह राव काँग्रेसचे अध्यक्ष होतेच ना. नरसिंह राव यांनी सरकार उत्तम चालवले पण पक्ष चालवता आला नाही.

या दोन्हीवेळी काँग्रेसला यश का मिळाले नाही? एक काळ असा होता की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत जो उमेदवार नेते देईल त्याचा विजय ठरलेला असायचा. कारण काँग्रेसचे कार्यकर्ते समर्पणाच्या भावनेने घरची दशमी, भाजी-भाकरी आणि बैलगाडी जुंपून प्रचाराला लागायचे. सोलापूरचे तुळशीदास जाधव यांना १९६२च्या निवडणुकीत नांदेडमधून लोकसभेसाठी काँग्रेसने उभे केले आणि ते लाख मतांनी निवडून आले. कारण नेत्यांवर मतदारांचा विश्वास होता. आज तो विश्वास राहिला आहे का? १९७८ साली इंदिरा काँग्रेसची हवा असताना महाराष्ट्रात काय चमत्कार घडले हे सगळ्यांना माहिती आहे. आबासाहेब खेडकरांचा ड्रायव्हर-रामदास गायकवाड याला काँग्रेसने तिकिट दिले आणि तो निवडून आला. नेत्यांवर विश्वास असल्याशिवाय हे घडत नाही. आज काँग्रेसमधल्या प्रत्येक नेत्याने आपला चेहरा आरशात पाहण्याऐवजी जरा मनात डोकावून पहावे तिथे एक आरसा आहे….काँग्रेस नेते लोकांपासून दूर गेले आहेत की लोक काँग्रेसपासून दूर गेले आहेत, याचे उत्तर त्यांना त्या आरशात सापडेल. त्यामुळे सिब्बल आणि चिदंबरम यांच्या चर्चेतून पराभवाचे उत्तर मिळणार नाही. लोकांमध्ये गेल्याशिवाय पूर्वीचे विजयाचे रहस्य कळणार नाही.

मधुकर भावे

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

एक भन्नाट क्रांतिकारी तंत्रज्ञान

एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात रोबोटिक्स, स्वयंंचलित (ड्रायव्हरविना) वाहने, नॅनो टेक्नॉलॉजी, प्राण्याशिवाय मांस, स्टेम सेलच्या आधारे औषधोपचार आणि थ्रीडी...

अलिप्ततेतच शहाणपण

रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसीईपी) नावाचा करार जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्यासह १५ देशांनी केला आहे. भारताने मात्र गेल्या वर्षी या करारात सहभागी...

नितीश कुमारांचा काटेरी मुकूट

‘बिहार में बहार बा, फिरसे नितीशकुमार बा’ असा नारा एके काळी नितीशकुमारांचे निवडणूकविषयक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला होता. परंतु आज प्रशांत किशोर नितीशकुमार...

दीदींना ‘टक्कर’

बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. प्रमुख मुकाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी...

जैविक शेतीकडे वळूया

कोरोना विषाणूचा मुकाबला करणा-या जगाला विषाणूंचे दुष्परिणाम पुरेपूर समजले आहेत. अशा वेळी आपण आपल्या मुळांकडे वळायला हवे आणि निसर्गाचा समतोल राखणे हा संस्कृतीचा भाग...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...