22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeविशेषबालपणाची निरागसता स्वभावात आणता येईल का?

बालपणाची निरागसता स्वभावात आणता येईल का?

एकमत ऑनलाईन

लातूर : आज संपूर्ण देश कोरोनाच्या कवेत आहे़ त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या अनुषंगाने वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील अनेकांनी आपापली मते मांडली आहेत़ त्यातून कधी दिलासा तर कधी विचार करावयास लावणा-या गोष्टी समोर आल्या आहेत.

कधीच नव्हे अशा वेगळ्या संकटाला समोरे जावे लागत असल्याचे जुन्यापिढीतील लोक सांगतात तर नव्या पिढीला या सर्व गोष्टी अनाकलणीय आहेत़ स्वत:ला चार भिंतीच्या आत कोंडून घेत जीवन जगणे आजच्या पिढीला असहाय्य होत आहे, असे असताना हाच पर्याय आहे, असे सांगीतले जात असल्यामुळे हे काय जीवन आहे काय?, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

मात्र अशा परिस्थितीतही सुखी जीवन जगता येते हेही अनेकांनी आपल्या कृतीतून, विचारातून दाखवून दिलेले आहे़ सुखी जीवन जगणयासाठीची काही तत्वेही सांगीतली आहेत ती अशी़़़़एकमेकांची मनापासून प्रशंसा करा. एकमेकांच्या चांगल्या गुणाचे कौतुक करा. एकमेकांना विनोद सांगून खळखळून हसा़ आयुष्यातील अनुभवाचे किस्से, अनुभव शेयर करा. मनमोकळेपणाने बोला. शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहा. टिका, निंदा, चहाडी, अहंकार, द्वेष, हेकेखोरपणा हे शक्यतो टाळा.

बालमन व बालपण आठवा व त्या वयातील निरागसता स्वभावात आणण्याचा प्रयत्न करा. स्वत:चे असलेले पद व असलेले वय विसरा़ एकमेकांच्या सुख दु:खाची आस्थेवाईकपणे चौकशी करा. अडचणीच्या वेळी योग्य सल्ला, आधार, मदत, सहकार्य द्या व सहानुभूतीची सद्भावना व कृती ठेवा. एकमेकांचा सम्मान व आदर करा. याची अंमलबजावणी केली तर आपल्या एवढा आनंदी, समाधानी आणि प्रसन्न व्यक्ति दूसरा असूच शकत नाही आणि ही काळाची गरज आहे. या तनावयुक्त वातावरणातून तनावमुक्त वातावरणात आपले मन नक्कीच आनंदी व प्रसन्न होणार व या गोष्टीचे स्वत: साक्षीदार असणार, हे नक्की.

Read More  बारावी गुणपत्रिकांचे महाविद्यालयातून होणार वितरण

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या