27 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home विशेष दीदींना ‘टक्कर’

दीदींना ‘टक्कर’

पुढील वर्षाच्या प्रारंभीच पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन व्यक्तिमत्त्वांमध्येच मुख्यत्वे टक्कर होणार आहे. सीएए विधेयक निवडणुकीपूर्वीच बंगालमध्ये लागू करण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यामुळे ममता सतर्क झाल्या असून, सीएएच्या विरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तथापि, अल्पसंख्याकांवरील ममतांची पकड एमआयएममुळे सैल होऊ शकते. एमआयएमने ममतांकडे मैत्रीचा हात पुढे केला असला तरी तशी युती होण्याच्या शक्यता दिसत नाहीत.

एकमत ऑनलाईन

बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे आणि त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. प्रमुख मुकाबला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन व्यक्तिमत्त्वांमध्येच होईल, अशी चिन्हे आहेत. राज्यात अन्य कोणताही मोठा नेता नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून हा फॉर्म्युला हमखास वापरला जाणार आहे. प्रादेशिक ‘हेवीवेट’ विरुद्ध राष्ट्रीय नेता अशी ही लढाई आहे. हा फॉर्म्युला यापूर्वी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र आणि हरियाणात वापरण्यात आला असून, भाजपला त्याचे संमिश्र फळ मिळाले आहे. येत्या वर्षात (२०२१) पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दूचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या माध्यमातून भाजपची विस्तार योजना राबविली जाईलच; परंतु भाजपचे विशेष लक्ष पश्चिम बंगालवर आहे. या राज्यात तृणमूल काँग्रेस २०११ पासून सत्तेवर आहे.

ममता बॅनर्जींना आता तिस-यांदा सत्ता संपादन करण्यासाठी लढाई लढायची आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी विरुद्ध ममता या फॉर्म्युल्याने भाजपला चांगले यश मिळवून दिले होते. ममता बॅनर्जी या अन्य प्रादेशिक नेत्यांसारख्या नाहीत. त्यांनी काँग्रेस, माकप अशा अन्य विरोधी पक्षांना दहा वर्षांपासून शांत ठेवले आहे. गेली ४५ वर्षे केंद्र सरकारच्या विरोधातील सरकार राज्यात असणे ही बंगालची खासियत आहे आणि या परंपरेचा फायदा ममतांना मिळेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपची बंगालमधील कामगिरी चांगली होती. ४२ पैकी १८ लोकसभा मतदारसंघ भाजपने जिंकले होते. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या तुलनेत भाजपला चार जागा कमी मिळाल्या होत्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, भाजपच्या मतांची टक्केवारीही वाढली होती. २०१९ मध्ये ती ४० टक्के होती.

राजकीय नेत्यांना चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या

राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्येही भाजप दुस-या क्रमांकाचा पक्ष राहिला. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि माकप यांनी एकत्रितपणे निवडणुका लढविल्या होत्या आणि त्यांनी २७४ पैकी ७६ जागा जिंकल्या होत्या. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत दोन्ही पक्षांचा हिस्सा सुमारे ३९ टक्के होता. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली. दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. यावेळी माकपच्या मध्यवर्ती समितीने सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांशी निवडणुकीत आघाडी करण्यास अनुमती दर्शविली असून, काँग्रेस हा त्यापैकी एक पक्ष आहे. २०२१ मधील निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या पुढे मोठे आव्हान उभे राहू शकते.

भाजपला एक फायदा असा आहे की, सत्ताविरोधी मते भाजपकडे वळू शकतात आणि त्यादृष्टीने भाजपने मोर्चेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. याखेरीज हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासही भाजपने सुरुवात केली आहे. २०११ मध्ये ममता बॅनर्जींनी दिलेला ‘परिवर्तन’ हा नारा आज भाजप देत आहे.सध्या कट मनी आणि सिंडिकेट राज या दोन मुद्यांभोवती भाजपने आपली प्रचाराची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेसचे कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे भाजपच्या प्रचाराचे मुख्य मुद्दे बनण्याची चिन्हे आहेत. ‘आमार परिबार’ म्हणजे ‘माझे कुटुंब, भाजप कुटुंब’ हा भाजपचा सध्याचा नारा आहे.

कल्याणी शंकर
ज्येष्ठ संपादक, नवी दिल्ली

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

एक भन्नाट क्रांतिकारी तंत्रज्ञान

एकविसावे शतक हे ज्ञान-विज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते. या शतकात रोबोटिक्स, स्वयंंचलित (ड्रायव्हरविना) वाहने, नॅनो टेक्नॉलॉजी, प्राण्याशिवाय मांस, स्टेम सेलच्या आधारे औषधोपचार आणि थ्रीडी...

अलिप्ततेतच शहाणपण

रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप (आरसीईपी) नावाचा करार जपान, चीन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया यांच्यासह १५ देशांनी केला आहे. भारताने मात्र गेल्या वर्षी या करारात सहभागी...

यातला एक तरी ….काँग्रेसचा नेता होऊ शकेल?

बिहार निवडणुकीचे निकाल लागले. नितीशकुमारांना शिक्षा मिळाली. दुय्यम भूमिका घ्यावी लागली. ज्या रुबाबात २०१५ साली मुख्यमंत्रिपदाची शपथ त्यांनी घेतली होती तो रुबाब यावेळी त्यांच्या...

नितीश कुमारांचा काटेरी मुकूट

‘बिहार में बहार बा, फिरसे नितीशकुमार बा’ असा नारा एके काळी नितीशकुमारांचे निवडणूकविषयक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला होता. परंतु आज प्रशांत किशोर नितीशकुमार...

जैविक शेतीकडे वळूया

कोरोना विषाणूचा मुकाबला करणा-या जगाला विषाणूंचे दुष्परिणाम पुरेपूर समजले आहेत. अशा वेळी आपण आपल्या मुळांकडे वळायला हवे आणि निसर्गाचा समतोल राखणे हा संस्कृतीचा भाग...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...