आज आपल्या शेजा-याचे घर सील केलं आहे. ते होम आयसोलेशनमध्य मध्ये आहेत. त्यांना भाजी-सामानासाठी सुद्धा बाहेर जाता येत नाही. काहींना या तापात प्रचंड थकवा येतो. अन्न शिजवण्या इतकी शक्ती देखील अंगात शिल्लक नसते.
अशा वेळी आपल्याला शेजारी म्हणून अनेक गोष्टी करता येतील त्यांना लागेल ते सामान आणून देणे, ( ते तुम्हाला दाराबाहेर ठेवून जाता येऊ शकेल) बाकीच्या शेजा-यांशी बोलून पाळ्या ठरवून आजारी माणसाला जेवणाचे डबे देणे, ( पोलिसांना विचारुन ते आत पोचवता येईल. ते डबे साबणाने धूवून घेतले तर काहीही धोका नाही.
किंवा कागदी वा डिस्पोजेबल प्लट्स वापरता येईल) फोन करुन विचारपूस करणे ( त्यातून तर नक्की व्हायरस पसरत नाही), व्हीडीओ कॉल करुन त्यांना धीर देणे (आजारपणात आपल्या माणसाचा चेहरा बघण्याने सुद्धा बरं वाटतं) आता तुमची शंका… यातून मला कोरोना झाला तर? तुम्ही जर त्या घरापाशी थांबला नाहीत, बाधित माणसाशी संपर्क केला नाहीत, मास्क लावलेला असलात, आल्यावर हात स्वच्छ धुतलेत तर तुम्हाला हा रोग होण्याची शक्यता अगदी नगण्य आहे.
ही सगळी सेवा करुन मला काय फायदा? आज तुम्हाला कोरोना नाही. उद्याचे काय? दुसरीकडून सुद्धा तुम्हाला कोरोना होऊ शकतो. त्यावेळी आज आजारी असलेले हेच शेजारी तुम्हाला मदत करु शकतील. नव्हे करतीलच. तसंच, जेव्हा तुमचे शेजारी कोरोनातुन सहीसलामत बाहेर येतील तेव्हा ते एकदम सुरक्षित असतील. त्यांना परत कोरोना होण्याची शक्यता जवळजवळ नसेलच.
मुख्य म्हणजे १४ दिवसांनंतर त्यांच्याकडून हा रोग कोणालाच पसरणारही नाही! मग त्यांची मदत तुम्हालाच नव्हे सगळ्यांना होईल. त्यामुळे हा खर्चही म्हणू नका, सेवाही म्हणू नका. ही तुमची गुंतवणूक आहे असं समजा. कोरोनाच्या रुग्णाला असे वाळीत टाकू नका. त्यांना आज मदत केलीत तर उद्या तेही तुमच्यासाठी धावून येतील. हे लक्षात ठेवा.
नागरिकांनी प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरु नयेत