23.3 C
Latur
Saturday, August 8, 2020
Home विशेष ‘कोरोना’यण : घश्याला कोरड पडतिया

‘कोरोना’यण : घश्याला कोरड पडतिया

तुटल्याची का फुटल्याची ते म्हाईत न्हाई पन ब्रेकिंग म्हनू म्हनू कडूचे तेच ते तेच ते दावूलालेत. आन उगं सांगावं का? तर त्ये बी न्हाई. बॅगराऊंडला डेंजर म्युजिक देऊ देऊ दावूलालेत. दारूची दुकानं बंद असल्याने पैलेच लई लोकं चिंतेमदी हाईत आन् ह्यानी जोरजोरात घश्याला कोरड पडतीया, आस्लं व्हतंया, तस्लं व्हतंया म्हनू म्हनू घाबरवू सोडूलालेत.

अख्खा इळ बायकूसंगट घरामदी -हावून, झाल्यानं समदी कामं करू करू पयलेच धाप लागूलालीय आन् टीवी म्हनूलालाय की ब्वा फेफड्यात नरसाळ्या घुसला की आस्सं व्हतंय. हिथं मानसं पैलेच आपल्या आपल्या घरामदी -हाऊन घाबरूलालेत आन् समदे बातम्यावाले आनी वाट लावूलालेत. मानुसकी दावायची येळ समद्यावर आल्याली असताना हे आसलं बेजबाबदारपने वागनं या चार नंबराच्या खांबाला शोभतंय का? व्हय की न्हाई?

बातम्या बगंना गेल्यानंबी जमना गेलंय. सरकार कवा काय सांगूलालंय तेबी बगनं, त्येंच्या हिसाबानं -हानंबी परतेक नागरिकाचं पैलं कर्तव्य हाय. बातम्या सांगना-या बायामान्सातले काई चांगले हाईत. कसं हाय, काय करुलालाव, काय कराया पायजेल तेन उग्गं शांत -हावून समजावल्यावानी सांगूलालेत. उरलेले निस्ता गुरदाळा करू करू हैरानी वाडवूलालेत. बातम्या हाईत बगा त्यो, चिरकायाची गरजच -हाईना.

तेवडं त्ये येक्सलेजीव फुटेज का -हातंय ते तसलं या टायमाला दिसंना गेलंय म्हनून बरं हाय. न्हाईतर काईबी दाकवू दाकवू बेजार करत व्हते. ज्येन दिसंल त्याच्याम्होरं त्ये माईकचं बोंडूक धरू धरू काईबी ईचारत व्हते. आसले बातम्याचे तेन चॅनेलं लई -हावूच न्हाई. आमच्या लहानगेपनी ईळातून दोन टाईमच व्हत्या बातम्या. आता दिसरात चालू -हायल्यामुळं काईबी दावूलालेत न्हाईतर पुना पुना दावूलालेत. बातम्या म्हंजी शनिमा असल्यावानी मीठ-मिरचू घालू घालू फोडनी देऊलालेत. आपल्या समद्यावाला कराया पायजे, त्ये कराया पायजे म्हन्ल्यावानी त्यान्लाबी काईतर म्हनाया पायजे. येकावर दोन, चार वानी त्यास्नीबी कायतर लावाया पायजे. व्हय की न्हाई? क्रमश:

डॉ.संजय शे. कुलकर्णी
कान-नाक-घसा तज्ज्ञ

Read More  शारदाताई टोपे यांचे दीर्घ आजाराने निधन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,136FansLike
92FollowersFollow