26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeविशेष‘कोरोना’यण : मोबाईलचाबी उपेग रहातोया

‘कोरोना’यण : मोबाईलचाबी उपेग रहातोया

एकमत ऑनलाईन

बगंल थिकडं दुनियाची गर्दी, म्हंजी सडकंवर न्हाई तर त्या मोबाईलमदल्या व्हाटशेप आन फेसबुकात. आनी पन काई काई -हातय तेच्यातबी. पोष्टं, रिक्वेश्टं, फारवर्डं, कापी आन पेष्टं. ह्यानं तेला आन तेन याला. उगं धाडूधाडू बेजार. वरुन आनी परतेकाचे बक्कळ ग्रुपं. ईजेचा, टेलीफुनचा, ईमानाचा, त्यो सफरचंद डोस्क्यावर पडल्यामुळं लागल्याचा आस्ले समदे शोध आपूनच लावलावं समजून ज्येनं त्येनं उग्गं मोकाट सुटलंया.

नरसाळ्या आसला हाय, तसला हाय, हिथं येवडे गचकले, थितं त्येवडे, पोलीस हानुलालेलं, मिलीट्री मारुलालेलं, पानचट जोकं, योगा तेन तसलं करा म्हनूलालेले फिल्मं, येळ कसा घालवावं त्येबी सांगनारे कोनी तर कुटलेबी, कोनाचेबी सरकारनं काडलेले आदेशं पीडीयफ करुन धाडनारे कोनी. निस्ता गुरदाळा उटलाय. टिकटाक म्हनू नगा, गानी म्हनू नगा, पुस्तकं-नाटक-शनीमे म्हनू नगा, कोडी म्हनू नगा, ईनोदी किल्पा म्हनू नगा समदं समदं उगं किलोनं आन टनानं धाडूलालेत. ईळभर त्येच. बायला ह्याच्यातून त्यो नरसाळ्या यैना म्हनून बरायं, न्हाईतर डाऊनलोड व्हायाच्या पैले मेले आसते समदे. व्हय की न्हाई?

मोबाईलची ह्यो बिमारी त्या नरसाळ्यावानीच हाय. लगी पसरंतीय. मुंड्या तेच्यामदी खुपसू खुपसू ईळभर त्येच. टुंई म्हनून त्येनं वाजलं रे की झालंच गड्या. बगना गेल्यान जगंच बुडनार हाय. पुस्तकं वाचीत बसावं, येकमेकाशी बोलीत बसावं तसलं काई करनात. मोबाईलचाबी उपेग -हातोया, न्हाई असंबी न्हाई, पन कोनालाबी ध्यानात यैना गेलंय. धु-या धु-यानं फिरनारेबी तसलेच आन चांगले चौदावी-पंदरावी च्या पुडं शिकलेलेबी तसलेच. उटल्याउशीर ज्ये सुरु व्हतयं त्ये पार रातच्याला त्येनं जवा झोपंल तवाच थांबतयं. आरबाळून गेल्यावानी तोंडं करुन शेल्पी काडूलालेत, माना वाकड्या करु करु वाहनं चालीवतानाबी बोलूलालेत, लेकरं रडत्यात म्हनून त्यान्लाबी मोबाईल देऊ देऊ नादाला लावूलालेत. आता तर येळच येळ हाय. कामं असताना सोडनात त्याला आन आता, लकल्यावानी करुलालेत. तुमीबी आन आमीबी. व्हय की न्हाई? क्रमश:

डॉ.संजय शे. कुलकर्णी
कान-नाक-घसा तज्ज्ञ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या