27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home विशेष कोरोना विशेष : युद्ध आमुचे सुरूच

कोरोना विशेष : युद्ध आमुचे सुरूच

एकमत ऑनलाईन

या शतकातील सर्वांत मोठ्या आव्हानाचा सामना सध्या भारत करत आहे. हे आव्हान आहे कोरोना महामारीचे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या १९ लाखांच्या आसपास गेली आहे आणि ३९ हजार मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा आलेख ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणात किंबहुना त्यापेक्षा जास्त रिकव्हरी रेटसुद्धा वाढत आहे ही दिलासादायक बाब आहे. हा लेख लिहीपर्यंत यापैकी १२ लाखांच्या आसपास रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने रिकव्हरी रेट ६३ टक्के झाला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात या देशाला वाचवण्याचे आणि सोबत अर्थव्यवस्थेला सावरण्याचे दुहेरी आव्हान कधीच उभे ठाकले नव्हते. मोदी सरकारने या अभूतपूर्व संकटाचा सामना करताना कुशल नेतृत्वाचा परिचय दिला आहे.

भारताची मोठी लोकसंख्या, तिची घनता आणि गरिबीचे आव्हान असतानासुद्धा या महामारीचा सामना करताना इतर देशांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले आहे. कोरोना महामारीविरुद्ध हे युद्ध सुरूच असून या नेतृत्वासोबत भारत हे युद्ध जिंकून पुन्हा नव्याने उभा राहील.जगाला जसा महामारीचा इतिहास आहे तसा भारतालाही आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी भारतात १९१८ ते १९२० च्या दरम्यान एन्फ्लूएंझा महामारीने विक्राळ रूप धारण केले होते, ज्यात त्यावेळच्या भारताच्या लोकसंख्येच्या ५ टक्के म्हणजेच जवळपास १.७ कोटी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही संख्या जगात सर्वाधिक होती. यामुळे १९११ ते १९२० च्या दशकादरम्यान भारताच्या लोकसंख्यावृद्धीचा दर घटला होता.

जवळपास एका शतकानंतर मार्च २०२० पासून भारताला कोविड-१९ मुळे अनेक आशंकांचा सामना करावा लागत आहे. इथपर्यंत म्हटले गेले की, जर परिस्थिती गंभीर झाली तर भारतातील जवळपास ६० टक्के लोक (८० कोटी) संक्रमित होऊ शकतात. मार्चमध्ये जेव्हा आयसीएमआरचे अधिकारी निर्णय घेण्याच्या अवस्थेत नव्हते तेव्हा केंद्राने आवश्यक पावले उचलून संपूर्ण देशात कठोर लॉकडाऊन लागू केला. हे स्पष्ट आहे की, भारताने आपली आरोग्य व्यवस्था (बेड, पीपीई किट, टेस्ंिटग किट) अधिक सक्षम करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून असे केले होते. महामारीच्या विरोधात दीर्घ लढाई लढण्यासाठी सरकारची क्षमता वाढवण्यात लॉकडाऊन ब-याच अंशी यशस्वी झाले. लॉकडाऊन काळात सरकारने वेगाने हालचाली करून आवश्यक सुविधा निर्माण केल्या. आतापर्यंत भारतात २ कोटी लोकांच्या टेस्टिंग झाल्या आहेत.

सोशल मीडियावरील (अ) सुरक्षा!

या टेस्ंिटग क्षमतेच्या बळावरच १९ लाख पॉझिटिव्ह प्रकरणांचा शोध घेता आला. लॉकडाऊन लागू करण्यात केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या प्रतिक्रियांवरही आपल्याला विचार करावा लागेल. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या ६० दिवसांच्या काळात ४,००० पेक्षा अधिक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. पंतप्रधानांच्या देखरेखीखाली जाहीर केलेल्या या अधिकाधिक मार्गदर्शक सूचनांमागे घरात असलेल्या नागरिकांपर्यंत आवश्यक सामानाची पूर्तता करणे हा हेतू होता.

या महामारीची गंभीरता समजल्यानंतर सुरुवातीला केंद्र सरकारने परिस्थितीचा सामना करण्यासाठी पीपीई किटच्या अधिक उत्पादनावर भर दिला. या दरम्यान पंतप्रधान मोदी आणि संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेला वेळोवेळी संबोधित केल्याने या लढ्याला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. जनतेची सहमती आणि सहकार्याशिवाय कोणताही देश २ महिने घरात बसू शकत नाही. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये मात्र अडेलतट्टू नागरिकांमुळे लॉकडाऊनला विरोधाचा सामना करावा लागला. भारताच्या शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेने मात्र सरकारच्या या निर्णयाप्रति कटिबद्धता दाखवली.
जेव्हा भारतात कोविड-१९ चा प्रकोप सुरू झाला तेव्हा एन-९५ मास्क आणि पीपीई किटच्या उत्पादनाची भारताची क्षमता अत्यंत मर्यादित होती.

यांची अधिकाधिक आयातच केली जायची. केंद्रीय गृहमंत्रालयाने या उपकरणांची उपलब्धता करण्यासाठी ३० जानेवारीलाच अधिका-यांची एक समिती स्थापन केली होती. तेव्हापासून भारतात स्वदेशी पीपीई किटच्या उत्पादनात उल्लेखनीय वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या २.२ कोटी पीपीई किटच्या ऑर्डरची पूर्तता करताना मेपर्यंत १.४२ कोटी पीपीई किटची निर्मिती करण्यात स्वदेशी उत्पादक सक्षम बनले होते. हा उद्योग ७००० कोटींची उलाढाल करेल असा अंदाज आहे. एका अहवालानुसार मार्चमध्ये भारतात दररोज ३,००० पीपीई किटचे उत्पादन होत होते मात्र जूनपर्यंत भारतात ८,००,७०० पीपीई किटचे उत्पादन दररोज होऊ लागले. आतातर भारत पीपीई किटची निर्यातसुद्धा करत आहे.

संरक्षणात आत्मनिर्भरता!

आताही कोरोनाचा धोका टळलेला नाही. तो आता ग्रामीण भागात आपले पाय पसरू पाहत आहे. भारतीय घटनेत आरोग्य हा राज्य शासनाच्या अखत्यारीतील विषय असल्याने लॉकडाऊननंतर विविध राज्यांनी या महामारीला रोखण्यासाठी केलेल्या उपायांचा परिणाम वेगवेगळा दिसून आला. कुठे कोरोनाचा प्रकोप अधिक आहे तर कुठे कमी. दिल्लीचेच उदाहरण घ्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते की, ३१ जुलैपर्यंत दिल्लीतील कोरोना संक्रमितांचा आकडा ५.५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो. वेळीच केंद्र सरकारने मदतीसाठी पाऊले उचलली हे बरे झाले. राज्याच्या कंटेन्मेंट क्षेत्राच्या धोरणात बदल केला गेला आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात आला.

यादरम्यान राज्यात कोविड-१९ केअर सेंटर्सची संख्या वाढवून बेडची क्षमता वाढवण्यात आली. याचे श्रेय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना द्यावे लागेल कारण त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून राजधानीला वाचवले. लक्षात घ्या, कोण्या औषधामुळे किंवा लसीमुळे जादूची कांडी फिरल्यासारखा कोरोनाचा प्रकोप क्षणात थांबणार नाही. आता आपण न्यू नॉर्मल अवस्थेतून जात आहोत ज्यात कोणी एक देश या आजारावर उपयोगी येणा-या औषधींचा संपूर्ण साठा गडप करू शकतो. जगातील अनेक देशांनी संभाव्य कोरोना लसीचा साठा अगोदरच मोठ्या प्रमाणात बुक करून ठेवला आहे. ही दीर्घकालीन लढाई असू शकते, ज्यात कोण्या एका देशाची सरकार आणि जनतेच्या सहनशीलतेचा कस लागतो. आपण नागरिकांना प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. आवश्यक दक्षता सर्वांनी घेतल्यास निश्चितच या अभूतपूर्व संकटातून आपण लवकरच बाहेर पडू.

सुरेश मंत्री, अंबाजोगाई
मोबा. ९४०३६ ५०७२२

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

आयपीएलला अमिरातीचे इंधन

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा १३ वा हंगाम आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत आहे. भारतात आयोजित केली जाणारी ही स्पर्धा कोरोना विषाणूच्या...

विषय व्याजाचा, गरज नाजूक हाताळणीची

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून देशभरात टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि साधारणत: जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने अनलॉकचा काळ सुरू झाला आहे....

अर्थव्यवस्थेची घसरण तात्पुरती

केंद्रीय सांख्यिक विभागाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) वृद्धिदरात २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. कृषी वगळता...

वाढत्या आत्महत्या कशा रोखणार?

गेल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये आपल्या देशात दररोज सरासरी ३८१ जणांनी स्वत:चे जीवन संपवून मृत्यूला कवटाळले, असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोची (एनसीआरबी) नुकतीच प्रसिद्ध...

क्रांतीचा वणवा

हैदराबाद मुक्तिसंग्राम अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या त्यागाने-रक्ताने लिहिला गेला आहे. अबाल-वृद्ध महिला, तरुण या सर्वांनी स्वातंत्र्याच्या या अग्निकुंडात स्वत:ला झोकून दिले होते. आपली भारतमाता निजाम...

मुक्तिसंग्राम : नांदेड जिल्ह्याचा सहभाग

ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतात ५६३ संस्थाने होती. त्याचा राज्यकारभार देशी राजे व संस्थानिक बघत असत. त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद. या संस्थानाची स्थापना मीर कमरूद्दीन निजाम...

वाद प्रश्नोत्तरांच्या तासाचा

कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला असतानाच संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाची अधिसूचना जारी झाल्यापासूनच एक वाद सुरू झाला आहे. हे संक्षिप्त...

प्रश्न मीडिया ट्रायलचा

साहित्य हा समाजाचा आरसा असतो, हे वाक्य सर्वांनी ऐकले असेल. शाळेत असताना यावर निबंध लिहिण्याचीही संधी मिळाली असेल. चित्रपट हा साहित्याचाच एक भाग मानला...

अभियंतादिन

आज १५ सप्टेंबर आजचा दिवस संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस. १५ सप्टेंबर १८६१...

समाजाभिमुख अभियंता

१५ सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतरत्न, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसानिमीत्त हा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून देशभरामध्ये...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...