36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeविशेष‘क्राईम सिरीज’ जोरात...

‘क्राईम सिरीज’ जोरात…

एकमत ऑनलाईन

सध्या मनोरंजनाची असंख्य साधनं उपलब्ध आहेत. विशेषत: ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा सुकाळ आहे. यातही वेब मालिकांनी मनोरंजनात मोठी भर घातली आहे. दोन-तीन वर्षांत वेब मालिकांच्या श्रोत्यांच्या संख्येत लक्षणीय भर पडली आहे. त्यातही राजकारण आणि गुन्हेगारी विश्वावर आधारलेल्या वेब मालिका लोकप्रिय ठरत आहेत. मालिका पाहणारे बहुतांश प्रेक्षक हे आपल्या मनातच नकारात्मक भावना दडवून ठेवत असल्याने गुन्हेविषयक मालिकांना प्रसिद्धी मिळत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. आपल्या मनातील नकारात्मक भाव हे एखाद्या काल्पनिक मालिकेच्या माध्यमातून समोर येत आहेत. म्हणूनच प्रेक्षकांना राजकारण, गुन्हेविषयक मालिकांत रुची वाढत आहे.

इंटरनेटवर स्ट्रीम होणा-या वेब मालिकेवर सेन्सॉर बोर्डाला कात्री लावता येत नाही. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकांच्या कल्पनांना धुमारे फुटले आहेत. ‘मिर्झापूर’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘पाताळ लोक’ यासारख्या गुन्हेगारीविश्वाचे दर्शन घडवणा-या मालिका तयार झाल्या. अशा प्रकारच्या मालिकांना श्रोत्यांचे मिळणारे पाठबळ पाहून समीक्षकही बुचकळ्यात पडले आहेत. भारताची ऑनलाईन डेटा सर्वेक्षण संस्था ‘क्रोम डीएम स्टडी’च्या मते, ६५ टक्के घरांत वेब मालिका पाहिल्या जातात. यात सुमारे ८० टक्के नागरिकांना विनोदी वेब मालिका आवडतात. परंतु गुन्हेगारी, भयपट, गूढ कथानकांवर आधारलेल्या वेब मालिकेची लोकप्रियता अलीकडच्या काळात खूपच वाढली. हे सर्वेक्षण २०१७ असून शहरातील १६ ते ४४ वयोगटातील श्रोत्यांच्या अभ्यासावर आधारित आहे. २०१९ मध्ये अमेरिकी रिसर्च कंपनी ‘एसएमएम रश स्टडी’च्या सर्वेक्षणानुसार सेक्रेड गेम्स, मिर्झापूर, क्रिनिमल जस्टिस, लस्ट स्टोरीज आणि मेड इन हेवन या मालिकांचे ऑनलाईनवर सर्वाधिक सर्च झाले आहे. रहस्यकथेचे लेखन कशामुळे?

२०२० मध्ये लोकप्रिय ठरलेली वेब मालिका ‘पाताळ लोक’चे लेखक सुदीप शर्मा यांनी शाहिद कपूरचा ‘उडता पंजाब’ आणि अनुष्का शर्माचा ‘एन.एच.१०’ यासारख्या चित्रपटाचे पटलेखन केले आहे. सुदीप शर्मा म्हणतात की, गेल्यावर्षी ‘पाताळ लोक’ मालिकेची चर्चा खूपच झाली. रहस्यमय कथा लिहण्यामागची भूमिका सांगताना ते म्हणाले, लहानपणापासूनच आपल्याला रहस्यमय, गूढ, गुन्हेगारीच्या विषयाची आवड होती. ते हॉलिवूडचे दिग्दर्शक मार्टिन स्कोेसॅसेचा चित्रपट कसीनो, टॅक्सी ड्रायव्हर, आयरिशमॅन आणि बॉलिवूडचे दिग्दर्शक राम गोपाल वर्माचा चित्रपट सत्या, कंपनी या चित्रपटांनी प्रभावित झाले आहेत. एखादी गूढ आणि रहस्यमय कथा लिहिणे हे कोणत्याही लेखकाला आव्हान असते. श्रोत्यांमध्ये थ्रिलर स्टोरीच्या वाढत्या आकर्षणाबद्दल ते म्हणतात, श्रोते नकारात्मक भावना मनातच ठेवतात. हे भाव एखाद्या काल्पनिक कथेच्या माध्यमातून समोर येतात. त्यामुळेच अशा प्रकारचे चित्रपट पाहण्यास लोकांना रस असतो. अशा मालिकेत जेव्हा आरोपी, गुन्हेगाराला शिक्षा मिळते तेव्हा त्यांना शिक्षा दिली जात असल्याचे पाहून आत्मिक समाधान लाभते आणि ते स्वत:ला या माध्यमातून सुरक्षित समजतात.

आयशा! तू कल भी गलत थी, आज भी गलत है

श्रोत्यांची ‘मन की बात’
सुदीप शर्मा या तर्काला काही प्रमाणात मानसशास्त्राचा आधार देतात. या दृष्टिकोनातून श्रोत्यांची मानसिकता ओळखता येईल, असे ते म्हणतात. मानसशास्त्र आणि दर्शनशास्त्राचे अनेक सिद्धांत असून या माध्यमातून मानवी वर्तनात संशोधन आणि कारण सांगितले आहे. जसे की, एखाद्यावर खूप राग आला असेल, परंतु तो बाहेर काढता आला नाही तर संपूर्ण दिवस खराब जातो. मग सायंकाळी त्याने एखादी क्राईम वेब मालिका पाहिली की त्याचे मन शांत होते. अ‍ॅरिस्टॉटल यांच्या केथार्सिस सिद्धांतानुसार भावनांचे शुद्धीकरण हे कोणत्याही संकटाचा उद्देश असतो. आरोग्यासाठी शरीरातील मल बाहेर काढणे आणि नवीन विचार आवश्यक असतो, त्याचप्रमाणे मानसिक मलदेखील बाहेर काढणे आणि नव्याचा शोध घेणे गरजेचे असते. आपण मनातील नकारात्मक गोष्ट बाहेर काढली नाही तर कलेतून, युद्धावर तयार केलेल्या व्हीडीओ गेम्स खेळून किंवा वेब मालिका, चित्रपट पाहून ती ऊर्जा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. यात अनेक गोष्ट असू शकतात.

चित्रपट पाहून किंवा चित्र काढून देखील आपण भावनामुक्त होऊ शकता. प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगवेगळा असू शकतो. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, कार्ल युंग यांच्या एका सिद्धांतानुसार अवचेतन मनात अनेक गोष्टी, चित्रं दडलेली असतात. यात पर्यावरण, सामाजिक वर्तणूक किंवा पूर्वजांकडून घेतलेल्या गोष्टींचे अनुकरण याचा समावेश असतो. अशा प्रकारचे भाव, चित्र हे साधारणपणे प्रत्येक व्यक्तीत असतात. त्याचा थेट संबंध आपल्या अवचेतन मनात असलेल्या भावनांशी येतो. त्यामुळे भयपटातील दृष्य पाहताना रोमांच किंवा भीतीचा अनुभव घेतो.

मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, सर्वधासाधारण प्रेक्षकांना अशा प्रकारच्या मालिका आवडण्याची पुढील कारणे असू शकतात. प्रेक्षक मंडळी गुन्हेगाराची मानसिक स्थिती ओळखून आपल्या खासगी आयुष्यात सुरक्षित राहण्याचा मार्ग निवडतात. त्यांना सीरियल किलरच्या मनातील कोलाहल पाहून समाधान मिळते. काही लोकांच्या मनात कायदा तोडण्याची आणि बंड पुकारण्याची इच्छा असते. परंतु प्रत्यक्षात ते कृती करू शकत नाहीत. परिणामी वेब मालिकेतून आपल्या सुप्त इच्छा पूर्ण करतात. काही जण मनात दाबून ठेवलेल्या वाईट इच्छा वेब मालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काही जण आपल्या दररोजच्या कामातील थकवा दूर करण्यासाठी मनोरंजन म्हणून त्याकडे पाहतात.

१९९४ साली अमेरिकेत तीन मानसोपचारतज्ज्ञांनी जोनाथन हाईट, पॉल रोजिन आणि सी. मक्ले यांनी एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर संशोधन केले. त्यांनी सुरुवातील विद्यार्थ्यांना सत्य घटनेवर आधारित लघुपट दाखवला. त्यात प्राण्यांवर होणारे अत्याचार दाखवले. परंतु सुमारे ९० टक्के मुले ती डॉक्युमेंट्री पाहू शकले नाहीत. त्यानंतर त्यांना हॉलिवूडचा एक भयपट दाखवला. यात भयानक दृष्यं असतानाही बहुतांश मुलांनी संपूर्ण चित्रपट पाहिला. या संशोधनातून एक निष्कर्ष काढला गेला. तो म्हणजे, हॉलिवूडचा चित्रपट काल्पनिक होता आणि त्यांच्यावर फारसा मानसिक परिणाम झाला नाही. उलट सत्य कथेवरच्या लघुपटाचा अधिक परिणाम झाला. चित्रपटातील गोष्टी या काल्पनिक आहेत, यावर विद्यार्थी समाधानी होते.

अमेरिकेच्या सिव्हिक सायन्स नावाच्या कंपनीच्या एका संशोधनानुसार सत्य घटनांवर आधारित क्राईम शो पाहणा-या महिला प्रेक्षकांचे वय सरासरी १८ ते ३४ आहे. २०१९ च्या एका सत्य घटनांवर आधारित क्राइम शो पाहण्यासाठी सुमारे १६ टक्के महिलांनी रुची दाखवली. यामागचे कारण शोधल्यास महिला पुरुषांच्या तुलनेत सुरक्षेच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात.

तज्ज्ञांच्या मते, आपल्या शरीरात हॅप्पी हार्मोन देखील असतात. (सेराटानिन, ऑक्सिटॉक्सिन, डीपामाईन, एंडोर्फिन) जेव्हा एखादे चित्र पाहून आपण रोमांचित होतो, तेव्हा हॅप्पी हार्मोन शरीरात चांगली ऊर्जा तयार करतात. मात्र कोणतीही नकारात्मक मालिका अधिक पाहिल्यास सुरुवातीला कमी वाटणारा तणाव हा कालांतराने वाढू शकतो. त्यामुळे आपण नेहमीच आपल्या वर्तनावर लक्ष ठेवायला हवे. जर आपण वास्तवाशी नाते तोडत असाल तर अशा मालिका काही आठवड्यांसाठी पाहणे बंद करायला हवे. गुन्हेगारीवर आधारित वेब मालिकांचा सध्या बोलबाला असताना दुसरीकडे मेड इन हेवन, ये मेरी फॅमिली, गुल्लक यासारख्या वेब मालिका देखील लोकप्रियतेत मागे राहिलेल्या नाहीत. अलीकडेच सोनी लाईव्हवर प्रदर्शित झालेल्या ‘गुल्लक-२’ चित्रपटाला टीकाकारांपासून श्रोत्यांपर्यंत भरभरून प्रेम मिळाले आहे. यात हत्या वगैरे दाखवलेले नाही. परंतु रक्ताच्या नात्यातील चढ-उतार दाखवले आहेत. या मालिकेत गुन्हा नाही, परंतु मान-सन्मानाचे दर्शन घडवले आहे. ‘गुल्लक-२’ चे लेखक दुर्गेश सिंह यांच्या मते, भारतासारख्या देशात वीस वर्षे सीआयडी शो चालला. अशा स्थितीत क्राईम शो तर सर्वांना नक्कीच आवडेल.

सोनम परब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या