24.3 C
Latur
Sunday, October 25, 2020
Home विशेष जीन एडिटिंगचे धोके

जीन एडिटिंगचे धोके

एकमत ऑनलाईन

कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून जन्माला आला हे अद्यापतरी पुराव्यानिशी सिद्ध झालेले नसले तरी या दाव्यात तथ्य नाही असे म्हणता येत नाही. या प्रकारामुळे जगाला हादरवून सोडणा-या एखाद्या रोगाला जन्माला घालणारा विषाणू तयार करणे शक्य आहे, हे सर्वांनाच कळून चुकले आहे. जेनेटिक इंजिनिअरिंगमधील तांत्रिक क्रांती लक्षात घेता असा विषाणू निर्माण करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपकरणे सहज उपलब्ध होताहेत. परिणामी, एखादा घातक वैज्ञानिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारा बायो हॅकर त्याचा वापर करून कोरोनापेक्षा दुर्धर, धोकादायक आजार जगात पसरवू शकतो.

कोरोना विषाणूने अमेरिक शिरकाव केला तेव्हा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषाणूला चायनीज विषाणू असे नाव ठेवले होते. हा विषाणू नैसर्गिक नसून तो मानवनिर्मित विषाणू आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. चीनने हा विषाणू जेनेटिक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जाणूनबुजून तयार केला आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेतून अपघाताने याचा फैलाव झाला असे सांगितले गेले. तथापि, हा विषाणू मानवनिर्मित असल्याची शक्यता अनेकांनी नाकारली आहे. कोरोना विषाणू संसर्गामागे जेनेटिक इंजनिअरिंग नसले तरीही भविष्यात असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना विषाणूने पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्थांना गुडघे टेकायला भाग पाडले आहे. एखाद्या आण्विक क्षेपणास्त्रापेक्षाही हा विषाणू हानीकारक ठरू शकतो हे जगातील बहुतांश नेतृत्वांना कळले आहे. त्याहीपेक्षा चिंतेची बाब अशी की जगाला हादरवून सोडणा-या एखाद्या रोगाला जन्माला घालणारा विषाणू तयार करणे शक्य आहे, हे सर्वांनाच कळून चुकले आहे. जेनेटिक इंजिनिअरिंगमधील तांत्रिक क्रांती लक्षात घेता असा विषाणू निर्माण करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपकरणे सहज उपलब्ध होताहेत. परिणामी, एखादा घातक वैज्ञानिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणारा बायो हॅकर त्याचा वापर करून कोरोनापेक्षा दुर्धर, धोकादायक आजार जगात पसरवू शकतो.

मराठा आरक्षणावरुन संभाजी सेना आक्रमक

आजघडीला सरकारी आणि व्यावसायिक प्रयोगशाळांच्या चार भिंतींच्या आड जे प्रयोग केले जात असत ते प्रयोग घरच्या घरी ऑनलाईन व्यापारी संकेतस्थळावरून उपकरणे विकत घेऊन घरातच करता येणे शक्य झाले आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग त्याच्या चांगल्या आणि वाईट क्षमतेसह प्रत्येकाच्या सहजपणे आवाक्यात आहे. विषाणू तयार करण्यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे रोगकारी विषाणूची अनुवांशिक माहिती मिळवणे. उदाहरणार्थ सर्दीला कारणीभूत असणारा कोरोना वर्गातील एक विषाणू अधिक धोकादायक करण्यासाठी त्यात जनुकीय बदल करता येतात. आजवर एखाद्या विषाणूची जनुकीय माहिती मिळवण्यासाठी कोट्यवधी रूपये आणि अनेक वर्षांचे संशोधन करावे लागत होते. ते आता अवघ्या काही हजार रूपयांच्या मोबदल्यात ऑनलाईन सहजपणे मिळू शकते.

सध्या असलेल्या विषाणूचा प्रभाव बदलण्यासाठी त्यांच्या जनुकांमध्ये बदल होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने तेही कॉम्प्युटरवर एखाद्या कागदपत्रांमध्ये बदल करण्याइतके सोपे केले आहे. काही वर्षांपूर्वीच या तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे, त्याचे नाव ‘सीआरआयएसपीआर जीन एडिटिंग’असे आहे. विषाणूपासून बचाव करण्यासाठी जीवाणूंनी जी पद्धती शतकानुशतके विकसित केली त्याच पद्धतीला या तंत्रज्ञानाने कोणत्याही सजीवाचा डीएनए बदलणे अगदी सोपे, सुलभ आणि वेगवान पद्धतीत बदलले आहे. पूर्वी गुणसूत्रांवर प्रयोग करण्यासाठी अनेक वर्षांचा अनुभव, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि कोट्यवधी, अब्जावधी रूपयांची गरज असे.

विद्यापीठामध्ये राज्यव्यापी बेमुदत ठिय्या आंदोलन

आता मात्र ‘सीआरआयएसपीआर जीन एडिटिंग’ तंत्राने हे सारेच सोपे केले आहे. आता इंटरनेटवर काही रूपये मोजून आरएनएची मागणी नोंदवून काही रसायने, एन्झाईम्स देखील खरेदी करता येऊ शकतात. थोडक्यात, तंत्रज्ञानाच्या या सर्व गोष्टी स्वस्त आणि सोप्या झाल्या आहेत. आजमितीला जगभरात हजारो वैज्ञानिक ‘सीआरआयएसपीआर’वर आधारित प्रकल्पांवर प्रयोग करताहेत. त्यापैकी खूपच कमी संस्था एखाद्या जबाबदार संस्थेच्या नियंत्रणात आहेत. अचानक या सर्व गोष्टी कशा शक्य झाल्या हे नियामकांनाही कळेनासे झाले आहे. वास्तविक सर्वच देशांनी आपल्या देशातून या तंत्रज्ञानाचा मुक्त वापर तसेच आरएनए स्क्ववेन्सच्या विक्रवर निर्बंध लावायला हवे होते आणि याविषयी एकत्र येऊन एखादे धोरण तयार करायला हवे होते; परंतू अजूनही असे झालेले नाही. विषाणूच्या धोक्याविषयी डोळ्यात अंजन घालणारे संकट म्हणून कोरोना महामारीकडे पाहून वेळीच या जनुकीय इंजिनिअरिंगला नियंत्रणात आणले पाहिजे.

-विजयालक्ष्मी साळवी

ताज्या बातम्या

दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

पंढरपूर - दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात झेंडूंच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा...

लातूर जिल्ह्यात ५९ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, दोन दिवसांपासून १०० च्या आत असलेली नव्या रुग्णांची संख्या शनिवार दि़ २४ आॅक्टोबर रोजी ५९...

कोरोनारूपी रावणाचा नाश करू या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा...

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी (दि.२४) दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा...

राज्य सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी : आ.पाटील

उमरगा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने केलेली मदत ही तुटपुंजी आहे. राज्यशासनाने किमान पंचवीस हजार मदत द्यायला हवी होती, असे मत आ....

पोटात अन्न नसले तरी महापुरुषांचे गुणगाणं गाणारच

कोरोनामुळे सगळ्याच कला गाव कुसा बाहेर निघू शकल्या नाहीत. महापुरुषांचे गुणगान व त्यांचा इतिहास सर्वांना कळावा म्हणून शहिरी जन्माला आली, शाहीर तसे बो टावर...

‘ज्ञानेश्वरी’तून महिला स्वावलंबी

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : महिलावर्गाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ज्ञानेश्वरी च्या माध्यमाने समाजकारण करताना पतसंस्थेतून महिलांना विविध व्यवसायासाठी पतपुरवठा करत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात आज १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त...

मोटारसायकल चोर पंढरपुर पोलिसांच्या जाळ्यात

पंढरपूर : पंढरपूर शहर व सातारा, सांगली, पूणे इंदापूर अशा वेगवेगळया ठिकाणावरुन मोटार सायकलची चोरी करणा-या चोरांना पकडून त्यांच्याकडून १० मोटार सायकली हस्तगत करण्यात...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

आणखीन बातम्या

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली? महाराष्ट्र दहा महिने कोरोनाचे संकट झेलतो आहे. हे संकट देशव्यापी आहे, यातून बाहेर पडायला सगळ्या जगाला, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला...

चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरली

तीनदा आयपीएलचे चे जेतेपद मिळवलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आज तेराव्या आयपीएलमधील खेळ शारजा मैदानावर जवळपास खल्लास झाला. आणि चेन्नई एक्स्प्रेस रुळावरून...

सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक ओळीचा राजीनामा देत पक्षसदस्यत्वाचा त्याग केला आणि ब-याच महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली....

मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत देवीची उपासना केली जाते. नऊ...

विषाणू प्रसाराच्या ‘थिअरी’चा घोळ

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव कसा होतो, यासंदर्भात गेल्या काही दिवसांत नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे सांगण्यात येत असल्याने गांभीर्य वाढले...

संसर्गमुक्त रक्ताची गरज

आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून २०३० पर्यंत ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ (यूएचसी) प्राप्त करण्याच्या दिशेने भारत आगेकूच करीत...

गरज निकष बदलण्याची

टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स अर्थात टीआरपी हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आकड्यांमध्ये फेरफार करून काही दूरचित्रवाणी वाहिन्यांनी टीआरपी घोटाळा केल्याचे समोर आले आहे,...
1,315FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...