22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeविशेष‘खानांच्या साम्राज्या’ला उतरती कळा!

‘खानांच्या साम्राज्या’ला उतरती कळा!

कोरोनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीला प्रचंड मोठा फटका बसला. या उद्योगाचे अर्थकारण पार कोलमडले. दुसरीकडे या कोरोनाकाळाचा फटका अनेक दिग्गज कलाकारांच्या स्टारडमलाही बसला आहे. खास करून आमिर खान, सलमान खान आणि शाहरूख खान या गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या खानावळीलाही याचा फटका बसला आहे. अर्थातच या खान मंडळींचे स्टारडम कमी होण्यास अन्यही अनेक कारणे आहेत. यामध्ये वयाचा मुद्दा, सार्वजनिक जीवनात केलेली टीकाटिप्पणी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यादरम्यान खिलाडीकुमार अक्षयकुमार याने आपल्या स्टारडमचे प्लॅनिंग खूपच विचारपूर्वक केलेले दिसून आले आहे.

एकमत ऑनलाईन

कोरोना काळात गरीबच नाही तर श्रीमंतांची स्थिती देखील बिघडली आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी देखील यास अपवाद ठरलेल्या नाहीत. कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका नायक-नायिकांना बसला आहे. विशेषत: तीन खानांचे गणित लॉकडाऊनमुळे बिघडले आहे.

चित्रपटगृहे बंद : बॉलिवूडची भिस्त ही चित्रपटगृहांवर अवलंबून आहे. तिकिटबारीच्या कलेक्शनवरूनच चित्रपटांची कमाई निश्चित होते. परंतु गेल्या वर्षभरापासून देशभरातील चित्रपटगृहे बंदावस्थेत आहेत. काही भागात टॉकिज सुरू झाल्या होत्या, परंतु त्याही दुस-या लाटेमुळे बंद ठेवण्यात येत आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून टॉकिजमालकांनी थिएटर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमिर खान, शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला.

बाष्कळ बडबडीने तोटा : दुसरीकडे अलीकडच्या काळात देशातील बदलत्या स्थितीत आणि घडामोडींवर या मंडळींनी केलेल्या टीका- टिप्पणीमुळेही त्यांच्या करिअरवर परिणाम झाला आहे. त्यांनी कशामुळे मतं मांडली किंवा काय मांडली याचे विश्लेषण करण्याची गरज नाही. परंतु त्याचा थेट परिणाम त्यांच्या कारकीर्दीवर झालेला दिसतो.

सोशल मीडियावर ट्रोल : गेल्या काही दिवसांपासून या तिघांनाही सोशल मीडियावरून ट्रोल केले जात आहे. आमिर खान हा जेव्हा तुर्कस्तानला जातो, तेव्हा त्याच्यावर लक्ष ठेवले जाते. सलमान खान तर कोणत्या ना कोणत्या आरोपाखाली वावरत असतो. किंग खानचे लोकांबरोबरचे असलेले काही वादग्रस्त फोटो देखील चर्चेत येतात. त्यामुळे चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली जात आहे.

‘स्पुटनिक लाइट’ला रशियाची मान्यता

वयाचा मुद्दा : या तिन्ही खानांच्या वयातील अंतर हे चार ते पाच महिन्यांचे आहे. यात सलमान खान हा सर्वांत कमी वयाचा तर आमिर खान ५७ वर्षांचा आहे. शाहरूख खान हा आमिरपेक्षा तीन महिन्यांनी लहान आहे. साहजिकच त्यांच्या वयाचा परिणाम स्टारडमवर झाला आहे. बहुतांश टीकाकारांच्या मते, गेल्या काही वर्षांपासून विशेष विचारसरणीचे अनुकरण केल्याने चाहते नाराज झाले आणि त्यांच्यापासून दूर गेले.

अ‍ॅक्शन हीरो फ्लॉप : सलमान खानच्या दबंग-३ चित्रपटाचे खूपच वाईट हाल झाले. आता तर तो कुरापतीमुळे सोशल मीडिया आणि माध्यमात चर्चेत राहत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा चित्रपट ‘एक था टायगर -३’ चा मुहूर्त हा खूपच गुप्ततेने करण्यात आला. त्याचा आणखी एक चित्रपट ‘राधे’ हा पूर्ण होऊनही प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला नाही. लॉकडाऊनशिवाय अनेक प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी ही त्याच्या स्टारडमवर प्रभाव टाकणारी ठरली.

इडियट बॉक्सनेही दिला धोका : केवळ सिनेमाच नाही तर लहान पडद्यावरील जाहिरातींतूनही या तिघांची क्रेझ बाद झाली आहे. आमिर खानपासून अनेक कंपन्या दूर गेल्या आहेत. कधीकाळी शाहरूख खान हा २२ उत्पादकांच्या जाहिराती करत होता तर सलमानकडे दहा कंपन्या असायच्या. मात्र आज त्यांच्याकडे एकही जाहिरात नाही. एवढेच नाही तर सलमानचे टीव्ही शो देखील फ्लॉप ठरले आहेत.

परफेक्शनिस्टची देखील डाळ शिजली नाही : प्रत्येक चित्रपट नियोजनाने तयार करणारा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आमिर खान सध्या आपला चित्रपट ‘लाल सिंह चड्डा’ मध्ये खूपच अडकला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. पण तो अन्य वादातही अडकला आहे. या कारणामुळे त्याचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट ‘महाभारत’ला देखील थांबवावे लागले. एकुणातच कोरोना लॉकडाऊन आणि अन्य कारणांमुळे या तिन्ही खानांचे स्टारडम घसरले आहे. त्यास सांभाळणे अशक्य नाही, परंतु कठीण आहे. कारण ते यातून बाहेर पडण्याचा विचार करतात, तेव्हा लॉकडाऊनचा आघात सहन करावा लागत आहे.

चतुर अक्षय कुमार : यादरम्यान खिलाडीकुमार अक्षयकुमार याने आपल्या स्टारडमचे प्लॅनिंग खूपच विचारपूर्वक केले आहे. एवढेच नाही तर ओटीटीवर त्याचा चित्रपट लक्ष्मी फ्लॉप होऊनही तो आपल्या अटींवरच काम करत आहे. कोरोनाच्या तडाख्यात सापडल्याने तो सध्या शांत बसला आहे. तत्पूर्वी त्याने आपले दोन चित्रपट ‘बेलबॉटम’ आणि ‘अतरंगी’ पूर्ण केले. सध्याच्या काळात त्याच्याकडे किमान पाच चित्रपटांचे काम आहे. एवढेच नाही तर त्याने स्वत:चा व्हीड.ओ गेम विकसित करुन उत्पन्नाचा पर्याय शोधला.

सोनम परब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या