20.5 C
Latur
Friday, November 27, 2020
Home विशेष काळ सोकावता कामा नये!

काळ सोकावता कामा नये!

एकमत ऑनलाईन

बॉलिवूडच्या इतिहासात अनेक कलाकारांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याची उदाहरणे आढळतात. परंतु अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये जो हलकल्लोळ सबंध देशभरात उडालेला दिसून आला तसा प्रकार यापूर्वी कोणाही कलाकाराच्या मृत्यूनंतर घडलेला दिसून आलेला नाही. सुरुवातीला सुशांतसिंहने आत्महत्या केल्याचे सांगितले गेले; परंतु नंतर त्याचा खून झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. खून की मृत्यू याबाबतचा तपास सीबीआय करत असून त्याबाबतचे सत्य अद्याप समोर आलेले नाही. तथापि, गेल्या तीन महिन्यांत इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियातील उतावीळांच्या समूहाने पाहता पाहता सुशांतचा खूनच झाला आहे असा आभास देशभरात निर्माण केला.

त्यातूनच ‘जस्टिस फॉर सुशांत’सारखे नारे दिले गेले, सोशल मीडियावर मोहिमा, हॅशटॅग चालवले गेले. सुशांतला न्याय द्या, ही मागणी त्याचा खून झाला आहे हे सिद्ध झाल्यानंतर केली जाणे योग्य ठरले असते; परंतु त्याबाबतचे गूढ कायम असतानाच अशी मागणी करणे हा उतावळेपणाचा कळस म्हणायला हवा. आपल्या लोकशाही देशात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे. यासाठी स्वायत्त यंत्रणा आहेत. देशात घडणा-या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिस प्रशासन, सीआयडी, सीबीआय आदी संस्था आहेत. त्यांच्या तपासाचे कायद्याच्या चौकटीतून मूल्यमापन करून, आरोपांची शहानिशा करून न्यायदान करणारी न्याययंत्रणा आहे, देशाचे सर्वोच्च न्यायालय आहे. या न्यायिक माध्यमातून न जाता स्वत:च न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन बसून आकांडतांडव करून समाजाची दिशाभूल करणे याला सुज्ञपणा म्हणता येणार नाही. केवळ न्यायाची मागणीच नव्हे तर न्यायालयात किंवा पोलिस ठाण्यात ज्याप्रमाणे साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेतला जातो तशा प्रकारे सुशांतच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधितांची जबानी घेण्यापर्यंत काही माध्यमांनी ‘आघाडी’ घेतली. या सर्व गदारोळामुळे सामाजिक वातावरण, राजकीय वातावरण गढूळ होण्यास मदत तर झालीच; परंतु तपासाचा गुंताही प्रचंड वाढत गेला.

यापलीकडे जाऊन या सर्वातून झालेला चारित्र्यहननाचा, बदनामीचा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे. चारित्र्य ही पैशाहून मौल्यवान गोष्ट मानली जाते. परंतु सुशांतच्या मृत्यूनंतरच्या हलकल्लोळाचे शिंतोडे अनेकांच्या चारित्र्यावर उडून गेले. काहींना हकनाक त्रास झाला. दुसरी चिंताजनक बाब म्हणजे पोलिस विरुद्ध काही माध्यमे हा सामना. सुशांतच्या मृत्यूनंतरच्या सुरुवातीच्या काळात मुंबई पोलिसांनी शांतपणाची भूमिका घेतल्यामुळे, मौन बाळगणे पसंत केल्यामुळे आरोपांचा धुरळा खाली बसण्याऐवजी त्याचे वादळ तयार झाले. मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस यांच्यातील द्वंद्व तर अशोभनीय होते. नंतरच्या काळात मुंबई पोलिसांनी पुढे येऊन भूमिका मांडतानाच टीआरपीतील घोटाळा उघडकीस आणला. यानंतर काही वृत्तवाहिन्या आणि मुंबई पोलिस यांच्यामध्ये जणू कुस्तीचा फड रंगला आहे की काय असे चित्र उभे राहिले. या घोटाळ्यात ठराविक वाहिन्यांचीच नावे असल्याने चॅनेल्समध्ये वाद सुरू झाले. यातून टीआरपीचे निकष बदलणे गरजेचे असल्याचे केंद्र सरकारला पटले. परंतु या सर्वांचे भीषण आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, याचा विचार कुणीच केला नाही हे दुर्दैव आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसही महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर प्रसार माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो.

रुद्रम : युद्धमैदानातील अजेय योद्धा

अशा दोन प्रमुख घटकांमध्येच नित्यनेमाने कलगीतुरा रंगण्यातून समाजात काय संदेश जात असेल? हे कमी की काय म्हणून यामध्ये राजकारणही सामील झाले. बिहारच्या निवडणुकीचा मुद्दा आला. राजकीय शेरेबाजीच नव्हे तर चिखलफेकही झाली. राजकारण्यांनीही समाजमाध्यमांमधून सुरू असलेली बदनामीची मोहीम पुढे नेली. यादरम्यान या प्रकरणाचा तपास करणा-या एनसीबी, सीबीआय, ईडी यांसारख्या केंद्रीय संस्थांमधील अधिका-यांनीही तारतम्य न दाखवता तपासातील मुद्दे उघड करण्यास सुरुवात केली. व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आणले गेले. माध्यमांनी त्याचा आधार घेत आपले दावे खरे असल्याचे सांगत शड्डू ठोकण्यास प्रारंभ केला. वास्तविक, कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना अशा प्रकारे माहिती जाहीर करणे हे तपासावर प्रतिकूल परिणाम करणारे ठरू शकते, त्याचा गैरफायदा गुन्हेगार घेऊ शकतात. पण याबाबतचे भान सदर अधिका-यांना नव्हते.

थोडक्यात, सुशांतच्या प्रकरणात ‘सब घोडे बारा टक्के’ अशी परिस्थिती देशाने अनुभवली. खरे म्हणजे न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे होते. कारण या सर्व स्वायत्त संस्थांमधील, स्तंभांमधील भांडण मिटवण्याचा अधिकार न्यायालयालाच आहे. केंद्र सरकार ते करू शकत नाही. राज्य सरकारवर तर उघडपणाने आरोपच केले जात होते. अशा वेळी या भांडणामध्ये सरकारांनी कोणाही एकाची बाजू घेणे हे पक्षपातीपणाचे ठरले असते. त्यामुळे न्यायालयानेच तत्परता दाखवून यामध्ये हस्तक्षेप करायला हवा होता. काही प्रसारमाध्यमे आमचे कुणीच काही वाकडे करू शकत नाही अशा थाटात बोलू लागली असतील तर त्यांना त्यांच्या जबाबदारपणाची जाणीव करून देण्याचे काम न्यायालयांचेच आहे. पण न्यायालयेच जर अशा वेळी अगतिकता दाखवू लागली तर सर्वसामान्यांचा भ्रमनिरास होईल.

उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी मीडिया ट्रायलबाबत अनेकदा नापसंती व्यक्त केली आहे. भारतामध्ये कोणताही कायदा असा नाही ज्यामध्ये मीडिया ट्रायलला बंदी करण्यात आलेली आहे. याचे कारण प्रसार माध्यमे ही जबाबदारीनेच वागतील असा विश्वास ठेवण्यात आला आहे. पण असे घडत नाही तेव्हा न्यायालयाने हस्तक्षेप करणे क्रमप्राप्त असते. कारण कायद्यानुसार प्रत्येक आरोपी त्याच्याविरोधातील गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष समजला जातो. पण एखाद्या प्रकरणाची चौकशी करून, साक्षीदारांना बोलावून, त्यातून सोयीस्कर अर्थ काढून प्रेक्षकांवर-श्रोत्यांवर लादणे हेही अन्यायकारक आहे. यातून जर एखाद्या निष्पाप, निरपराध व्यक्तीचे प्रतिमाहनन होत असेल आणि कायदा त्याबद्दल काहीच करू शकत नसेल तर निश्चितपणाने कायद्यातील ही उणीव सुधारणे गरजेचे आहे. कारण बदनामीविरोधात प्रत्येकालाच न्यायालयात धाव घेणे शक्य नसते. ते खर्चिकही आहे आणि त्यासाठी स्वत:ला न्यायालयाच्या कठडीत उभे राहावे लागत असल्याने बहुतांश जण त्यापासून निमूटपणाने लांब राहतात.

पदोन्नतीतील आरक्षणासाठी मंत्रिगटाची नियुक्ती ! उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिगटाचे अध्यक्ष

पण यामुळे काळ सोकावतो आहे का, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. एकंदरीत, सुशांतच्या प्रकरणात गेल्या १०० दिवसांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्याबाबत ‘झाले गेले गंगेला मिळाले’ असे म्हणतानाच माध्यमे, पोलिस प्रशासन, न्यायालये, राजकारणी आणि समाज या सर्वांनीच अंतर्मुख होऊन विवेकबुद्धीने, तारतम्याने विचार करण्याची गरज आहे हे अधोरेखित केले आहे. एकमेकांकडे बोट दाखवण्याने आणि सूडाने पेटून उठण्याने वितुष्ट वाढवत नेण्यापेक्षा आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. कारण म्हातारी मेली आहेच; आता अपेक्षा आहे ती काळ न सोकावण्याची !
(शब्दांकन : हेमचंद्र फडके)

अ‍ॅड. उज्ज्वल निकम
विशेष सरकारी वकील

ताज्या बातम्या

वीजबिलात सवलतची घोषणा करताना घाई, चूक झाली – अशोक चव्हाण यांची प्रांजळ कबुली

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घाई केली. पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला...

आता सरकारला शॉक द्यावा लागेल -राज ठाकरे

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) कोरोनाचे संकट असतानाही सरकारचे डोळे उघडावेत यासाठी आमच्यावर रस्‍त्‍यावर उतरून आंदोलन करण्याची, मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. राज्‍य सरकार जर जनतेला वाढीव...

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान !

मुंबई, दि.२६ (प्रतिनिधी) २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांशी मुकाबला करताना प्राणाची आहुती देणाऱ्या वीर पोलीस...

लातूर रेल्वे बोगी प्रकल्पात फेब्रुवारीत प्रत्यक्ष उत्पादन

चाकूर : मराठवाड्याच्या विकासात महाक्रांती आणणा-या व येथील तरुणांना रोजगाराची दारे खुली करणा-या लातूर येथील मराठवाडा रेल्वे बोगी प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून...

नव्या रेल्वे मार्गामुळे दक्षिण भाग जोडला जाणार

निलंगा : निजामकाळापासून (गेल्या ७२ वर्षांपासून) दक्षिण भाग रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी धूळखात पडून असलेल्या रेल्वे मार्गाला अखेर माजीमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नांतून मंजुरी...

नौदलात दोन प्रीडेटर ड्रोन दाखल

नवी दिल्ली: चीनबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारताने अमेरिकेकडून दोन प्रीडेटर ड्रोन भाडेतत्त्वावर घेतली आहेत. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर ही ड्रोन तैनात केले जाण्याची शक्यता...

एक देश, एक निवडणूक ही काळाची गरज

गांधीनगर : एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला...

मुंबईवर हल्ल्याचे इस्त्रायलमध्ये स्मारक

तेल अवीव: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात भारतासह इतर देशांतील नागरिकांचा मृत्यू झाला होता. दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ इस्रायलमध्ये एक...

लालूप्रसाद यादवांविरोधात पोलिसांत तक्रार

पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या...

आशिया खंडात भारत लाचखोरीत अव्वलस्थानी

नवी दिल्ली : एका सर्वेक्षणातून संपूर्ण आशिया खंडात भारतात सर्वाधिक लाचखोर असल्याचे समोर आले आहे. भारतात लाचखोरीचे प्रमाण हे ३९ टक्के असल्याचे या ट्रान्सपरन्सी...

आणखीन बातम्या

वाचवा…

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी साता-याजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. दुस-या दिवशी नाशिक जिल्ह्यात अशीच घटना घडली आणि तिस-या...

बायडन-हॅरिस युगातील सुगम्य सोयरिक

जोसेफ बायडन आणि कमला हॅरिस या जोडगोळीच्या विजयाला अधिकृत पुष्टी १४ डिसेंबरपर्यंत मिळणार नसली तरी आगामी चार वर्षे हीच जोडी राज्य करणार हे स्पष्ट...

न्यूमोनियावर नियंत्रण शक्य

भारतासह जगभरात न्यूमोनियाचे प्रमाण वाढत आहे. देशात दर हजार लोकसंख्येमागे (खूप लहान किंवा वृद्ध मंडळींमध्ये) ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. शासकीय...

कार्तिकी एकादशी

कार्तिक मासातील शुक्ल पक्ष एकादशी यंदाच्या वर्षी २५ नोव्हेंबरला आहे. आषाढी एकादशी ही महा-एकादशी मानली जाते. त्याचप्रमाणे कार्तिक शुक्ल एकादशीलाही महा-एकादशी मानली जाते. आषाढ...

माझे संविधान, माझा अभिमान!

काही दिवसांपूर्वी एका न्यूज चॅनेलवर ‘भारतीय राज्यघटने’विषयी डिबेट पाहत होतो. डिबेटचा मुख्य विषय होता, ‘राज्यघटना : बदल व दुरुस्ती’. मुळात हा विषय चर्चेत घ्यावाच...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...