22.1 C
Latur
Monday, October 26, 2020
Home विशेष आर्थिक घसरण आणि पर्यावरण

आर्थिक घसरण आणि पर्यावरण

एकमत ऑनलाईन

अर्थव्यवस्था ऊर्जितावस्थेत असतानाच पर्यावरण संरक्षणाच्या चळवळी आणि अन्य प्रयत्न गतिमान असतात. अर्थव्यवस्था मंदावल्यानंतर लोक आत्मसंरक्षणाला प्राधान्य देतात आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष होते. सरकारला हे दोन बिंदू जोडायचे आहेत. मंदीच्या प्रारंभिक काळात पर्यावरणाला मिळालेले फायदे कायम ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यांचा संबंध आर्थिक घडामोडींशी जोडला पाहिजे. असे झाले नाही, तर आज अर्थव्यवस्थेची जी अवस्था झाली आहे तशीच पर्यावरणाची होऊ शकते.

आधीपासूनच संकटात असलेल्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची कोरोना संकटाच्या भीतीमुळे अधिकच पीछेहाट होत आहे. टोकाच्या आर्थिक संकटाचा भयावह परिणाम १९८० नंतर प्रथमच इतक्या गडदपणे तिमाही जीडीपीच्या आकडेवारीतून समोर आला आहे. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था अधिकच संकटात सापडली असल्याचे या आकडेवारीवरून समोर आले आहे. राष्ट्रीय सांख्यिक कार्यालयाने (एनएसओ) सादर केलेल्या आकडेवारीवरून असे स्पष्ट झाले आहे क, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीचा वेग एप्रिल ते जून २०२० या तिमाहीत तब्बल २३.९ टक्क्यांनी घटला आहे.

नोटाबंदी तसेच वस्तू आणि सेवाकरामुळे (जीएसटी) आधीच गेल्या दोन वर्षांपासून अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावली होती. परंतु सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या महासंकटामुळे भयानक अवस्था होण्याचे संकेत मिळत आहेत. अर्थव्यवस्थेतील अनेक मोठ्या क्षेत्रांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. उदाहरणार्थ, उत्पादन क्षेत्रातील आर्थिक घडामोडींमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. तर बांधकाम क्षेत्रातील ही घट ३९ टक्के इतक आहे. पर्यटन क्षेत्रातील घट ४७ टक्के इतक आहे. या घसरणीमुळे बेरोजगारी तर वाढलीच आहे; शिवाय गरिबीही वाढली असून, सामान्य नागरिकाला गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळणेही दुरापास्त झाले आहे. गेल्या चार दशकांतील सर्वाधिक घसरण दाखविणा-या या आकडेवारीवरून असे समोर आले आहे क, देश आर्थिकदृष्ट्या गंभीर संकटात आहे, तसेच ही स्थिती पर्यावरणासाठीही चांगली नाही.

सीरमचा पुढाकार : नाकातून द्यावयाच्या लसीचे भारतात उत्पादन!

भारतासाठी चिंता करण्याजोगी आणखी एक गोष्ट अशी की, मानवी विकास निर्देशांकात (एचडीआय) कोणतीही विशेष प्रगती झालेली नाही आणि त्यामुळे आर्थिक घसरणीवर उपाय करणे शक्य नाही. संयुक्त राष्ट्रांच्या २०१९ च्या एचडीआय अहवालानुसार १८९ देशांच्या यादीत भारत १२९ व्या स्थानावर आहे. याचा अर्थ राहणीमान, दरडोई उत्पन्न आणि शिक्षणाच्या स्तरावर सामाजिक क्षेत्राचा विकास फारच असमाधानकारक आहे. भूतकाळावर नजर टाकली असता असे दिसते की, सामाजिक विकास चांगला झाल्यास लोकांमध्ये पर्यावरणाविषयी आपोआपच जागरूकता येते आणि त्याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्थेत घसरण झाल्यास लोक आत्मसंरक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करतात आणि पर्यावरणाची चिंता करत नाहीत. यावरून असे स्पष्ट होते की, नर्मदा बचाओ आंदोलन किंवा टिहरी प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलन अशा वेळी झाले, जेव्हा अर्थव्यवस्था घसरणीला लागलेली नव्हती तर प्रगती करत होती.

अनेक जाणकारांच्या मते, अर्थव्यवस्था जेव्हा मंदगतीने चालत असते तेव्हा ती गतिमान असण्याच्या कालावधीच्या तुलनेत नैसर्गिक संसाधनांवर कमी दबाव पडतो आणि त्यामुळे पर्यावरणाला बराच काळ हवा असणारा दिलासा मिळत असतो. परंतु हे अल्पकालीन यशच असते. कारण दीर्घकालीन स्वरूपात जलवायू परिवर्तनासाठी सुरू केलेल्या अनेक योजनांचा वेग मंदावला आहे. यात जलवायू परिवर्तनाविरुद्धचा संघर्ष, हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे तसेच प्रदूषणाची समस्या दूर करणे आदींचा समावेश आहे. या सर्व कृती सुदृढ अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतात. कारण त्यातूनच त्यांना वित्तपोषण मिळत असते. शाश्वत वित्तीय संसाधनांच्या अभावाने भारतात पर्यावरण संवर्धनाचे अनेक प्रयत्न थंड पडू लागतील आणि त्या प्रयत्नांमध्ये कोणतीही प्रगती होणार नाही.

सरकार एककडे अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यात तर दुसरीकडे कोरोना संसर्गाशी लढण्यात व्यग्र आहे. अशा स्थितीत पर्यावरण संवर्धन आणि त्याच्याशी निगडित पैलू दुर्लक्षित केले जातील. पर्यावरणाचे नुकसान होण्यास आणखी एक घटक कारणीभूत ठरेल आणि तो म्हणजे, कॉर्पोरेट कंपन्यांकडून या कामासाठी सामाजिक जबाबदारी निधीतून (सीआरएस फंड) दिली जाणारी मदत कमी होईल आणि त्यामुळे त्यातून चालणारे प्रयत्न व्यावहारिकरीत्या थंड पडतील. अर्थव्यवस्थेत घसरण झाल्यामुळे अधिकांश व्यवसाय-उद्योगांना पैशांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे आणि कर्मचा-यांचे मासिक वेतन देतानाही त्यांना अडचणी येत आहेत.

शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला पायलट

अशा स्थितीत सीएसआर फंड देणे कठीण आहे. या कारणामुळे पर्यावरणाला दुहेरी फटका सहन करावा लागेल. कारण एकीकडे सरकारी योजनाही थंड पडतील आणि दुसरीकडे सीआरएस योजनांना प्राधान्यक्रम आणि तरतुदीची कमतरता या समस्यांचा सामना करावा लागेल. निधीची कमतरता तसेच कठोर सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि लॉकडाऊनमधील परिस्थितीमुळे पर्यावरणाच्या संदर्भातील अनेक योजनांना खीळ बसली आहे. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण या योजनांमध्ये आतापर्यंत झालेली प्रगतीही यामुळे कुचकामी ठरू शकते.

आर्थिक घसरण आणि पर्यावरणाची हानी या दोन गोष्टींमध्ये थेट संबंध आहे. पर्यावरणाचे हित जोपासण्यासाठी अशा स्थितीत सरकारने या दोन्ही गोष्टी परस्परांपासून वेगळ्या करणे उचित ठरेल. आर्थिक घसरण आणि पर्यावरणावर त्याचा थेट परिणाम हे मुद्दे अलग करण्यासाठी सरकारला मंदीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पर्यावरणाला झालेला लाभ पुढे कायम ठेवावा लागेल. नैसर्गिक घटकांचे कमीत कमी दोहन झाल्यामुळे पर्यावरणाला दिलासा आणि प्रदूषणात घट झाली, या घटना विशेष आर्थिक घडामोडींशी जोडायला हव्यात. या घडामोडींचा उद्देश पर्यावरणाचे रक्षण आणि त्या क्षेत्रात रोजगारनिर्मिती हा असायला हवा. यामुळे दोन समस्या एकाच वेळी निकाली निघतील. एक म्हणजे बेरोजगारीची समस्या सौम्य होईल आणि दुसरीकडे पर्यावरणाचेही संरक्षण होईल.

अशाच प्रकारे कोविड-१९ मुळे दिवाळखोरीत निघालेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी सरकार विशेष वित्तीय, तांत्रिक आणि संरचनात्मक सहायक पॅकेज देऊन अशा उद्योगांना नवसंजीवनी देऊ शकते. त्यासाठी त्यांना अपारंपरिक ऊर्जा किंवा अन्य कोणत्याही पर्यावरण रक्षणाशी निगडित क्षेत्रात व्यवसाय करणे अनिवार्य केले जाऊ शकते. अंधा-या रात्रीही जशी वीज चमकते, तसेच प्रत्येक आर्थिक संकट एका संधीचे घेऊन समोर येऊ शकते. मात्र आपण पर्यावरण संरक्षणाला महत्त्व देणे ही यामागील अनिवार्य बाब आहे. जर असे झाले नाही, तर पर्यावरणाची अवस्थाही अर्थव्यवस्थेसारखीच होऊ शकते, हे ध्यानात घेतले पाहिजे..

प्रा. रंगनाथ कोकणे

ताज्या बातम्या

तलवार,खंजर घेऊन फिरणा-या तिघांना अटक

नांदेड : नवरात्री व दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या बंदोबस्तात बेकायदेशीररीत्या तलवार, खंजर घेऊन फिरणा-या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व...

रांगोळीतून साकारली तिरुपती बालाजीची प्रतिकृती

परभणी : कोरोनामुळे यावर्षी बालाजीच्या दर्शनाला जाता न आल्याने विद्यानगरातील कुलकर्णी परिवाराने दस-यानिमीत्त १५ तासात तिरूपती बालाजीचे प्रतिकृती रांगोळीतून साकारली. शहरातील विद्यानगरातील माऊली मंदिराजवळ राह.णारे...

कोरोना चाचणी आता ९८० रुपयात, चाचणी शुल्कात चौथ्यांदा कपात !

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीच्या दरात आणखी कपात करण्यात आली आहे. आजपासून तपासणीसाठी केवळ ९८० रुपये लागणार आहेत. रुग्णालयातून...

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली तिखट टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून या टीकेला आज भाजपकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले....

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या रावणरुपी पुतळ्याचे दहन

चंदिगढ : विजयादशमीनिमित्त देशभरामध्ये रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात आले असताना मात्र पंजाबमध्ये एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्यावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावून पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने...

हा नवा भारत.. घरातच नाही बाहेरही घुसून मारू – डोवाल यांचे वक्तव्य

ऋषिकेश : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विजयादशमीच्या निमित्त केलेल्या संबोधनात चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. नवा भारत नव्या...

आणखीन बातम्या

जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाच्या बांधणीसाठी खस्ता खाल्ल्या त्या पक्षात आपल्याला आता भवितव्य तर सोडाच, पण तोंडदेखला मानसन्मानही मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंतर भाजपचे...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली? महाराष्ट्र दहा महिने कोरोनाचे संकट झेलतो आहे. हे संकट देशव्यापी आहे, यातून बाहेर पडायला सगळ्या जगाला, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला...

चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरली

तीनदा आयपीएलचे चे जेतेपद मिळवलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आज तेराव्या आयपीएलमधील खेळ शारजा मैदानावर जवळपास खल्लास झाला. आणि चेन्नई एक्स्प्रेस रुळावरून...

सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक ओळीचा राजीनामा देत पक्षसदस्यत्वाचा त्याग केला आणि ब-याच महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली....

मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत देवीची उपासना केली जाते. नऊ...

विषाणू प्रसाराच्या ‘थिअरी’चा घोळ

कोरोनाच्या विषाणूचा फैलाव कसा होतो, यासंदर्भात गेल्या काही दिवसांत नवनवीन चर्चा ऐकायला मिळत आहेत. हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे सांगण्यात येत असल्याने गांभीर्य वाढले...

संसर्गमुक्त रक्ताची गरज

आयुष्मान भारत, राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून २०३० पर्यंत ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ (यूएचसी) प्राप्त करण्याच्या दिशेने भारत आगेकूच करीत...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...