21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home क्रीडा ‘माही’युगाचा अंत !

‘माही’युगाचा अंत !

एकमत ऑनलाईन

भारताला अनेकदा पराभवाच्या खाईतून बाहेर काढून विजय मिळवून देणारा एक सफल कर्णधार, तडाखेबाज फलंदाज आणि मुत्सद्दी यष्टीरक्षक ‘कॅप्टन कुल’ महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटच्या खास करून छोट्या प्रारूपातील त्याच्या नेतृत्वाची बरोबरी करणे केवळ अशक्य असून त्याच्या निवृत्तीने भारतीय क्रिकेट मधील एक वादळ शमले आहे.

एक दिवशीय सामन्यांमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरीने १०७७३ आणि कसोटी मध्ये ३८ च्या सरासरीने ४८७६ धावा करणा-या धोनीने भारताला २७ पेक्षा जास्त सामने जिंकून दिले आहेत. तथापि, केवळ आकडेवारी वरून त्याच्या कारकिर्दीच्या आलेखाचे विश्लेषण करता येणार नाही. त्याची कप्तानी, सामन्यातील परिस्थिती ओळखून अचूक निर्णय घेण्याची क्षमता, धडाकेबाज फलंदाजी आणि यष्टीमागील जबरदस्त चपळतेचे क्रिकेट रसिक चाहते होते.

तो धोका पत्करून निर्णय घेत असे. २००७ च्या टी-२० स्पर्धेतील अंतिम षटक नवख्या जोगिंदर शर्माला देणे असो की २०११ च्या विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये फॉर्मात असलेल्या युवराज ऐवजी स्वत: फलंदाजीला येणे, हे दोन्ही महत्त्वाचे सामने भारताने जिंकले. सुरुवातीच्या काळातील त्याचे लांब केस ( पाक पंतप्रधान मुशर्रफ यांनी ही स्तुती केली होती), त्याचा हेलिकॉप्टर शॉट, त्याचा कुलनेस, सामन्याच्या अंतिम षटकात षटकाराने विजय आदी गोष्टी क्रिकेटप्रेमींच्या सदैव स्मरणात राहतील. धोनीला शुभेच्छा !!

-प्रा. विजय कोष्टी,
कवठे महांकाळ (जि. सांगली)

जळकोट ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या