33.3 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home विशेष सदापर्णी वृक्ष ‘करंबळ’

सदापर्णी वृक्ष ‘करंबळ’

एकमत ऑनलाईन

करंबळ हा सदापर्णी वृक्ष समशितोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात वाढलेला आढळतो. करंबळ हा वृक्षडेरेदार व देखणा असल्यामुळे शोभेसाठी सुद्धा लावला जातो. या देखल्या वृक्षाचे मूळ स्थान आशिया खंडातील असावे असा अंदाज आहे. या सदापर्णी वृक्षाचा प्रसार हिमालयाच्या प्रदेशात (कुमाऊँ, गढवाल, आसाम, बंगाल) आणि दक्षिणेस मध्य व द्विपकल्पीय भागातील जंगलात झालेला आहे. हा डेरेदार वृक्ष भारत, श्रीलंका, नेपाळ,चीन, भूतान, म्यानमार, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया या देशात वाढलेला आढळतो. हा वृक्ष जंगलातील नाल्यांच्या, नदीच्या काठाने वाढलेला आपल्या दृष्टीस पडतो. महाराष्ट्रात हे सदापर्णी वृक्ष अलिबाग, सावंतवाडी आणि कोकणात चांगले वाढलेले आढळतात. याशिवाय विदर्भातील मेळघाट जंगलातील परिसरात सुद्धा वाढलेल आढळतात.

करंबळ या सदापर्णी वृक्षाला समशितोष्ण व दमट हवामान चांगले मानवते. स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाशात याची वाढ चांगली होते. करमळ या देखण्या वृक्षाच्या लागवडीसाठी कोणत्याही प्रकारची जमीन चालते. जमीन सकस खोल, काळी भुसभुशीत असल्यास पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी लागते. सकस आणि आम्लधर्मी जमीन असल्यास या वृक्षाची वाढ जोमदारपणे होते. जमिनीचा सामू (पीएच) ५.५ ते ७.० च्या दरम्यान असल्यास या वृक्षाची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते.करंबळ या डेरेदार वृक्षाची अभिवृद्धी बियाद्वारे अथवा कलमाच्या सहाय्याने करता येते. ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात पक्व झालेली फळे गोळा करून त्यातील बिया गादी वाफ्यावर किंवा पॉलिथिन पिशवीमध्ये लावून रोपवाटिकेत तयार करावीत.

करमळ या आकर्षक शोभेसाठी वृक्षाची लागवड करण्यापूर्वी उन्हाळ्यात ८ ७८ मीटर अंतरावर १७ १ ७ १ मीटर आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत. या खड्ड्यामध्ये शेणखत, कुजलेला पालापाचोळा आणि माती समप्रमाणात मिसळून भरून घ्यावेत. या खड्ड्यामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर खड्ड्याच्या मधोमध रोपवाटिकेत तयार केलेली रोपे लावावीत. रोपे लावताना त्यांच्या मुलांना कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. रोपे लावल्यानंतर त्याच्या चारही बाजंूनी माती पायाने दाबून घ्यावी व लगेचच सिंचनाची व्यवस्था करावी.करंबळ वृक्षाची फळे खोकल्यावरील औषधीमध्ये वापरतात. करंबळीच्या पिकलेल्या फळाचा रस काढून साखरेच्या पाण्यात घोटावा. हे घोटून तयार केलेले मिश्रण ज्वरात आणि खोकल्यात फायदेशीर असते. तसेच या पाण्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट असल्यामुळे शौचास साफ होते.अतिश्रमामुळे तसेच जास्त अशक्तपणा असल्यास पाय वळतात. ज्यामुळे चालताना त्रास होतो. त्यासाठी करमळच्या साली चा रस तयार करावा. हा रस मिरपूडमध्ये मिसळून पायावर लावावा. व त्यावर करमळची पाने बांधावीत. यामुळे थोडीशी आग होते. पण फोड येत नाहीत.

करंबळीच्या फुलांचे व फळाचे जाड मांसल पुष्पमुकुट दले आंबट चवीची असतात. ही दले स्थानिक लोक खाण्यासाठी वापरतात. ब-याच वेळाही दले वाळवून आमसुलीप्रमाणे वापरतात. तसेच या संदलापासून जाम, जेली आणि शरबते सुद्धा करतात. फळाची भाजी, चटणी आणि लोणचे करतात. खास करून कढीमध्ये याचा वापर करतातक़रमळ फळ जीवसत्व बने समृद्ध असलेले आहे. त्यामुळे जर अशक्तपणा जाणवत असेल. या फळाचे नियमित सेवन करावे. तसेच या फळामधील (प्रथिने व पोषक द्रव्यामुळे) मेंदू आणि मज्जातंतूंना जास्तीची ऊर्जा मिळते. चयापचय क्रियाही चांगली होते. आयुर्वेदानुसार करमळ फळे तोंडातील दुर्गंधी कमी करण्यास अत्यंत उपयुक्त आहे.यामध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म असल्यामुळे तोंडातील जीवाणू नष्ट होतात. त्यासाठी करमळच्या फळाचा काढा तयार करू घ्यावे नियमितपणे गुळण्या केल्यास फायदा होतो.

वेल डन इंडिया; भारताचे संयुक्त राष्ट्राकडून कौतुक

सध्याच्या युगात कामाच्या अतिव्यापामुळे धावपळ जास्त होते. व त्यामुळे नैराश्य निर्माण होते. करमळ फळामध्ये स्टेरॉल सॅपोनिन आणि टॅनिन असतात. जे उपशमन (वेदना कमी करणे) करण्यास मदत करतात. ज्यामुळे मज्जासंस्थांचे व मेंदूचे कार्य सामान्य होते. त्यामुळे नैराश्यता कमी होऊन स्मरणशक्ती वाढते व आराम मिळण्यास मदत होते. करंबळ फळामध्ये जीवनसत्व सी व ई आणि फ्लेवोनॉईड असे तीन अ‍ॅन्टीऑक्सिडंट असतात. त्यामुळे त्वचेची लवचिकता चांगली राहते व तसेच (जे कोलेजन निर्माण करण्यास मदत करतो त्वचेवरील सुरकुत्या कमी होातत. त्यामुळे आपण जास्त तरुण दिसतो. करमळ फळ जीवनसत्व अ ने समृद्ध असलेले आहे. ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. जर रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास फ्लू, सर्दी, ज्वर सारख्या रोगाच्या संसर्गासाठी आपण संवेदनशील होतो. त्यासाठी आहारात फळाचा वापर करावा.

करंबळ फळामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. ज्यामुळे मुत्रपिंड अधिक कार्यक्षम राहते. त्यामुळे शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. त्यासाठी पिकलेल्या फळाच्या काही फोडी किंवा फळाच रस दररोज नास्त्यामध्ये सेवन करावा. करमळ फळामध्ये लोह विपुल प्रमाणात असते. लोहामध्ये लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते. त्यामुळे ज्या व्यक्तीना रक्तातील तांबड्या पेशीचा कमतरता (अ‍ॅनिमिया) असते. त्यांनी नियमितपणे दररोज एकवेळा काही दिवस या फळाचा रस घ्यावा. करंबळ फळाच्या गरामध्ये द्रव पदार्थ (पाणी) शोषण करण्याचे गुणधर्म आहेत. ब-याच वेहा मलाचे खडे झाल्यामुळे शौचाला त्रास होतो. अशावेळी या फळाचा गर सेवन केल्यास पाणी शोषण केल्याने मलाचे खडे होत नाहीत. त्यामुळे मलनिस्सारण व्यवस्थित होतेक़रमळ फळामध्ये कोंडा कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यासाठी या फळातील गर पाण्यामध्ये मिसळून मंद आचेवर लावावा त्यामुळे कोंडा कमी होतो व केसही मजबूत होण्यास मदत होते.

करंबळ झाडाचे लाकूड तांबूस भुरे किंवा करड्या रंगाचे असून मजबूत व पाण्यात चांगले टिकणारे असते. हे लाकूड घरबांधणी, नावा, बंदुकीची दस्ते, वल्ही, हत्याराचे दांडे, कपाटे व सजावटी सामान व खेळणी तयार करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. सालीपासून काढलेल्या धाग्याचे दोर दोरखंड करतात. करबळीची पाने आकाराने मोठी असल्यामुळे, पानापासून पत्रावळ्या तयार करतात. तसेच या पानांनी हस्तिदंत आणि शिंगे यांना झिलई देतात. या वृक्षाची पाने जाड, थोडी सुवासिक, लवकर न कुजणारी, भुरकट रंगाची व सुकल्यावर गोल वळणारी असल्यामुळे बिडी तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या