22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeविशेषधनकुबेरांचा खर्चमहिमा

धनकुबेरांचा खर्चमहिमा

कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला आहे तर अनेकाचे वेतन कमी झाले आहे. व्यवसाय देखील मंदावला आहे. अशा काळात लोकांनी खर्च हा काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. जगातील धनाढ्य मंडळी आपला पैसा कसा खर्च करतात हे जाणून घेऊ. केव्हा, कोठे आणि कशा रीतीने ते पैशाचा वापर करतात ते पाहू.

एकमत ऑनलाईन

वॉरेन बफे : बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष आणि सीईओ बफे हे जगातील गर्भश्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी १९५८ मध्ये केवळ ३१,५०० डॉलरवर घर खरेदी केले आणि ते त्या घरात अजूनही राहत आहेत. त्यांच्याकडे कोणताही सेलफोन नाही आणि संगणकही नाही. २०१४ मध्ये त्यांनी एका बैठकीत सांगितले की, क्वालिटी ऑफ लाईफ ही पैशावर अवलंबून नाही. त्यांच्या मते, जर माझ्याकडे सात-आठ घरे असली असती तर आपले आयुष्य आनंदाने गेले नसते, उलट खराब झाले असते. त्यामुळे माझ्याजवळ गरजेच्या सर्व वस्तू आहेत आणि मला आता काहीच नको. कारण एका काळानंतर या गोष्टींना महत्त्व राहत नाही.

मार्क झुकेरबर्ग : फेसबुकचे संस्थापक झुकेरबर्ग हे धनाढ्य व्यक्ती आहेत. मात्र ते, त्यांची पत्नी प्रिन्सिला आणि मुलगी हे अत्यंत साधेपणे जीवन जगतात. त्यांना आपण नेहमीच टी शर्ट आणि जिन्समध्ये पाहू शकतो. ते म्हणतात, की कमीत कमी निर्णय घेण्याची गरज पडेल असे आयुष्य मला जगायचे आहे. याशिवाय मानव समुदायाची सेवा करण्याची इच्छा आहे. श्रीमंतीची भुरळ त्यांना कधीच पडली नाही. या कारणामुळे त्यांनी २०१५ मध्ये आपल्या आयुष्यभराच्या संपूर्ण कमाईचा ९९ टक्के भाग देणगीस्वरूपात देण्याची घोषणा केली होती.

नारायण मूर्ती : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे नेहमीच साधे राहतात. मूर्ती आजकाल मध्यमवर्गीय स्वरूपाच्या घरात राहत आहेत. ते इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करतात. सुरुवातीच्या काळात ते मारुती ओम्नी चालवत होते. आता चालकाबरोबर स्कोडा चालवतात.

कालौस एल्जिम : हेलु समूह कार्सोचे संस्थापक कार्लोस हे ४० वर्षांपेक्षा अधिक काळ आपल्या ६ रूममध्ये राहत आहेत. आपल्याजवळील प्रचंड पैसा हा स्वत:वर खर्च करण्यापेक्षा कंपनीवर खर्च करतात. एकदा ते म्हणाले, की पैसा हा बागेप्रमाणे असतो. कारण आपण त्याचे रोपण करतो, त्यात सतत गुंतवणूक केल्याने वाढ होत जाते. वेगवेगळी झाडे म्हणजेच वेगवेगळ्या फंडात पैसे टाकून त्याची वाढ करतो.

ब्रिटनमध्ये मुलांसाठी फायझरच्या लसीला मंजूरी

अझिम प्रेमजी : भारतातील सर्वांत धनाढ्य व्यक्तींपैकी असलेले अझिम प्रेमजी यांच्याकडे १६.६ अब्ज डॉलर मालमत्ता आहे. परंतु एवढा पैसा त्यांना ऑटोरिक्षाने विमानतळावर जाण्यापासून रोखू शकत नाही. एवढेच नाही तर ते आपल्या कंपनीत वापर होणा-या टॉयलेटपेपरचा हिशेबही ठेवतात. प्रेमजी हे इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करतात आणि सेकंड हँड मोटारीतून जातात. याशिवाय ते कर्मचा-यांना दिवे बंद करण्यास सांगतात. त्यांना सामाजिक जबाबदारीचे भान आहे. त्यांना भारताचे आधुनिक कर्ण मानतात.

इंगवर कॅम्प्रेड : स्वीडनचे श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले इंगवर कॅम्प्रेड हे इकॉनॉमी क्लासमधून प्रवास करत. ते सामान्य कॅफेतही भोजन करायचे. ते ३९०३ अब्ज डॉलरचे मालक होते. ते जुनी व्हॉल्वो गाडी चालवत असत. त्यामुळेच त्यांना अब्जाधीश गरीब असेही म्हटले जात होते. २७ जानेवारी २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले.

अमांसियो ऑर्टेगो : इंडिटेक्सचे संस्थापक स्पॅनिश उद्योगपती अमांसियो ऑर्टिगो हे सरा मुख्यालयात कॅफेटेरियामध्ये कर्मचा-यांसमवेत भोजन करतात. फॅशन चेन ‘सरा’चे संस्थापक हे जगातील दुस-या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती मानले जातात. परंतु त्यांनी व्यक्तिगत खर्चाच्या सवयी बदलल्या नाहीत.

जुडीथ फॉल्कनर : माध्यमांपासून दूर राहणा-या जुडीथ फॉल्कनर यांनी खासगी हेल्थकेअर कंपनी एपिक सिस्टिम्स तयार केली आणि ती मेडिकल सॉफ्टवेअर तयार करते. जुडी नावाने प्रसिद्ध असलेल्या फॉल्कनर यांनी १९७९ मध्ये ७० हजार डॉलरच्या भांडवलातून कंपनी सुरू केली. ७७ वर्षीय जुडीथ यांचे राहणीमान साधे राहिले आहे. पंधरा वर्षात त्यांनी केवळ दोन गाड्या घेतल्या. पतीबरोबर त्या एकाच घरात तीस वर्षांपासून राहत आहेत. २०१५ मध्ये त्यांनी आपली निम्मी संपत्ती स्वयंसेवी संस्थेला देण्याची घोषणा केली. आपला पैसा दुस-यांच्या मदतीसाठी वापरण्याची त्यांची इच्छा आहे. विशेषत अन्नासाठी भटकंती करणारी माणसं.

विनिता शाह

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या