35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeक्रीडाषटकारांची आतषबाजी

षटकारांची आतषबाजी

एकमत ऑनलाईन

शारजाच्या छोटया मैदानाचा फायदा घेत फलंदाजांनी केलेल्या षटकारांच्या आतषबाजीत रंगलेल्या आयपीएलच्या तेराव्या पर्वातील चौथ्या सामन्यात राजस्थानने तगड्या चेन्नई संघाचा १६ धावांनी पराभव केला. राजस्थानचा विजय झाला असला, तरी ख-या अर्थाने क्रिकेटच्या मनोरंजनाची मेजवानी दूरदर्शनच्या दर्शकांनी अनुभवली. दोन्ही संघांकडून तब्बल ३३ षटकारांची आतषबाजी करून ४१६ धावांचा पाऊस पाडला. सामन्यातील सर्वाधिक षटकार(३३) विक्रमाची बरोबरी केली नाणेफेकीचा कौल धोनीच्या बाजून लागला त्यांनी गोलंदाजी स्वीकारली.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने संजू सॅमसनच्या तुफानी खेळीने ७ बाद २१६ धावा केल्या. संजूने ३२चेंडूंत १ चौकार आणि ९ षटकारांसह ७४ धावांची खेळी केली. कर्णधार स्टिव्ह स्मिथने ६९ धावांचे योगदान दिले. जोफ्रा आर्चरने एन्गिडीच्या शेवटच्या षटकांत ३० धावा कुटल्या. या षटकातील धावाच चेन्नईच्या पराभवाला कारणीभूत ठरला.वीसावे षटक नऊ चेंडूच होत. पहिल्या दोन चेंडूत तीन षटकारासह २७ धावा खेचल्या. चेन्नई चा डाव ६ बाद २०० असा मर्यादित राहिला. डु प्लेसीच्या सलग दुस-या अर्धशतकाने त्यांच्या आव्हानात रंग भरले मात्र, त्याच्या फटकेबाजीला सुरवात होऊन ती रंगात येईपर्यंत उशीर झाला . डु प्लेसीने ३७ चेंडूत १ चौकार ७ षटकारांसह ७२ धावा केल्या.

ऋतूराज गायकवाडला पदार्पणाची संधी मात्र साधता आली नाही आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला मुरली विजय आणि शेन वॉटसन यांनी वेगवान सुरवात करून दिली. पण, धावांचा वेग त्यांना राखता आला नव्हता. त्यामुळे दोनशेहून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांच्यावरील दडपण वाढतच गेले.टिवाटियाच्या हाती चेंडू सोपविण्याचा स्मिथचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. त्याने पहिल्याच षटकात शेन वॉटसनकडून षटकाराचा प्रसाद मिळाल्यानंतरही डगमगून न जाता त्याला चकवले. त्यानंतर चेन्नईसाठी निर्णायक फटकेबाजी करणारा सॅम करनला बढती मिळाली. त्याने देखील षटकार चौकार ठोकत आपली बॅट पुन्हा परजायला सुरवात केली मात्र, पुन्हा एकदा टिवाटियानेच राजस्थानला आवश्यक ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्याने सॅमला पुढे येण्यास भाग पाडले आणि यष्टिमागे संजू सॅमसनने आपले काम चोख केले.

पुढच्याच चेंडूवर पदार्पण करणारा गायकवाडही यष्टिचीत झाला. केदार जाधवने धुकधूक दाखवली पण, टॉम करनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक सॅमसनने त्याला सुरेख टिपले. त्यानंतर धोनी आणि डुप्लेसी ही अनुभवी जोडी छान टिकली. त्यांनी ३१ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. डु प्लेसीने षटकारांची पराकाष्ठा केली. पण, अखेरच्या षटकांत ३८ धावांचे आव्हान कुणालाही अशक्य होते. धोनीने या षटकांत तीन षटकार ठोकून दुरून दर्शन घेणा-या दर्शकांचे मनोरंजन केले प्रथम फलंदाजीची मिळालेली संधी राजस्थानने अचूक उचलली. यशस्वी जैस्वाल लवकर बाद झाल्यावर फारसा फरक पडला नाही. कारकिर्दीत प्रथमच सलामीला आलेला स्टिव स्मिथ आणि संजू सॅमसन यांची जोडी अशी काही जमली की शारजाच्या मैदानावर चौकार, षटकारांचा पाऊस पडू लागला.

दुर्दैव इतकेच ही फटकेबाजी पाहण्यास मैदानावर प्रेक्षक उपस्थित नव्हते. स्मिथ आणि सॅमसन जोडीत सॅमसनने फटकेबाजीला सुरवात केली व षटकारामागून षटकार ठोकत त्याने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करत फास्टेस्ट फिफ्टीची बरोबरी केली. कर्णधार स्मिथ त्याला अचूक साथ देत होता. एन्गिडीने दुस-या हप्त्यात गोलंदाजीला आल्यावर त्याने सॅमसनची फटकेबाजी रोखली. सॅमसन आणि स्मिथ जोडीने ९.२ षटकांत १२१ धावांची भागीदारी केली. ही जोडी खेळत असताना राजस्थानचा धावफलक नुसता पळत होता. सॅमसन बाद झाल्यावर मात्र हा वेग मंदावला.

डेव्हिड मिलर, रॉबिन उत्थप्पा, राहुल टिवाटिया, रायन पराग असे फलंदाज एकामागून एक बाद होत राहिले. यात दुस-या बाजूने स्मिथ टिकून राहिला ही राजस्थानसाठी जमेची बाजू ठरली. त्याने राजस्थानच्या डावाचा वेग कायम राखला . मात्र, तो देखिल बाद झाला. तेव्हा राजस्थानच्या ७ बाद १७८ धावा होत्या. एन्गिडीने टाकलेले २० वे षटक आधीच्या सर्व षटकारांवर कडी करणारे ठरले. या षटकांत जोफ्रा आर्चरने चार षटकारांसह ३० धावा कुटल्या. सहाजिकच राजस्थानचे आव्हान यामुळे अधिक भक्कम झाले.

मैदानाबाहेरून…..
डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या