22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeविशेषअंतर्प्रेरणेचा विसर

अंतर्प्रेरणेचा विसर

कोरोनाच्या बाबतीत अनेक बदलते वाद- प्रवाद शेवटी मानवाचे हित साधण्याऐवजी व्यवस्थेचे बळी या सदरात मोजता येतील. शेवटी प्रत्येक जिवाला आपापली काळजी घेण्याचे एक इनबिल्ट सयंत्र असते. प्राणी त्याचा वापर करत आपला जीव वाचवू शकत असले तरी मानव या सा-या अंतर्प्रेरणा विसरल्याने त्याला अशा बाहेरी यंत्रणांना बळी पडावे लागते आहे. तापावर अँटिबायोटिक्सचा मारा हा प्रतिकारशक्तीचा -हास करणारा ठरू शकतो. होमिओपॅथीत कुठलेही अँटिबॉयोटिक नसताना सारे प्रादुर्भाव ट्रिट केले जातात. अशा पर्यायी प्रयत्नांना सामूहिक प्रयत्नात का सहभागी केले जात नाही हा शासन पद्धतीच्या कार्यपध्दतीचा एक भाग आहे. या आजाराचा प्रोटोकॉल आपणच ठरवायचा व त्यातील गुपिते बाहेर न येऊ देण्याचा सरकारांचा प्रयत्न असतो.

एकमत ऑनलाईन

असे म्हणतात की, एकूण वैश्विक ज्ञानाच्या केवळ दोन ते तीन टक्के ज्ञान मानवाला ज्ञात असावे. त्या ज्ञानाच्या आधारावर एवढ्या आत्मविश्वासाने उड्या मारणे चालू आहे. कुणीतरी आज मांडलेला सिद्धांत उद्यापर्यंत टिकेलच असे नाही. आणि अशा मांडणीमागे काही ठराविक उद्देश असला तर तो त्वरितच उघडा पडावा अशी निसर्गाची योजना असते. एकूण वैद्यकीय ज्ञानाच्या किती टक्के आपल्याला माहिती आहे हे माहीत नसताना तुटपुंज्या ज्ञानाच्या आधारावर सा-या मानवजातीचेच भवितव्य ठरवणे हे या प्रजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.

मानवी वंशाला वाचवण्याचे सारे प्रामाणिक प्रयत्न मानवतेच्या दृष्टिकोनातून क्षम्य ठरत असले तरी छुपे भौतिक लाभ हेच ध्येय असणा-या बाजार व शासन नामक व्यवस्थेचे प्रयत्न व ते राबवणारी पोटार्थी पगारी व्यवस्था व एकूणच यातील छुपे लाभार्थी यांचे खरे उद्देश लक्षात घेणे महत्त्वाचे असते. त्यात साखरपेरणी, सक्ती, बंधने, कोंडी, कायदा, नियम व अगतिकता आली की ती तपासण्याची गरज ठरते.

आजच्या परिणामांना भूतकाळातील काही असे कारण दिसते का याचा विचार व्हायला हवा. कारण मानवच नव्हे तर मानवी सानिध्यातील अनेक पाळीव प्राणी एका समान अशा परिस्थितीला सामोरे जात आहेत. आपल्यापैकी काहींच्या पंचेंद्रियांना जाणवलेल्या निरीक्षणातून एक मोठी मांडणी यातून उदयास आलेली दिसते. ती शास्त्र व विज्ञानाच्या स्वरूपात आणली की तिला विरोधही कठीण होऊन बसतो. या मांडणीला मानवी स्वार्थ व अर्थवादाची साथ मिळाली की तिला सर्वमान्यताही मिळू शकते. एकदा या पातळीला सारे पोहोचले की, आम्ही म्हणतो तेच अंतिम सत्य असा हट्ट धरत अनेक पर्यायी शक्यतांना बाजूला सारत हा हटवाद बळावू शकतो.

कोरोनाच्या बाबतीत अनेक बदलते वाद-प्रवाद शेवटी मानवाचे हित साधण्याऐवजी व्यवस्थेचे बळी या सदरात मोजता येतील. शेवटी प्रत्येक जिवाला आपापली काळजी घेण्याचे एक इनबिल्ट सयंत्र असते. प्राणी त्याचा वापर करत आपला जीव वाचवू शकत असले तरी मानव या सा-या अंतर्प्रेरणा विसरल्याने त्याला अशा बाहेरी यंत्रणांना बळी पडावे लागते आहे. प्राण्यांना बरे वाटेनासे झाले की ते प्रथम अन्नत्याग करतात. पोटात काही नकोसे झाले तर मांसाहारी प्राणीही गवत खाऊन उलटी करून मोकळे होतात. हे शिकायला त्यांना कुठल्या विद्यापीठात जावे लागत नाही तर तो केवळ त्यांच्या अंतर्प्रेरणांचा आदर करण्याची प्रवृत्ती असते. आदिवासी जीवनशैलीही अशा अंतर्प्रेरणांवर आधारलेली असल्याने त्यांनाही आधुनिक आजारांची ओळख न झाल्याचे दिसते.

कोरोना वा त्यासदृश विषाणूंचा प्रवेश हा मुख्यत्वे नाकाद्वारे होत असल्याने पहिली प्रतिक्रिया तेथे शिंकांच्या स्वरूपात येत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो. ही यंत्रणा नाकात सक्रिय असते कारण विषाणूच नव्हे तर काही गंध वा वास, वा धुळीचे कणही शरीरात जाण्यापासून रोखले जातात. नंतर येणारा घशातील चिकट कफ, खोकला वा ताप ही सारी यंत्रणा विषाणूंच्या प्रतिकाराची आयुधे आहेत व त्यांना अटकाव करणे म्हणजे विषाणूंना पायघड्या टाकण्यासारखे असते.
ताप हे रोगाचे लक्षण नसून आपल्या प्रतिकाराचा प्रयत्न असतो व आपल्या हिताचा असतो. तापावर अँटिबायोटिक्सचा मारा हा प्रतिकारशक्तीचा -हास करणारा ठरू शकतो. मुळात अँटि म्हणजे विरोधी व बॉयॉस म्हणजे जीवन, म्हणजे जीवनाच्या विरोधी ते अँटिबायोटिक असे समजायला हरकत नाही.

होमिओपॅथीत कुठलेही अँटिबॉयोटिक नसताना सारे प्रादुर्भाव ट्रिट केले जातात. म्हणजे ते अनिवार्य नाहीत. हल्ला झाल्यानंंतर पहिले पथ्य म्हणजे अन्नत्याग. अन्नपचनात खर्च होणारी सारी ऊर्जा ही शरीराला पुढच्या लढ्यासाठी आवश्यक ठरते. आजारी पडल्यावर भूक न लागणे वा चव जाणे ही त्याचीच लक्षणे असतात. हे सारे होईपर्यंत तुमची प्रतिकारशक्ती कार्यान्वित झालेली असते व कोरोनात ८० टक्के रुग्ण अशा मार्गाने काही एक न करता बरे झालेले असतात. तापात उपाशी रहात केवळ पाणी व नैसर्गिक प्राणिज ऊर्जा असलेले फळांचे रस हे शरीरीतील आम्लता नाहीशी करत विषाणूंना निष्प्रभ करतात. चांगला घाम येणे हे त्याचे एक लक्षण.

ऑक्सीमिटर हे काही दिवसांपासून वापरात आले आहे. प्राणवायूचे प्रमाण श्वसन संस्थेच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. होमिओपॅथीतील कार्बो व्हेज हे औषध बाहेरील प्राणवायूची गरज कमी करत श्वसनसंस्थेला उद्दीपित करू शकते. जोडीला इतर इन्फेक्शन असले तर पल्सेटिला देता येईल. ब्रायोनिया देऊन कफ बाहेर टाकला जातो. आयुर्वेदात अशा अनेक संकल्पनांवर आधारलेल्या उपाययोजना सुचवल्या जातात.

केवळ औषध घेणे वा देणे यालाच उपचार समजत, ज्यात केवळ आर्थिक उलाढाल असल्यानेच त्यांचा आग्रह धरला जातो. अशा या पर्यायी प्रयत्नांना सामूहिक प्रयत्नात का सहभागी केले जात नाही हा शासन पद्धतीच्या कार्यपध्दतीचा एक भाग आहे. या आजाराचा प्रोटोकॉल आपणच ठरवायचा वा ठरवून घ्यायचा व त्यातील गुपिते बाहेर न येऊ देण्याचा सरकारांचा प्रयत्न असतो. आज या सा-या व्यवस्था कोसळल्याने त्यामुळे कोरोनाचे उपचार सोपे असूनही कठीण होत गेल्याचे दिसते व त्यामुळे होणारे वाढते मृत्यू कोरोनाच्या नावावर टाकत परत कोरोनाचीच भीती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे.

डॉ. गिरधर पाटील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या