22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषआर्थिक आघाडीवर महिलांना स्वातंत्र्य

आर्थिक आघाडीवर महिलांना स्वातंत्र्य

एकमत ऑनलाईन

भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असून, हळूहळू त्याचे नेतृत्व महिलांच्या हाती आले आहे. सरकार राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पांतर्गत महिला शेतक-यांना शेतीच्या आधुनिक पद्धती शिकविल्या जात आहेत. येथे स्वायत्तता म्हणजे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता होय. ग्रामीण महिला उद्योजकांमधील उच्च स्वायत्तता त्यांच्या आवडीचा व्यवसाय निवडण्याची त्यांची क्षमता दर्शविते.

आत्मनिर्भर भारताची कल्पना हे प्राचीन संस्कृती आणि संस्कारांचे असे प्रकटीकरण होते, ज्यामुळे भारत संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेचा चालक आणि नियंत्रक बनला होता. वेगवेगळ्या कालखंडात अनेक आक्रमकांच्या विचारधारांनी स्वावलंबी भारताच्या भावनेला धूसर केले होते; परंतु अथक प्रयत्नांनंतरही ते ही भावना नष्ट मात्र करू शकले नाहीत. स्वावलंबनाचा खरा अर्थ आहे भावनाविरहित अवलंबित्व. हे स्पष्टपणे असे स्वरूप आहे, जिथे आपला आंतरिक आनंद बा यशावर अवलंबून नाही. आज ग्रामीण महिलांमधील उद्योजकता त्यांची आर्थिक ताकद तर वाढवीत आहेच, शिवाय त्यांचे व्यक्तिमत्त्व सक्षम बनवीत आहे. जर हे प्रयत्न अधिक तीव्र झाले तर २०३० पर्यंत ३१५ दशलक्ष महिलांच्या मालकचे उद्योग अस्तित्वात येऊ शकतात. देशात मोठ्या संख्येने महिलांनी उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला तर या कालावधीत सुमारे १५ ते १७ कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात. जर अधिक महिला श्रमशक्तचा हिस्सा बनल्या तर २०२५ पर्यंत भारताचा जीडीपी ०.७ लाख कोटींनी वाढेल. मुद्रा योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अशा अनेक योजनांची महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात महत्त्वाची भूमिका आहे. किंबहुना, संधींची उपलब्धता आणि सहभाग महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रचंड शक्यता निर्माण करतो.

महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा महिलांना राष्ट्र आणि स्वावलंबी भारताच्या विकासाच्या उद्दिष्टांशी जोडणारा सर्वांत व्यावहारिक उपाय आहे. ग्रामीण भागात राहणा-या महिलांनी पर्यावरणविषयक चिंता, सामाजिक-आर्थिक प्रगती आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून त्यांच्या समुदायामध्ये स्वत:ची विश्वासार्हता आणि नेतृत्व क्षमता प्रस्थापित केली आहे. या अशा महिला आहेत ज्यांनी केवळ पैसे कमावण्यातच आपला वाटा उचलला नाही, तर भविष्यातील अशा संस्था निर्माण करणा-या शक्तींचे स्वरूपही बदलले आहे. कृषी, दुग्ध उद्योग, पशुपालन, मत्स्यपालन आणि कुटीर उद्योग यांसह अनेक आर्थिक घडामोडींच्या माध्यमातून महिला भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बचत, उपभोगवृत्ती आणि पुनर्वापर प्रवृत्ती या बाबतीत भारताची अर्थव्यवस्था महिलाकेंद्रित आहे, यात शंकाच नाही. जमीन तयार करण्यापासून विपणनापर्यंत शेतीशी संबंधित सर्व कामांमध्ये महिला गुंतलेल्या आहेत. पशुधन हा उपजीविकेचा प्राथमिक मार्ग तर आहेच, शिवाय त्याचा उपयोग घरगुती अन्नाच्या गरजा भागविण्यासाठी केला जातो.

मत्स्यपालनात प्रक्रिया महिला करतात. आपल्यासंबंधीची सर्व मिथके खोटी ठरवून आपले नवीन अस्तित्व निर्माण करणा-या या महिला आहेत. त्याचबरोबर स्थानिककरण आणि विकेंद्रीकरणाला बळकटी देताना औद्योगिककरणातूनच अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते, या विचारातून निर्माण होणारा समजही चुकचा असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. आज आत्मनिर्भर भारताचे स्वप्न अशा खेड्यांमध्ये प्रतिबिंबित होते, ज्या गावांचे नाव तेथील महिलांच्या नावावरून ओळखले जाते. त्या केवळ स्वत:लाच सशक्त करत नाहीत तर त्यांचा समजही त्या मजबूत करीत आहेत. कृषी मित्र, आजिविका पशुमित्र, व्हीसी सखी अशा उपमांनी सजलेल्या स्त्रिया स्वायत्ततेचा खरा अर्थ उलगडण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित असून, हळूहळू त्याचे नेतृत्व महिलांच्या हाती आले आहे. सरकार राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण प्रकल्प राबवीत आहे. या प्रकल्पांतर्गत महिला शेतक-यांना शेतीच्या आधुनिक पद्धती शिकविल्या जात आहेत. येथे स्वायत्तता म्हणजे कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता होय. ग्रामीण महिला उद्योजकांमधील उच्च स्वायत्तता त्यांच्या आवडीचा व्यवसाय निवडण्याची त्यांची क्षमता दर्शविते. दुसरीकडे, महिला उद्योजकांचा वैयक्तिक विकास त्यांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करतो. ग्रामीण महिलांच्या उत्थानामध्ये स्थानिक समुदाय आणि संपूर्ण राष्ट्राचा कायापालट करण्याची क्षमता आहे.

उत्तर प्रदेशातील महिलांनी मिशन शक्त अंतर्गत गायीच्या शेणापासून दिवे आणि गणेश-लक्ष्मीच्या मूर्ती बनवून स्वत:साठी स्वावलंबनाचा नवा मार्ग मोकळा केला आहे. त्याचा त्यांना खूप फायदा झाला आहे. एकंदरीत, स्वावलंबी भारताची भव्य दृष्टी अशा मध्यवर्ती भावनेवर आणि विचारसरणीवर आधारित आहे, जिथे माती, झाडे, तलाव, नद्या, पर्वत हे सर्व आपल्या अर्थव्यवस्थेचे बीजमंत्र बनले आहेत. महिला स्वायत्तता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुदृढीकरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असण्याबरोबरच महिलांच्या सुख-समाधानाचेही एक प्रमुख कारण आहे. हा अशा गोष्टींसाठी एक पर्याय आहे, ज्या व्यक्त स्वत:च्या समाधानासाठी निवडते आणि कोणत्याही सामाजिक आणि कौटुंबिक दबावाशिवाय अनुकूल वातावरणात काम करते. देशाच्या ग्रामीण भागातील महिला उद्योजकांमधील आनंदाचे मूल्यांकन करण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच एक अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष असे दर्शवितात क, स्वयत्तता, वैयक्तिक विकास, आत्मस्वीकृती, जीवनातील उद्देश, सत्यता, योग्यता आणि प्रभुत्व हे आनंदाची पातळी वाढविणारे घटक आहेत. महिलांच्या स्वायत्ततेसाठी केंद्र सरकारचे अथक प्रयत्न हे केवळ स्वावलंबी भारताचा पायाच नव्हे तर समृद्ध भारताचा भक्कम आधारस्तंभ ठरतील, असे म्हटले तरी पुरेसे आहे.

-डॉ. ऋतु सारस्वत
समाजशास्र अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या