21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeविशेषपरंपरा जतन करणारा लातूरचा गणेशोत्सव

परंपरा जतन करणारा लातूरचा गणेशोत्सव

एकमत ऑनलाईन

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीार्यंत ‘श्री’ गणरायाची मुर्ती स्थापन करुन जनजागृती, लोकप्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता, धार्मिक व सांस्कृतिक दृष्टी समोर ठेवून विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. प्रत्येक विधायक कार्याचा शुभारंभ ‘श्री’ ची पुजा व आराधाना करुन करण्याची भारतीय संस्कृतीची उज्ज्वल परंपरा आहे.

लोकमान्य टिळक यांनी इ. स. १८९३ मध्ये गणपतीच्या आराधनेला सार्वजनिक स्वरुप दिले आणि जनशक्ती संघटीत करुन जनजागृतीच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यास योग्य दिशा दिली. तो उत्सव आज आपण भक्तिभावाने साजरा करीत आहोत. यंदाचे गणेशोत्सव मात्र नेहमीपेक्षा जरा वेगळे असणार आहे. कोरोनच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करताना केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालण करावे लागणार आहे.

लातूरची गणेशोत्सवाची परंपरा पाहिली तर आजपर्यंत लातूरच्या सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाच्या विविध सूचनांचे पालन करुन उत्सव साजरा केला त्यामुळेच लातूच्या गणेशोत्सवाला सामाजिक स्वरुप प्राप्त झालेले आहे. ऐतिहासीक उज्ज्वल परंपरा असलेल्या लातूर नगरीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे सार्वजनिक गणेश मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनूसार तयारी केलेली आहे.

गणेशोत्सवात कोणकोणत्या विषयांवर जनजागृती करणे शासनाला अपेक्षीत आहे ते विषय घेवून गणेशभक्त तयारीत गुंतले आहेत. खुप वर्षांपासून लातूर शहरातील केशवराज मंदीरात गणपतीची स्थापना केली जात आहे. शहरातीलच आझाद चौकातील भारत, रत्नदीप व आझाद या तीन गणेश मंडळाच्या तरुणांनी हे तिन्ही मंडळे एकत्र करुन सन १९६१ मध्ये भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळाची स्थापना केली गणेशोत्सवाल सार्वजनिक स्वरुप देण्यात या मंडळाचे महत्वाचे योगदान असल्यामुळेच या मंडळाच्या गणपतीला प्रथम मानाचा ‘आजोबा गणपती’ म्हणून मान मिळालेला आहे.

विसर्जनाच्या मिरवणुकीत हा आजोबा गणपती अग्रभागी असतो. ही प्रथा आहे. औसा हनुमान सांस्कृतिक गणेश मंडळाची ही मोठी परंपरा राहिलेली आहे. विसर्जन मिरवुणकीतील सर्वात शेवटचा गणपती म्हणून या मंडळाच्या गणपतीस मान आहे. या शिवाय अमर गणेश मंडळ, विपूल गणेश मंडळ, लातूरचा राजा, लातूरचा महाराजा, ओमनंदी गणेश मंडळ, नटराज गणेश मंडळ, बाप्पा गणेश मंडळ, अमरदीप गणेश् मंडळ, उत्सव गणेश मंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गणेश मंडळ, प्रभात गणेश मंडळ, सम्राट अशोक गणेश मंडळ, सिंहगढ गणेश मंडळ, जय हिंद गणेश मंडळ, क्रांती गणेश मंडळ यासह असंख्य गणेश मंडळांनी लातूरची उत्सवी उज्ज्वल परंपरा जतन केली आहे. याहीवर्षी गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा प्रथम प्राधान्य असेलच.

मुंबईतील हत्याकांड : ९ तरुणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या