फारच मोजक्या व्यक्ति असतात की त्यांनी आपल्या क्षेत्रातून कधीही निवृत्त होवू नये अस वाटत असतं, कारण त्यांची सकारात्मक ऊर्जा, अनुभव, लढाऊ वृत्ती, प्रसंगी सर्वांना सामावून पुढे नेण्याची जिद्द असते अशांपैकी एक क्रीडा क्षेत्रातील विशेषत: क्रिकेट जगतातील लहान थोरांचा लाडका माही. अखेर त्यानेच स्वातंत्र्यदिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील निवृती जाहीर करून आपल्या तमाम हितचिंतकांना एक धक्का दिला.
माही म्हणजे देशाचा गौरव, अभिमान, आमच्याकडे धोनी आहे हा गर्व अस म्हटल्यास वावगे होणार नाही. भारतीय संघाचा यशस्वी कप्तान, कुशल नेतृत्व, कुशल डावपेच, गनिमी कावा, शांत डोक्याने प्रत्येकवेळी घेतलेले अचूक निर्णय, सवंगड्यांना दिलेले प्रसंगी योग्य सल्ले, मार्गदर्शन यामुळेच भारतीय संघाचा यशस्वी कप्तान म्हणून ते ओळखले जातात. विजेच्या वेगाने केलेलं स्टॅम्पिग, गगनभेदी फटके आणि शतके, नैसर्गिक खेळी, विशिष्ट शैली, निपुणता, सकारात्मक मानसिकता, सवंगड्यांना सकारात्मक ऊर्जा देणार व्यक्तिमत्व अस हे भारतीय संघाला लाभलेले रत्न होय.
यापुढे धोनी यांचा झुंजार खेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून पाहता येणार नाही ही खंत आहेच परंतु त्यांचे क्रिकेटप्रती योगदान, मिळविलेले विजय, गगनभेदी फटके, अष्टपैलुत्व यांचा क्रिकेट रसिकाना कधीही विसर पडणार नाही.
-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे
१०० खाटांच्या उपलब्धतेसाठी आराखडा सादर करावा