Sunday, September 24, 2023

घणी गई थोड़ी रही, या में पल पल जाय। एक पलक के कारणे, युं ना कलंक लगाय।।

लातूर : एक राजाला राज्य करीत बरेच वर्षे झाली होती़ एका दिवशी त्याने आपल्या दरबारात उत्सव ठेवला आणि आपल्या सर्व स्नेही, मित्रांना आमंत्रित केले़ त्यासोबतच आपल्या गुरुलाही बोलावले़ उत्सवाला अधिक चांगले करण्यासाठी त्याने राज्यातली प्रसिद्ध नृत्यंगणा ही बोलावली़ राजाने काही सुवर्ण मुद्रा आपल्या गुरुलाही दिल्या़ यासाठी की, नृत्यंगणाने उत्तम नृत्याचे सादरीकरण केले तर गुरुनीही नृत्यांगणेला बक्षीस द्यावे म्हणून रात्रभर नृत्य सुरू राहिले़ पहाटेची वेळ आली़ नृत्यांगणाने पाहिले की, तिचा तबला वादक ढुकल्या घेत आहे़ अशा परिस्थितीत तबला वादकाला सावध करणे गरजेचे होते, नाही तर राजा दंडात्मक शिक्षा करु शकला असता़ तेव्हा तबला वादकाला जोग करण्यासाठी नृत्यांगणाने एक दोहा वाचला.

‘घणी गई थोड़ी रही, या में पल पल जाय।’
‘एक पलक के कारणे, युं ना कलंक लगाय।’

आता या दोह्याचा सर्वांनी आपापल्यापरीने वेगवेगळा अर्थ काढला़ तबला वादक सतर्क होऊन तबला वाजवू लागला़ जेव्हा हा दोहा गुरुजींनी ऐकला तेव्हा त्यांनी सर्व सुवर्ण मुद्रा नृत्यांगणेस अर्पण करुन टाकले़ दोहा ऐकताच राजकुमारीने स्वत:चा नौलखा हार नृत्यांगनेस भेट दिला़ दोहा ऐकताच राजाच्या युवराजानेही आपला मुकूट उतरवून नृत्यांगणेस समर्पित केला़ राजा आश्चर्य चकीत झाला. विचार करुन लागला रात्रभर नृत्य सुरू आहे परंतु, हे काय? अचानक एका दोह्याने सर्वांनी आपल्य मौल्यवान वस्तू अत्यंत आनंदी होत नृत्यांगणेस समर्पित करीत आहेत.

राजा सिंहासनावरुन उठला आणि नृत्यांगणेस म्हणाला, एक सामान्य नृत्यांगणा असलाताना एका दोह्याद्वारे सर्वांना लुटले़ हे ऐकुन गुरुंच्या डोळ्यात आश्रु आले़ गुरू म्हणाले, तिला सामान्य नृत्यांगणा म्हणु नका, आता ती माझी गुरू बनली आहे़ कारण या दोह्याने माझे डोळे उघडले़ दोह्याच्या माध्यमातून तिने हे सांगीतले की, मी आयुष्यभर जंगलात भक्ती करीत राहीलो आणि शेवटच्या काळात नृत्यांगणेचा मुजरा पाहूण आपली साधना नष्ट करायला आलो़ नको रे बाबा मी तर चाललो, असे म्हणत गुरुजी जंगलाकडे निघून गेले.

राजकुमारी म्हणाली, पिताजी तुम्ही माझा विवाह करीत नसल्यामुळे मी आज रात्री महावता सोबत पळून जाऊन आपले आयुष्य संपणार होते, परंतू या नृत्यांगणेने मला दोह्यातून सुमती दिली की, घाई नको, तुझा विवाह उद्या होऊ शकतो़ आपल्य पिताजीला कलंकीत करू नको़ युवराज म्हणाला, महाराज आपण वृद्ध आहात तरीही मला राज्य देत नाहीत त्यामुळे आज रात्रीच मी सैनिकांनासोबत घेवून आपणास संपवणार होतो. परंतु, या दोह्याने शिकवण दिली की, आज नाही तर उद्या राज्य तर तुलाच मिळणार आहे़ का आपल्या वडिलाच्या हत्येचा कलंक लावून घेतोस जेव्हा राजाने या सर्व गोष्टी ऐकल्या तेव्हा राजा आत्मभान आले. त्याने तात्काळ युवराजला राज्य देऊन टाकले.

राजकुमारीचा विवाह केला आणि राजा सर्व सोडून जंगलात गुरुजींच्या शरणात गेला नृत्यांगणानेही वैराग्य स्विकारले़ एक नाही दोन नाही चार लॉकडाऊनही निघून गेले. आता आणखी थोडी कळ सोसावी लागणार आहे़ आज आपण सर्वांनी या दोह्याला कोरोनाशी जोडून समिक्षा करुन पाहिली तर मागच्या २२ मार्चपासून संयम बाळगला आहे. त्रास सहन केला आहे़
अडचणींत सापडलो आहे, परंतु, असे होऊ नये की, अंतिम क्षणी एक लहानशी चुक, आमच्या बेफिकीरीने आमच्यासोबत सर्व समाज, गाव, शहर आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे़ घरीच राहा, सुरक्षीत राहा.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या