22.1 C
Latur
Monday, October 26, 2020
Home विशेष घराच्या गच्चीवरच पिकवा आरोग्यदायी भाजीपाला

घराच्या गच्चीवरच पिकवा आरोग्यदायी भाजीपाला

एकमत ऑनलाईन

आपल्या रोजच्या आहारात भाजीपाल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रतिदिन प्रतिव्यक्ती २५०-३०० गॅ्रम भाजीपाला आहारात घेणे गरजेचा असतो आणि याकरिता आपण दैनंदीन गरजेकारिता भाजीबाजारातून भाजी खरेदी करतो. खरेदी केलेला भाजीपाला पिकविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला जातो. अशापद्धतीने उत्पादित केलेला भाजीपाला रोजच्या आहारात उपयोगात आणला तर निश्चितच आरोग्यावर दुरगामी परिणाम होणारच. हे टाळून स्वत:ला व आपल्या कुटुंबाला निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने स्वत:च्या गच्चीवर विषमुक्त भाजीपाला उत्पादित करणे गरजेचे आहे जेणेकरून कुटुंबासाठी ताजी, सकस आणि विषमुक्त भाजी मिळणार यात शंकाच नाही.

रंगीबेरंगी सुगंधी फुले टवटवितपणा आणतात. तेथे फुललेली औषधी वनस्पती, भाजीपाला, फळे चैतन्य आणि उत्साह जागवतात म्हणूनच प्रत्येकाने आपल्या गच्चीवर बाग फुलवायचीच आहे. गच्चीवर भाजीपाला दोन प्रकारे उत्पादित होवू शकतो. एक प्रत्यक्ष माती पसरून त्यावर झाडे वाढविणे किंवा लहान मोठ्या कुंड्यांचा वापर करत भाज्यांची लागवड करता येते.

प्रत्यक्ष माती पसरून / वाफे करून भाजीपाला लागवड
पालेभाज्यांची लागवड करावयाची असल्यास त्यास चार ते सहा इंच खोलीची माती पुरेशी होते. पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू अशा पालेभाज्यांची लागवड करताना बियाणांची लागवड करावी. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की ती कापून घ्यावीत. लागवड केल्यापासून एक ते सव्वा महिन्यांनी पालेभाजी काढणीस तयार होते. खोडे तसेच जमिनीत ठेवावीत पुन्हा वीस ते पंचवीस दिवसात त्यास नवीन फुटवा येतो व आपल्याला भाजी मिळते. टोमाटो, वांगी, मिरची, गवार, भेंडी यासारख्या फळभाजीसाठी १२ ते १६ इंच खोलीची मातीच्या वाफ्याची गरज असते.

नर्सरीत फळभाज्यांची तयार रोपे मिळतात किंवा गादीवाफ्यावर रोपे तयार करून घ्यावीत. गवार व भेंडीचे रोप तयार करायची गरज नसते. रोपांची लागवड साधारणत: सायंकाळी करावी. म्हणजे रात्रभर ती मूळ धरतात. विविध वेलवर्गीय भाज्या जसे काकडी, दोडके, पडवळ, कारली,तोंडली, चवळी या वाफा पद्धतीत छान बहरतात. वेलांच्या वाढीचे, त्याला लागणा-या फळांचा एक नैसर्गिक तंत्र आहे. वेल हा मातीच्या पृष्ठभागात ६ ते १० इंच खोलीपर्यंत लावलेला चालतो. पण वाफा हा लांब असावा कारण वेलाच्या मुळ्या जितक्या लांब पसरतील तितक्याच तो वेल बहरतो. गाजर, बीट, मुळा, रताळी, बटाटे या कंदवर्गीय भाज्यांना ६ ते ८ इंच खोलीची माती लागते. शक्यतो कंदमुळांना जेवढा ऑक्सीजन घेता येईल तेवढे त्याची वाढ व वजन वेगाने वाढते. कंदमुळाना भरणपोषण हे भुसभुशीत असावे.

कुंड्यांचा वापर करून भाजीपाला लागवड
सर्वसामान्यपणे भाज्यांसाठी मध्यम ते मोठ्या आकाराच्या कुंड्या किंवा आयात आकाराची कुंडीची निवड करावी. शक्यतो मातीच्या कुंड्याना प्राधान्य द्यावे. कुंडीत रोप लावताना तळाशी छिद्र आवश्यक आहे. पाण्याच्या निच-यामुळे मुळ्या सडत नाहीत. पालेभाज्यांची लागवड आयात आकृती किंवा पसरट कुंड्यामध्ये करावी जेणेकरून पालेभाज्यांचे बियाणे ओळीत पेरता येते किंवा संपूर्ण कुंडीत पसरून पेरता येते. एकदा बियाणे अंकुरले व त्यांना पाने फुटली की, ती कापून घ्यावीत. खोडे तसीच जमिनीत ठेवावीत. पुन्हा वीस ते पंचेवीस दिवसात त्यास नवीन फुटावा येतो व आपल्याला भाजी मिळते. टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, गवार यासारख्या झुडूपवर्गीय भाज्यांसाठी १२ ते १६ इंच कुंडीची आवश्यकता असते व प्रत्येक कुंडीत योग्य अंतरावर दोन रोपे लावावीत.

पाणी व्यवस्थापन
झाडांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणि घातल्यास ते दगावण्याची शक्यता असते. पानांची, फुलांची वाढ आणि टवटवीतपणा व्यवस्थित राखण्यासाठी पाणी सकाळी किंवा सायंकाळी गरजेप्रमाणे द्यावे.

खत आणि किड व्यवस्थापन
शहरातील नागरिकांपुढे ओला कचरा घरच्या घरी कसा जिरवावा ही मोठी समस्या आहे ती सोडविण्यासाठी ओल्या कच-याचे कंपोस्ट खत तयार करून गच्चीवरील बागेसाठी वापरता येईल.

कंपोस्ट खत
कंपोस्ट पिट अथवा माठ, प्लास्टिक बकेट यामध्ये किचनमधील टाकावू सेंद्रिय पदार्थांचा वापर करून कंपोस्ट तयार करता येईल. माठ किंवा प्लास्टिक बकेट घेणार असाल टब त्याला सर्व बाजूने ३५ ते ४० छिद्र पाडून घ्यावे म्हणजे ऑक्सीजन खेळते राहील. यानंतर किचन मधील ओला कचरा व बागेतील सुका कचरा यांचे एका नंतर एक थर द्यावेत. याच्या विरजनासाठी वेस्ट डी कम्पोजर किंवा ताक टाकावे व झाकून ठेवून द्यावे. दिड ते तीन महिन्यामध्ये कंपोस्ट तयार होते. मृदगंधासारखा सुगंध म्हणजेच कंपोस्ट तयार झाले समजावे.

जीवामृत
डाळीचे पीठ : पाव किलो, देशी गुळ: पाव किलो, देशी गाईचे गोमूत्र : १ लिटर, गाईचे शेण: २ किलो, दोन किलो शेणामध्ये ५ लिटर पाणि मिक्स करावे. गुळ आणि डाळीचे पीठ टाकावे व नंतर गोमुत्र टाकून दिवसाकाठी सकाळी आणि संध्याकाळी अंटीक्लॉक दिशेने काठीने ढवळावे. हे मिश्रण तयार होण्यासाठी ४८ तासांचा अवधी लागतो. नवीन लावलेल्या झाडांसाठी १ लिटर जीवामृत + ५ लिटर पाणि यांचे मिश्रण करून प्रती झाड १०० ते २०० मिली टाकावे. मध्यम झाडांसाठी १ लिटर जीवामृत + ३ लिटर पाणी यांचे मिश्रण करून प्रती झाड ३०० ते ५०० मिली टाकावे. मोठ्या झाडांसाठी १ लिटर जीवामृत + १ लिटर पाणी यांचे मिश्रण करून प्रती झाड ५०० मिली टाकावे. याच्या वापरामुळे भाज्यांची सुदृढ वाढ होवून पाण्याची कमतरता भासणार नाही व ओलावा टिकून राहील. जीवामृत महिन्यातून एकदा वापरले तरी चालेल.

कडूलिंब पानाचा रस
कडूलिंबाची पाने दोन दिवस पाण्यात भिजत घालून ठेवावी. दोन दिवसांनी ते पाणी किडींचा प्रादुर्भाव झालेल्या झाडांवर स्प्रे करावा. दर आठ दिवसांनी हा प्रयोग केल्यास किडीवर नियंत्रण राहू शकते.

भाजीपाल्यावरील कीड
१.रस शोषणारी किड : मावा, तुडतुडे, लोकरी, मावा, पांढरी कीड, हिरवे तुडतुडे, मिलीबग, कोळी उपाय: कडूनिंब पानांचा रस, तंबाखू भिजवलेले पाणि, तिखट मिरची व लसून अर्क, दशपर्णी अर्क २.अळ्या: उपाय: हाताने वेचणे, दशपर्णी अर्क, तंबाखू पाणी ३. वाळवी गोगलगायी : उपाय : दशपर्णी अर्क, तंबाखू पाणी

-अंजली आ. गुंजाळ
शास्त्रज्ञ (गृहविज्ञान) मांजरा कृषि विज्ञान केंद्र, लातूर

ताज्या बातम्या

भाजपकडून आमदार खरेदीचा प्रयत्न

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील विधानसभेच्या २८ जागांवर येत्या ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल. परंतु,...

३०० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमध्ये सीमेवरून २५० ते ३०० दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सोमवार दि़ २६ ऑक्टोबर रोजी भारतीय सैन्याचे लेफ्टनंट जनरल...

सुटीच्या हंगामात देशांतर्गत मर्यादित विमान फे-या

मुंबई : देशात सध्या अनलॉक सुरु आहे. अशात कोरोना नष्ट होण्याची आशा संपूर्ण जगाला लागलेली आहे़ यामुळे देशातील पर्यटनाला सुरुवात होण्याची चिन्हे दिसून येत...

वायुप्रदूषण.. गंभीर समस्या

भारतात प्रदूषणाची स्थिती वरचेवर गंभीर बनत चालली आहे. वायुप्रदूषणामुळे भारतातील व्यक्तींचे सरासरी वय जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार ५.२ वर्षे तर राष्ट्रीय मानकानुसार २.३...

रौप्यमहोत्सवी…सदाबहार…

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या तुफान गाजलेल्या हिंदी चित्रपटाने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली. २० ऑक्टोबर १९९५ रोजी तो जगभरात प्रदर्शित झाला होता. संगीतमय...

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

शिंगाडा ही वेल जलचर (पाण्यात वाढणारी) असून ती उष्ण आणि समशितोष्ण हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढते. या वेलीचे मुळस्थान ज्यास्त तापमानात असलेल्या युराशिया (युरोप आणि...

आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

तुळजापूर : संबळाच्या कडकडाटात, आई राजा उदो उदोच्या गगनभेदी गजरात, कुंकवाची उधळण करत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे विजयादशमीचे सिमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यादिवशी...

११ कोविड केअर सेंटर तात्पुरते बंद

लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत चाललेली असून उपचाराने बरे होणा-या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९...

गहू, हरभरा व ज्वारीसाठी विमा योजना लागू

लातूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम सन २०२० मध्ये गहू, ज्वारी, हरभरा या पिकासाठी विमा योजना लातूर जिल्ह्यामध्ये अधिसूचित तालुक्यातील अधिसूचित महसूल...

स्व वेदनांना आवर घालत शेतक-यांचे आश्रू पुसण्याचा प्रयत्न

लातूर : आस्मानी संकटाने कवठा, किल्लारी, सास्तूर व परिसरातील तेरणा नदी काठच्या शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. निसर्गाने दिले आणि निसर्गानेच ओरबाडून नेले, अशी पस्थिती...

आणखीन बातम्या

रौप्यमहोत्सवी…सदाबहार…

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या तुफान गाजलेल्या हिंदी चित्रपटाने नुकतीच २५ वर्षे पूर्ण केली. २० ऑक्टोबर १९९५ रोजी तो जगभरात प्रदर्शित झाला होता. संगीतमय...

आयुर्वेदिक औषधी शिंगाडा

शिंगाडा ही वेल जलचर (पाण्यात वाढणारी) असून ती उष्ण आणि समशितोष्ण हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढते. या वेलीचे मुळस्थान ज्यास्त तापमानात असलेल्या युराशिया (युरोप आणि...

जुने निष्ठावंत व एक समृद्ध अडगळ !

गेली चाळीस वर्षे ज्या पक्षाच्या बांधणीसाठी खस्ता खाल्ल्या त्या पक्षात आपल्याला आता भवितव्य तर सोडाच, पण तोंडदेखला मानसन्मानही मिळणार नाही, याची खात्री पटल्यानंतर भाजपचे...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

गीतकार साहीर लुधियानवी

साहीर लुधियानवी... एक प्रसिद्ध कवी, सिनेसृष्टीमध्ये लोकप्रिय ठरलेले प्रसिद्ध शायर रसिकांना चांगले परिचित आहेत. त्यांची गाणी ऐकताना त्यांच्या उत्कृष्ट साहित्यकृतीचा आनंद, गोडवा आजही कायम...

त्येचीबी ह्योच विच्छा हाय का?

‘‘लई फराकत बसलाव मेडिकलमदी. दौखान्याचे हिरवे कापडं लेवल्यानं म्या वळकलोच न्हाई पैले. हिथं कसं काय बसलाव?’’ याच्यापैले कवाबी त्येनी मला आसं मेडिकलमदी बसल्यालं तेन...

तरीही महाराष्ट्र पुन्हा हिमतीने उभा राहील!

महाराष्ट्राला कोणाची दृष्ट लागली? महाराष्ट्र दहा महिने कोरोनाचे संकट झेलतो आहे. हे संकट देशव्यापी आहे, यातून बाहेर पडायला सगळ्या जगाला, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला...

चेन्नई एक्सप्रेस रुळावरून घसरली

तीनदा आयपीएलचे चे जेतेपद मिळवलेल्या सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा आज तेराव्या आयपीएलमधील खेळ शारजा मैदानावर जवळपास खल्लास झाला. आणि चेन्नई एक्स्प्रेस रुळावरून...

सीमोल्लंघन झाले; पुढे काय?

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक ओळीचा राजीनामा देत पक्षसदस्यत्वाचा त्याग केला आणि ब-याच महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर संपली....

मातृशक्तीच्या आर्थिक स्थैर्याचे काय?

शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. नऊ दिवस शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कूष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या नऊ रूपांत देवीची उपासना केली जाते. नऊ...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...