21.8 C
Latur
Wednesday, October 21, 2020
Home विशेष हद्द

हद्द

एकमत ऑनलाईन

‘गुन्हा आमच्या हद्दीत घडलेला नाही,’ हे वाक्य खास पोलिसांसाठी राखीव असण्याचे दिवस सरले. आता राजकीय पक्षांनीही हद्दी आखून घेतल्यात आणि गुन्हा घडला त्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचे ठरू लागलेय. विशेष म्हणजे, ज्याला कोणत्याच हद्दी नाहीत अशा इंटरनेटवरून एकमेकांवर शाब्दिक क्षेपणास्त्रं डागली जात असताना त्याच इंटरनेटवरून अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करण्याच्या धमक्या दिल्या जातायत. कंगना राणावतच्या ऑफिसवर कारवाई केल्यावर किंवा बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचे प्रस्थ वाढल्याची माहिती उघड होताच सगळ्यांनी महाराष्ट्र सरकारवर तुटून पडायचं.

हाथरसमध्ये बलात्कार पीडितेवर रात्रीच्या अंधारात अन्त्यसंस्कार उरकल्याचे लक्षात येते तेव्हा सर्वांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरायचे. त्याच वेळी काहीजणांनी राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्कार होत असल्याकडे लक्ष वेधून २०१९ ची आकडेवारी दाखवायची. मग कुणीतरी २०१६ पासूनची आकडेवारी तपासा म्हणायचे. तेवढ्यात झारखंडमध्ये बलात्काराची घटना घडते म्हणून सगळ्यांनी त्या दिशेने कॅमेरे वळवायचे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पोलिस शिखांच्या पगडीला हात लावतात म्हणून बंगाल सरकारला जाब विचारायचा. तेवढ्यात राजस्थानातून पुजा-याला जिवंत जाळल्याची बातमी येते म्हणून त्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे काढले जातायत यावर चर्चा करायची.

चर्चेला मात्र हद्द नाही. कारण चर्चा इंटरनेटवरून चालते. राजकीय नेते ट्विटरवर भांडतात आणि बाकीचे व्हॉट्सअ‍ॅप अन् फेसबुकवर! डिजिटल क्रांती झाली खरी; पण ती ‘स्वस्तात’ मिळाल्याने माणसाचा निगरगट्टपणा आणि बोथटपणाच वाढत चाललाय. २०१२ मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणातल्या आरोपींना साडेसात वर्षांनी फाशी झाली आणि हैदराबादमधल्या तरुणीवर अतिप्रसंग करून तिचा खून करणा-यांचा दोन दिवसांत एन्काऊंटर झाला. या दोन्ही परस्परविरोधी घटना डोळ्यांसमोर असूनसुद्धा उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये अशा घटना घडल्या, याचा अर्थ लावण्यात मात्र आपण सगळेजण कमी पडलो. कायद्याचा धाक नाही, दोषींना लवकर शिक्षा होत नाही, असे म्हणावे तर एन्काऊंटरची भीती का वाटत नाही, असा सवाल उभा राहतो.

तुळजाभवानी मंदिरात आई राजा उदो-उदोचा जयघोषात नवरात्र महोत्सव प्रारंभ

जुलै महिन्यात छत्तीसगडमध्ये उघड झालेल्या घटनेत १७ वर्षांच्या मुलाने पाच वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करून तिला विहिरीत ढकलून मारले होते आणि तिच्या सहा वर्षांच्या भावाचाही गळा आवळला होता. राजस्थानमधल्या ताज्या घटनेत पुजा-याला पेट्रोल ओतून पेटवले गेले. हे क्रौर्य कुठून येतं, याचा विचार न करता आपण हद्दींवरून भांडत राहिलो, तर ही आग आपल्या घरापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. ‘हैवानांच्या हद्दीतून माणसांच्या हद्दीत आलेल्या’ या घटना आहेत, एवढाच विचार आपण करायला हवा. हे क्रौर्य माणसांच्या हद्दीतून तडीपार करायला हवं. आपल्याकडे राजकारण हे सर्वाधिक बदनाम क्षेत्र मानण्याची प्रवृत्ती पूर्वीपासूनच होती.

आज मात्र कोणत्याही घटनेचा संबंध थेट राजकारणाशी जोडून लोक सोशल मीडियावर एकमेकांना शिव्याशाप द्यायला तयारच असतात. राजकारणाविषयीची ही ‘अतिरिक्त सजगता’ राजकारण्यांच्या पथ्यावर पडणारी आणि आपल्याला खड्ड्यात घालणारी आहे. ती थोडी कमी केल्यास आपण माणूस म्हणून आपली हद्द सोडून किती पुढे गेलो आहोत, याचे भयावह दर्शन आपल्याला घडेल. आपण या अवनतीची खरी कारणे शोधायला लागू… इस्कोट होण्याआधी!

-अपर्णा देवकर

ताज्या बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही...

आणखीन बातम्या

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

नवरात्र एक इव्हेंट मॅनेजमेंट

‘वसुधैव कुटुंबकम’ अशी आपल्या हिंदू संस्कृतीची ओळख... हीच उदात्त विचारसरणी आपल्या संस्कृतीचा पाया आहे. ‘स्वीकार्ह वृत्ती’ हा आपल्या समाजाचा खरा स्वभाव याचे जेवढे फायदे...

विविध विकारांवर गुणकारी ‘वासनवेल’

वासनवेल ही आरोही प्रकारची वनस्पती असून असून ती उष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात वाढलेली आढळते. या वनस्पतीचे मूळस्थान भारत, पाकिस्तान, व आफ्रिकेतील उष्ण प्रदेश असावा...

राजभवन, राजकारण व घटनात्मक मर्यादांचे सीमोल्लंघन!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेले खरमरीत पत्र व त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेले तेवढेच सणसणीत उत्तर यामुळे मागच्या आठवड्यात आणखी एका वादाचा...

घटनेचा विसर न पडो…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे उघडण्याबाबत लिहिलेल्या पत्रामुळे पुन्हा एकदा राज्यपाल हे पद चर्चेच्या केंद्रस्थानी...

सूचना चांगल्या; पण…

महिलांच्या विरोधात घडणा-या गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून केल्या जाणा-या अनिवार्य कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने विस्तृत मार्गदर्शक सूचना नुकत्याच दिल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू असणा-या या...

पाऊस असा का पडतोय?

जागतिक हवामान बदलांचा परिणाम मान्सूनवर होत असल्याचे मत अनेक अभ्यासकांनी-शास्त्रज्ञांनी मागील काळात मांडले होते. तथापि, त्यावेळी पावसात फार मोठ्या प्रमाणावर बदल दिसून न आल्याने...

नशिबाचे भोग

‘‘तुमी कवा जारी केलाव दौखाना?’’ म्हनीत पेशंट मदी आला आन् काय दुकुलालय त्ये न सांगनातेच धा मिन्टं आरडू आरडू बोलूलाला. सोताला ऐकू यैना गेल्यावरी...

वेबसिरीजमधील अश्लीलता

एका वेबसिरीजमध्ये आक्षेपार्ह आशय असल्याबद्दल पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात जुलैमध्ये त्या मालिकेला आव्हान देण्यात आले होते. यावर केंद्र सरकारने जे उत्तर न्यायालयात दिले ते अत्यंत...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...