22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeविशेषअर्ध्यावरती डाव मोडिला अधुरी एक कहाणी...

अर्ध्यावरती डाव मोडिला अधुरी एक कहाणी…

एकमत ऑनलाईन

‘‘म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून मला फायदा तर झालाच नाही, उलट तोटा झाला.’’ अशा स्वरूपाची तक्रार मला आर्थिक साक्षरतेच्या कार्यक्रमातील, प्रश्नोत्तराच्या तासात एका गुंतवणूकदाराने केली. वास्तविक पाहता बदलत्या काळात गुंतवणूकदारांच्या मनात गोंधळलेले विचार कायमस्वरूपी असतात. गुंतवणुकीच्या अनेक योजना याचे स्वरूप, पैसे परत करण्याची पद्धत, गुंतवणुकीचा कार्यकाळ, इत्यादी घटक शेअर बाजाराशी संलग्न असतात. अलीकडे तशाच प्रकारच्या गुंतवणूक योजना जास्त बाजारात येतात. गुंतवणूकदारास मात्र गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छाशक्ती असते. गुंतवणूक योजनेसंदर्भात त्यांच्यात अपुरे ज्ञान, भीती, वैचारिक गोंधळ वाढत जातो. त्यामुळे ते गोंधळलेले असतात.

आजच्या काळामध्ये बँक किंवा पोस्टामधील ठेवीवरील मिळणारे व्याज दर घटत आहेत. त्यामुळे नाइलाजास्तव असा वर्ग शेअर्स, म्युच्युल फंड, पेन्शन प्लॅन यासारख्या योजनेमध्ये गुंतवणूक करीत असतात. ज्यांच्या मार्फत गुंतवणूक करतात, असे योजनेचे एजंट, मध्यस्थ गुंतवणूकदारास सुयोग्य माहिती व हवी असणारी माहिती खरंच देतात काय? हा संशोधनाचा विषय ठरू शकेल. कारण एजंट किंवा मध्यस्थ गुंतवणूक योजनेचे प्रतिनिधी असतात. त्यांना गुंतवणुकीची माहिती कमी परंतु, योजनेच्या विक्रीचे लक्ष्य जास्त दिलेले असते. त्यावरच त्यांचे लक्ष असते. त्यामुळे गुंतवणूकदाराच्या हिताची खरी व वास्तव माहिती देतात काय? हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. त्यातूनच गुंतवणूकदाराच्या मनामध्ये सातत्याने चिकित्सा व चिकित्सक वृत्ती जागृत ठेवावी लागते. पण दुर्दैव असे आहे की असे फार कमी प्रमाणामध्ये होते.

प्रामुख्याने सामान्य गुंतवणूकदाराच्या कौटुंबिक, आर्थिक गरजा प्रत्येक व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांनी करावी लागणारी गुंतवणूक, गुंतवणूक योजना नक्कीच वेगवेगळ्या फायदेशीर ठरतात. एखाद्या व्यक्तीस ४’्रस्र चा प्लॅन किफायतशीर व फायदेशीर ठरत असतो. परंतु दुस-या व्यक्तीस तो अयोग्य देखील ठरू शकतो. कारण प्रत्येक गुंतवणूकदाराची आर्थिक उद्दिष्टे,, कौटुंबिक ध्येयधोरणे, हे साध्य करण्यासाठी सुयोग्य प्रकारच्या योजनेमध्ये गुंतवणूक केली तरच अशी गुंतवणूक गुंतवणूकदाराच्या हिताची व फायद्याची ठरते. परंतु याचा विसर अनेकांना पडत असतो. ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. परंतु त्यातून नकारात्मक विचारांचा प्रवाह समाजामध्ये दिसतो. यासाठी गुंतवणूकदाराने आर्थिक नियोजनाचा सल्ला फुकट घेण्याचे टाळावे. कारण गुंतवणूक योजनेच्या विक्री प्रतिनिधीकडून अशा सल्ल्याची अपेक्षा ठेवणे व्यर्थ ठरू शकते. यासाठी गुंतवणूक सल्लागार गुंतवणूकदाराला चांगली मदत करू शकतात.

व-हाडाचा टेम्पो उलटून दोन ठार; ५० जण गंभीर

जसे आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण चांगल्या डॉक्टरकडे जाऊन आरोग्याची तपासणी करतो, त्यांचा सल्ला घेतो, आपले आरोग्य चांगले ठेवतो. यासाठी आपण डॉक्टरची फीस देतो. तशाच प्रकारची सवय, आर्थिक सल्लागार जे मान्यताप्राप्त असतात, त्यांच्याकडून सल्ला घेतल्यास त्यांना फी द्यावी लागते. तशी सवय गुंतवणूकदाराने लावणे गरजेचे आहे. असे केल्यास एखादी गुंतवणूक योजना गुंतवणूकदारांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी चांगली किंवा किफायतशीर आहे का? या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतील. त्याचा फायदा होतो. गुंतवणूकदाराच्या आर्थिक गरजा, कौटुंबिक गरजा, ध्येयधोरणे, जोखीम स्वीकारण्याची पद्धत इत्यादी गोष्टी लक्षात ठेवूनच चांगल्या गुंतवणूक योजनेसंदर्भात सल्ला देऊ शकतात. गुंतवणूकदाराने तशा प्रकारची सवय लावणे गरजेचे असते.

वास्तविक पाहता गुंतवणूक करीत असताना जोखीम पूर्वीपेक्षा जास्त स्वीकारावी लागते.. हे सत्य आहे. पूर्वीच्या काळी जोखीमरहित गुंतवणुकीची सवय होती. त्यात गुंतवणुकीचा परतावा देखील जास्त होता. बदलत्या काळाचा विचार करता सध्याची गुंतवणूक व गुंतवणुकीचा प्रवाह हा शेअर बाजाराकडे वळतो. त्यात अशा गुंतवणूक योजना धारक हे शेअरमध्ये, रोख्यात बाँडमध्ये, जी- सेक्युरिटी, वायदा बाजार, म्युच्युअल फंड इत्यादीमध्ये गुंतवणूक योजनेचा पर्याय निवडतात.
सध्याच्या काळात गुंतवणूक योजना या बाजाराधिष्ठित असल्यामुळेच गुंतवणूक करत असताना जोखीम जास्त स्वीकारावी लागते. हे सत्य पचवावे लागेल. प्रत्येक गुंतवणूकदाराचा स्वभाव, जोखीम स्वीकारण्याची क्षमता वेगवेगळी असते. याची माहिती फक्त गुंतवणूक करणा-या व्यक्तीलाच असते. त्यामुळे कॅलक्युलेटेड रिस्क स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. जोखीम स्वीकारून गुंतवणुकीचा परतावा जास्त मिळवण्याची कुवत किंवा क्षमता सर्वांमध्येच नसते. म्हणूनच गुंतवणूकदाराच्या जोखीम क्षमतेनुसार गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीचा समतोल साधता येतो. यासाठी व्यावसायिक स्वरूपाच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला गुंतवणूकदारास उपयोगी ठरतो.

प्रत्येक गुंतवणूक योजनेचा ठराविक उद्देश असतो. कोणतातरी ठराविक एक वर्ग लक्षात ठेवूनच,अशी गुंतवणूक योजना तयार करतात. त्या योजनेचा जास्त फायदा मिळविण्यासाठी कोणत्या नियम व अटी असतात? त्याची पूर्तता करावी लागते. याची माहिती गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवली जाते काय? हा एक अनुत्तरित प्रश्न तसाच असतो. कारण गुंतवणूकदारास गुंतवणूक योजनेची चौफेर माहिती देण्यापेक्षा, मध्यस्थ किंवा एजंट त्या योजनेची विक्री कशी जास्त वाढेल? त्याच्या व्याप्तीमध्ये वाढ कशी होईल? एवढाच दृष्टिकोन ठेवून गुंतवणूक योजनेची विक्री करीत असतात. यासाठी गुंतवणुकीच्या एजंट किंवा मध्यस्थाला ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण दिले जाते. अशा वेळी त्यांना सामान्य गुंतवणूकदारांचा फायदा कसा होईल? हे सांगण्यापेक्षा गुंतवणुकीची विक्री कशी वाढेल? त्यामध्ये वाढ कशी होईल? यावरच जास्त लक्ष प्रशिक्षणामध्ये दिले जाते. यामुळे गुंतवणूकदारास गुंतवणुकीची माहिती कमी मिळते.

विक्री कशी वाढेल? विक्री करण्याकडेच त्यांचा भर जास्त असतो. त्यातूनच आक्रमक मार्केटिंगची सुरुवात झाली असावी. अशा प्रकारची मार्केटिंग दीर्घकाळासाठी अयशस्वी ठरू शकते. यासाठी गुंतवणूक योजनेचा प्रचार व प्रसार करायचा झाल्यास समतोल किंवा चांगली मार्केटिंग बदलत्या काळात करणे गरजेचे असते. आक्रमक बाजारपेठेची आखणी करीत असताना मध्यस्थ किंवा एजंट याच्यात फायद्याचा जास्त विचार केला जातो. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार अशा एजंटकडे संशयित दृष्टिकोनातून पाहतात. त्यामुळे एजंट किंवा मध्यस्थ गुंतवणूक योजनेला डोक्यावर घेतात. मात्र अशा गुंतवणूक योजना लोकप्रिय ठरायच्या असतील तर सामान्य गुंतवणूकदाराने अशा योजनेला डोक्यावर घ्यावे लागेल. दुर्दैवाने असे चित्र दिसत नाही. यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
गुंतवणूक करणा-या वर्गांना वास्तविक पाहता तीन टप्प्यांत माहितीची गरज भासते. पहिल्या टप्प्यात गुंतवणुकीपूर्वीचा टप्पा असतो.

जसे एखादा शेतकरी शेतात पेरणी करण्यापूर्वी शेतीची मशागत करतो. मग बियांची पेरणी करतो. अशा स्वरूपात काम करण्यासाठी गुंतवणूकदाराच्या कायमस्वरूपी संपर्कात राहावे लागते. गुंतवणुकीपूर्वीचे प्रश्न सोडवणूक करणारा व्यक्ती, मध्यस्थ, एजंट लोकप्रिय ठरतो. कारण त्यातूनच गुंतवणूकदाराच्या आर्थिक गरजा, कौटुंबिक गरजा अशा वर्गांना समजतात. प्रत्येक कुटुंबासाठी वेगळी फाईल, आर्थिक ध्येयधोरणे याचे टिपण ठेवणे गरजेचे ठरते. त्यातून गुंतवणूकदाराच्या विचाराची नाडी लक्षात येते. दुस-या टप्प्यात गुंतवणूक योजनेच्या कालावधीमध्ये भेडसावणारे आर्थिक प्रश्न, दर्जेदार सेवा मिळण्यापासून वंचित राहणे इत्यादी समस्या सोडवाव्या लागतात. त्यानंतरचा टप्पा म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरचा असतो. परिपक्वतेची रक्कम गुंतवणूकदाराच्या हाती पडेपर्यंत करावी लागणारी मदत, सेवा प्रामाणिकपणे दिल्या असतील तर गुंतवणूकदार हा एजंटचे कामधेनूप्रमाणे उत्पन्न मिळवू शकतो.

त्यास उत्पन्नदेखील मिळत असते. ऑनलाईनच्या काळात गुंतवणूकदारांच्या अपेक्षा बदलल्या आहेत. त्या अपेक्षांची पूर्तता होणे गरजेचे असते. गुंतवणूकदार हा सुशिक्षित असो, अशिक्षित असो, शहरातील असो, ग्रामीण भागातील असो, एजंटाशिवाय गुंतवणूक करणे आजच्या काळामध्ये अवघड ठरते. नवीन गुंतवणूक योजना लोकप्रिय ठरण्यासाठी, कार्यक्षम व सकारात्मक विचाराच्या एजंटाची गरज भासते. कारण असा वर्ग स्वार्थ साधतो आणि परमार्थ देखील करत असतो. अन्यथा अनेक गुंतवणूक योजना या अर्ध्यावरती मोडल्या जातात. बंद पडतात. म्हणजे मंगेश पाडगांवकर यांचे गीत इथे आठवते. ‘‘अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी ‘‘असे चित्र हे भविष्यामध्ये होऊ नये यासाठीच हा लेख प्रपंच.

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या