30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeविशेषआरोग्यदायक मीठ

आरोग्यदायक मीठ

एकमत ऑनलाईन

अन्नपदार्थाला चव व खाद्य पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी प्राचीन काळापासून माणसांच्या वापरात असलेला आणि सर्व प्राण्यांच्या आरोग्यास आवश्यक असलेला एक सर्व परिचित पदार्थ म्हणजे मीठ होय. रासायनिक परिभाषेत मीठाला सोडियम क्लोरॉईड असे म्हणतात. महत्वाचे म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्राक्लोरिक आम्ल यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन तयार होणारे हा एक प्रकारचे लवण आहे. या लवणाचे रासायनिक सुत्र एन एसी एल असून हे सर्वात महत्वाचे संयुग आहे. हे लवण खनिज युक्त झरे, खारट सरोवर, समुद्राचे पाणी यामध्ये विरघळलेल्या स्वरूपात व सैंधव खनिज साठ्याच्या स्वरूपात निसर्गामध्ये सामान्यपणे आढळते.

मीठ खारट, रूचीकर, स्वादवर्धक, वर्णहीन, घनाकृती, थंड पाण्यात सहज विरघळणारे, स्फटिकासारखे, कृमीनाशक, लाळवर्धक, स्थुलपणा कमी करणारे, सुज नाशक, भूकवर्धक, आरोग्यदायक इत्यादी. मानवाच्या व ब-याच प्राण्याच्या रोगाच्या उपचारामध्ये मीठ व मिठाच्या पाण्यातील विद्राव्याचा औषधी म्हणून फार प्राचीन काळापासून वापर करण्यात येतो. यासाठी मीठ तसेच किंवा अन्य पदार्थाबरोबर वापरता येते अनेक खाद्य पदार्थ जास्त दिवस टिकविण्यासाठी मीठाचा वापर केला जातो. उदा. लोणची, लोणी, मासे, मांस तसेच काही पदार्थाची चव वाढावी म्हणून फरसाण, खारे दाणे, पाव, बिस्किटे इत्यादी उत्पादनामध्ये मिठाचा वापर केला जातो. तसेच आवळे, कै-या, चिंच, आमसूल मीठ लावून खारवतात व वाळवतात. मिठामुळे रूची वाढते व मिठामुळेच अन्नसुध्दा लवकर पचन होते.

अन्न पदार्थानी रूची देण्याचे, प्रत्येक खाद्य पदार्थातला स्वाद बाहेर काढण्याचे आणि इतर मसाल्याच्या पदार्थाची रूची वाढविण्याचे काम मीठ करते. जेवणात मीठ नसल्यास जेवणाला स्वाद येत नाही. आणि त्यामुळेच प्रत्येक अन्नपदार्थामध्ये मीठ वापरण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नाही. पाचक प्रणालीच्या प्रत्येक सामान्य कार्यासाठी मीठ अत्यंत आवश्यक आहे. ज्यामुळे लाळेला सक्रिय होण्यास प्रोत्साहन मिळते. आपण दररोज कमीत कमी दोन ग्रॅम मीठ खाल्ले पाहिजे. त्यापेक्षा कमी मीठ खाल्यामुळे सोडियमच्या कमतरतेमुळे विविध आजार होण्याची शक्यता असते. मिठाचा वापर त्वचेच्या आरोग्यासाठी स्क्रबर म्हणूनही करू शकतो. त्यासाठी थोडेसे मीठ पाण्यात मिसळून विरघळून त्या पाण्याने त्वचेवर हलकासा मसाज करावा. त्यामुळे त्वचेवरील मृतपेशी दूर होऊन बंद असलेली रंध्रे उघडी होतात.

अमेरिकेसह १० देशात कोरोना संसर्ग उतरणीला

अनेक वेळा तरूण वयामध्ये चेह-यावर पुटकळ्या, मुरूम किंवा काळे डाग आल्यामळे चेहरा खराब दिसतो. त्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ मिसळून नियमितपणे काही दिवस घेतल्यास त्वचा उजळ होण्यास मदत होते. मिठाचे पाणी पिल्याने तोंडात लाळ निर्माण करणा-या ग्रंथी अधिक कार्यशिल होतात. यकृत व आतड्यात अन्नाचे पचन करणारे इन्झाईम्स तयार होतात. या आजारामध्ये मुत्रोत्सर्जन होताना कठीण व शुष्क मल बाहेर पडताना त्रास होतो. यासाठी नेहमीच्या आहारात मिठाचे किंचित प्रमाण वाढवावे. विशेषत: पोळीच्या आटा कालवताना, डाळ शिजवताना किंवा भात, कोशिंबिर यात अधिक मीठ टाकून जेवण करावे.

प्रामुख्याने लहान मुलांमध्ये पोटामध्ये जंत/कृमी तयार होतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित काम करीत नाही. त्यासाठी एक ते दोन ग्रॅम मीठ पाण्यात मिसळून नियमितपणे काही दिवस दिल्यास कृमी आपल्या जागेपासून सुटतात व बाहेर पडून जातात व पुन्हा नवीन कृमीही होण्यास प्रतिबंध होतो. या आजारामध्ये भूक लागणे, पोट जड होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, करपट ढेकर येणे असा त्रास पचन शक्ती कमी झाल्यामुळे होतो. त्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये चिमुटभर मिठ मिसळून प्यावे त्यामुळे अग्नि प्रज्वलित होऊन पचन क्रिया व्यवस्थित सुरू होते. मीठाचा वापर दाताच्या स्वच्छतेसाठी खूप महत्वाचा आहे. ब-याच वेळा दात पिवळे होतात. त्यासाठी एक भाग मीठ आणि दोन भाग बेकींग सोडा वापरून पेस्ट तयार करावी. या पेस्टने दात काही दिवस नियमितपणे घासल्यास दात शुभ्र व चमकदार होतात.

अनेक वेळा काही चुकांमुळे पोटात विष जाते व त्यामुळे अस वेदना होतात. त्यासाठी पाण्यामध्ये भरपूर मीठ मिसळून जास्तीचे पाणी घ्यावे त्यामुळे उलट्या किंवा जुलाब होतात व पोटातील विष बाहेर पडून जाते. तसेच पित्त प्रधान उलटीमध्ये मीठ आल्याबरोबर घेतल्यास उलटी थांबते. या आजारामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व अशक्तपणा वाढतो. त्यासाठी एक लीटर पाण्यामध्ये दोन चमचे मीठ, व चार चमचे साखर आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र मिसळून रूग्णाला थोड्या-थोड्या वेळाने प्यायला द्यावा त्यामुळे तीव्र अतिसार कमी होऊन आराम मिळतो. अनेक वेळा लघवीला त्रास होतो ज्यामध्ये लघवी थांबणे, थेंब-थंब होणे किंवा जळजळ होणे अशा समस्या होतात तसेच मुत्र गढूळ किंवा अशुध्द झाल असेल किंवा मुत्राला अडथळा होत असेल तर रोज सकाळी एक ग्रॅम मीठ एक ग्लासभर पाण्यात मिसळून घेतल्यास फायदा हाता.

लघवीतील विरघळलेले स्फटिकजन्य पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतो त्यावेळी मुतखडा तयार होतो. त्यामुळे मुत्रमार्गात अडथळा निर्माण होऊन तीव्र वेदना सुरू होतात. त्यासाठी ताज्या कोथिंबिरीचा (धने) काढा तयार करून त्यात अधिक मीठ मिसळून पिल्यास मुतखडा पडून जातो. सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचा वापर वाढला आहे. संगणकावर सतत काम केल्यामुळे डोळ्यावर ताण येतो व थकवा जाणवतो त्यासाठी मीठाच्या कोमट पाण्यात स्वच्छ कपडा भिजवून तो डोळ्यावर ठेवून काही वेळा साठी आराम करावा. त्यामुळे डोळ्याचा त्रास कमी होतो. या आजारामध्ये दातांना किड लागते हिरड्यातून रक्त स्त्राव होऊन वेदना होतात किंवा दात सैल होतात. त्यासाठी मीठ बारीक वाटून त्याचे चूर्ण तयार करावे व त्या चुर्णाने काही दिवस नियमित दात घासावेत.

अजिर्णापासून किंवा गुल्मापासून अथवा अन्य कारणांमुळे पोटात वेदना होतात. त्यासाठी अर्धा चमचा आल्याचा रस, तितकाच लिंबाचा रस व चिमुटभर मीठ मिसळून दोन-तीन वेळा पिल्याने वेदना कमी होतात. तसेच पोट फुगले असल्यास थोडे आले भाजून त्याला मीठ लावून खाणे. मीठ पाचक असल्यामुळे पोट लवकर साफ होते. पोटात वायुची जास्त निर्मिती झाल्यामुळे पोट फुगते व ढेकर येतात यावर मीठासारखे दुसरे औषधी नाही. त्यासाठी सुंठ भाजून त्याला मीठ लावून सेवन केल्यास वायु सरून ढेकरा बंद होतात. व पोट साफ उतरते किंवा थोडे आले भाजून (गरम करून) मीठ लावून खाल्यास फायदा होतो. मधमाशी किंवा गांधील माशी अथवा विषारी किडा चावल्यास गांध (सूज) येते व तीव्र वेदना होतात. त्यासाठी एक चमचा पाण्यामध्ये एक चमचा मिठ मिसळून ते मिठाचे पाणी दंश झालेल्या भागावर लावून हळूहळू चोळावे किंवा डंख झालेल्या भागावर मीठ लावावे, वेदना व सुज दोन्ही कमी होतात. मीठ शरीरातील हार्मोन्सवर नियंत्रण ठेवते. जे हार्मोन्स तणावाशी संबंधीत आहेत. त्यांचा समतोल ठेवण्यास मदत करते. त्यासाठी मीठ नियमितपणे योग्य प्रमाणात (ना कमी-ना जास्त) खावे यामुळे झोप व येण्याचा समस्या कमी होतात व अनिद्रेचा त्रास कमी होतो. टिप:- वनौषधीचा वापर करताना आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या