27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022

‘घर’

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी हे काय पप्पा, तुम्ही सगळं घर घाण करुन टाकले. आत्ताच राधा ने फरशी पुसली होती आणि तुम्ही चपलांचे ठसे उमटवले. थोडं तरी समजायला पाहिजे तुम्हाला? तुम्ही काही लहान नाही. सुनबाई रियाच्या तोंडून हे ऐकून अनिलजींना धक्का बसला. आज त्यांची सून त्यांच्याच घरात त्यांना इतके ऐकवत होती. तेवढ्यात पत्नी म्हणाली, सुनेचे बोलणे काय मनावर घ्यायचे? फक्त तोंडाने फटकळ आहे, अनिलजींनी पत्नी रमाकडे बघितले, जसे की विचारत होते की खरंच? आणि त्यांच्या ओठांवर हसु तरळले, पण डोळ्याच्या कडा ओलावल्या.

ते विचार करत होते की, एक-एक वीट आपल्या मनाप्रमाणेने रचली होती या घराची, जेणेकरुन निवृत्तीनंतर पति-पत्नी सर्व सोयी सुविधांनी युक्त घरात आरामात राहू. परंतु आज सर्व जग त्यांच्या खोलीपर्यंत मर्यादित झाले होते. खोली तून बाहेर निघावे तर किती ऐकावे लागते त्यांना. हा सर्व विचार करतच होते की हातात कॉफीचा मग घेऊन रमा त्यांच्याजवळ येऊन बसल्या. त्या आपल्या पतीला चांगले ओळखून होत्या. त्यांना चांगले माहित होते की ते आता रागात होते, आणि त्यांच्या हातची कॉफी पिऊन त्यांचा राग शांत होऊन जाईल. रमा पण काय करेल, पति आणि मुलगा सोमेशच्या प्रेमात अडकलेली एक भारतीय स्त्रीच होती.

दोन्ही बाजू सांभाळत दिवस काढत होती, कधी मुलांचे ऐकायच्या, कधी पतीचं. एक दिवस सकाळी फिरुन आल्यावर पती-पत्नी दोघे लॉनवर बसले होते. नोकर चहा ठेवून गेला, दोनऐवजी चहाचे तीन कप बघून त्यांना थोडं वेगळं वाटलं. कारण त्यांच्याशिवाय फक्त सोमेश चहा पित, असे आणि तो त्यांच्या सोबत कधी चहा पीत नसे. त्याने त्यांच्यासोबत बसणं कधीच सोडलं होतं, मग आज? तेवढ्यात सोमेश तेथे येऊन बसला, सोबत चहा पिऊ लागला. पण एक अजब शांतता पसरली होती. अजब औपचारिकता बाप-मुलामध्ये बनून राहिली होती. तेव्हा रमा शांती भंग करीत म्हणाल्या, सोमेश, पुढच्या महिन्यातच रियाच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे ना? हो आई, त्याविषयीच बोलायला आलो आहे. मुलाकडचे याच शहरातील आहेत व त्यांना लग्न याच शहरात करायचं आहे. म्हणून रियाच्या परिवाराला लग्नासाठी हे घर हवं आहे. आपले घर लग्नघर म्हणून पाहिजे आहे. म्हणून मला वाटतं, जोपर्यंत घरात गर्दी राहिल तोपर्यंत तुम्ही दोघं दीदीकडे जाऊन रहावं.

तुम्हा दोघांना ही गर्दीमुळे त्रास होईल आणि दिदी पण याच शहरात आहे म्हणून तुम्हाला काही त्रासही होणार नाही. तुमची दोघांची खोलीही त्यांना कामात येईल. हे ऐकून अनिलजी रागाने लाल झाले. तरीही आपला आवाज नॉर्मल ठेवत म्हणाले, तिच्या घरच्यांना भाड्याने दुसरे घर घेऊन दे दहा पंधरा दिवसांसाठी. आम्ही कशाला दुस-या ठिकाणी जाऊ? रियाने तर त्यांना सांगूनही दिले आहे. आता तुम्ही तुमचे पाहून घ्या, ते येथेच येतील, असे बोलून सोमेश उठून आत निघून गेला. आतून सून रियाचा ही आवाज येऊ लागला. बहुतेक तिने सर्व ऐकले होते आणि तिला अनिलजींचं बोलणं आवडलं नसावं. आज रमा डोळ्यांतून अश्रू ढाळत होत्या.

अनिलजींनी म्हणत होते की, अजून मी आहे, सर्व ठीक करुन देईन. दुस-या दिवशी सायंकाळी अनिलजी फिरून आले तेव्हा रमाने सांगितले की, सोमेश, रीया आणि मुलांसह सुट्टी आहे म्हणून सासरी गेला आहे. आज ते आपल्यालाच आपल्या घरातून जायला सांगत आहेत. काही हरकत नाही, मी पण त्याचा बाप आहे. म्हणून आत निघून गेले. एक आठवड्यानंतर सोमेश कुटुंबासह परत आला तर दरवाजाला कुलुप लावलेले होते. चौकीदार त्यांना बघून जवळ आला व एक चावी व चिठ्ठी सोमेशच्या हातात दिली. चिठ्ठी उघडून वाचू लागला, ती चिठ्ठी अनिलजींनी सोमेशच्या नावे लिहिली होती, सोमेश, मी आणि तुझी आई रामेश्वरमला जात आहे. एक महिन्यांनी परत येऊ. ही तुझ्या हातातली चावी या घराची नाही. ती दुस-या फ्लॅटची आहे ज्यात तुम्हा सर्वांचे सामान ठेवलं आहे.

तो फ्लॅट मी खुप पुर्वी विकत घेतला होता, हे घर माझं आणि तुझ्या आईचं आहे आणि आमचंच राहिल. यातून आम्हाला कुणीच काढू शकणार नाही. आम्हाला मुलं, नातवंडांसह रहायची इच्छा होती, पण तुम्हाला आमचा सहवास आवडत नव्हता. आमच्या नंतर हे घर ट्रस्टला दिलं जाईल, जे येथे वृद्धाश्रम बनवेल. या घरावर तुमचा किंवा तुझ्या बहिणीचा काहीही अधिकार रहाणार नाही, मी हे सर्व तुझ्या बहिणीला ही सांगितले आहे आणि ती माझ्या या निर्णयावर खुश आहे, आशा आहे तु ही असशील. तुम्ही सर्व आनंदी रहा. तुझा पप्पा. वाचून होताच सोमेशला धक्का बसला. डोळ्यात अश्रू होते, परंतु हे माहीत नाही की, ते पश्चातापाचे होते की, इतकं मोठं घर सोडावे लागेल म्हणून, की वडिलांची संपत्ती मुलांचीच असते हा विश्वास तुटल्यामुळे होते, ते माहीत नाही.

Read More  जळकोट तालुक्यातील पंधरा हजार शेतक-यांनी भरला सव्वा कोटींचा पीक विमा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या