27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home विशेष वाद प्रश्नोत्तरांच्या तासाचा

वाद प्रश्नोत्तरांच्या तासाचा

एकमत ऑनलाईन

कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला असतानाच संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाची अधिसूचना जारी झाल्यापासूनच एक वाद सुरू झाला आहे. हे संक्षिप्त अधिवेशन संकटकालीन परिस्थितीत बोलावण्यात आले आहे आणि सर्व खासदार आणि कर्मचारी सुरक्षित राहावेत यासाठी अत्यावश्यक कामे लवकरात लवकर उरकून अधिवेशन समाप्त करण्यावर सध्या भर दिला जात आहे. त्यामुळे यावेळी संसदेच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये प्रश्नोत्तरांचा तास रद्द करण्याच्या प्रस्तावाचाही समावेश आहे. या निर्णयाविरोधात अनेक विरोधी पक्षनेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि तसे होणे स्वाभाविकही होते.

सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयांकडून बुधवारी अधिसूचना जारी करण्यात येण्यापूर्वी सर्व छोट्या-मोठ्या नेत्यांशी सल्लामसलत करण्यात आली होती. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन वगळता सर्वांनीच त्यास सहमती दर्शविली होती असे सांगितले गेले. अर्थात, अधिसूचना जारी झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी यावर जोरदार आक्षेप घेतले. अर्थात, प्रश्नोत्तरांच्या तासामुळेच सर्व खासदारांना सरकारने केलेल्या कामांविषयी प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार मिळतो. त्यामुळे कुणी हा अधिकार सोडणार नाही, हे निश्चित.

लोकसभेमध्ये संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर सुरुवातीची ६० मिनिटे म्हणजेच एक तास प्रश्न विचारण्याचा असतो. यालाच प्रश्नोत्तरांचा तास म्हणतात. इतिहासात डोकावले असता १९६२, १९७५, १९७६ आणि १९९१ मध्ये संसदेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास रद्दबातल करण्यात आला होता. १९६२ मध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान भारत आणि चीन यांच्यात युद्ध सुरू होते. २० ऑक्टोबरपासून सुरू झालेले हे युद्ध २१ नोव्हेंबरपर्यंत चालले होते. त्यावेळच्या हिवाळी अधिवेशनात अधिवेशनाची सुरुवात सकाळी ११ ऐवजी १२ वाजता होत असे. ते अधिवेशन ३४ दिवसांऐवजी २६ दिवसच चालले होते.

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्‍का नको ! -प्रकाश शेंडगे

१९७१ मध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान हिवाळी अधिवेशनातून प्रश्नोत्तरांचा तास वगळण्यात आला होता. त्या अधिवेशनात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या पराभवाची आणि बांगला देशाच्या जन्माची घोषणा लोकसभेत केली होती. त्यावेळी लोकसभेचे कामकाज १० ते १ या वेळेत चालायचे. पुढे इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीच्या काळातही संसदेची किमान दोन अधिवेशने प्रश्नोत्तरांच्या तासाविनाच पार पडली. जून १९७५ ते मार्च १९७७ या आणीबाणीच्या कालखंडामध्ये संसदेची पाच अधिवेशने पार पडली. यातील आणीबाणीची घोषणा झाल्यानंतरच्या पहिल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास नव्हता. तसेच १९७६ च्या हिवाळी अधिवेशनातही या तासाला बगल देण्यात आली.

प्रश्नोत्तरांचा तास म्हणजे संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे, भारताने ही पद्धत इंग्लंडकडून घेतलेली आहे. ब्रिटनमध्ये १७२१ मध्ये सर्वप्रथम याची सुरुवात झाली होती. भारतात याचा श्रीगणेशा १८९२ मध्ये झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात संसदेत प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर अनेक प्रकारचे निर्बंध होते. स्वातंत्र्यानंतर ते सर्व संपुष्टात आणले गेले. संसदेत बहुतांश वेळ विविध पक्षांच्या ध्येयधोरणांनुसार चर्चा झडतात; मात्र प्रश्नोत्तरांच्या तासाचे वातावरण वेगळेच असते. या कालावधीत खासदार आपल्या तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेच्या कामकाजासंबंधी प्रश्न विचारतात आणि सरकारच्या उत्तराने समाधान झाले नाही, तर दोन पूरक प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला स्पष्ट उत्तर देण्यास भाग पाडतात.

प्रश्नोत्तरांच्या तासात पक्षभेदही कमी होत असल्याचे दिसून येते. सरकार खुद्द आपल्याच पक्षातील खासदारांच्या प्रश्नांनी घेरले जाताना दिसते आणि त्यामुळे सरकारची अधिक कोंडी होते. सरकारला प्रश्न विचारण्याची आणि सरकारची जबाबदारी निश्चित करण्याची ही परंपरा संसदीय लोकशाहीच्या काळातील अशा टप्प्याची आठवण करून देते, जेव्हा खासदार कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर नव्हे तर स्वत:च्या बळावर निवडून येत असत आणि संसदेत पोहोचल्यानंतर आपला पक्ष निश्चित करीत असत. लोकशाहीच्या प्रदीर्घ प्रवासात अनेक राजकीय पक्षांचा उदय झाला आणि ते मजबूतही होत गेले. या पक्षांनी लोकशाही चेतना आणि प्रक्रिया यांचा किती फायदा झाला आणि कोणकोणत्या पैलूंवर त्या कमकुवत झाल्या, या विषयावर संशोधन होत राहील. परंतु आजच्या घडीला पक्षविरहित लोकशाहीची कल्पना करणेही आपल्यासाठी अवघड आहे, हे मात्र खरे.

महाजॉब्जमध्ये नोंदणी झालेल्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण- सुभाष देसाई

प्रश्नोत्तरांच्या तासाबाबत चर्चा करताना मात्र पक्षभेद बाजूला ठेवले पाहिजेत. सरकारच्या कामाचे मूल्यमापन करण्याच्या ज्या संधी उपलब्ध आहेत, त्या कमी करण्यात कोणतेही शहाणपण नाही. विरोधी पक्षांचा नूर पाहून सरकारने लोकसभेच्या अध्यक्षांना आणि राज्यसभेच्या सभापतींना पावसाळी अधिवेशनात दररोज अर्ध्या तासाचा वेळ प्रश्नोत्तरांसाठी ठेवावा आणि बिगर तारांकित म्हणजे लेखी उत्तरे अपेक्षित असलेल्या प्रश्नांचाच त्यात समावेश करावा, अशी सूचना केली आहे. ही गोष्ट पुरेशी नाही हे खरे; परंतु प्रश्नोत्तरांच्या तासाला पूर्णपणे फाटा दिल्यामुळे पावसाळी अधिवेशनाला जो डाग लागणार होता, तो तरी यामुळे नक्की टळेल.

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, संसदेचे काम केवळ नवे कायदे बनवणे नसून देशातील नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणे हेही आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी. व्ही. मावळणकर खासदारांना-सदनातील लोकप्रतिनिधींना असे म्हणत असत की, तुम्ही किती नवे कायदे केले यावरून तुम्हाला लोक स्मरणात ठेवणार नाहीत; तर लोकशाहीच्या या पवित्र मंदिराने सर्वसामान्य लोकांच्या जीवनात किती बदल घडवून आणला हे पाहिले जाईल. त्या परिप्रेक्ष्यातून प्रश्नोत्तरांच्या तासाकडे आणि संसदेच्या अधिवेशनाकडेही पाहिले गेले पाहिजे.

प्रा. पोपट नाईकनवरे
राज्यशास्त्र अभ्यासक

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

आयपीएलला अमिरातीचे इंधन

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचा १३ वा हंगाम आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत आहे. भारतात आयोजित केली जाणारी ही स्पर्धा कोरोना विषाणूच्या...

विषय व्याजाचा, गरज नाजूक हाताळणीची

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून देशभरात टाळेबंदी अर्थात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि साधारणत: जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने अनलॉकचा काळ सुरू झाला आहे....

अर्थव्यवस्थेची घसरण तात्पुरती

केंद्रीय सांख्यिक विभागाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) वृद्धिदरात २३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. कृषी वगळता...

वाढत्या आत्महत्या कशा रोखणार?

गेल्या वर्षी म्हणजे २०१९ मध्ये आपल्या देशात दररोज सरासरी ३८१ जणांनी स्वत:चे जीवन संपवून मृत्यूला कवटाळले, असे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोची (एनसीआरबी) नुकतीच प्रसिद्ध...

क्रांतीचा वणवा

हैदराबाद मुक्तिसंग्राम अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या त्यागाने-रक्ताने लिहिला गेला आहे. अबाल-वृद्ध महिला, तरुण या सर्वांनी स्वातंत्र्याच्या या अग्निकुंडात स्वत:ला झोकून दिले होते. आपली भारतमाता निजाम...

मुक्तिसंग्राम : नांदेड जिल्ह्याचा सहभाग

ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये भारतात ५६३ संस्थाने होती. त्याचा राज्यकारभार देशी राजे व संस्थानिक बघत असत. त्यापैकी एक म्हणजे हैदराबाद. या संस्थानाची स्थापना मीर कमरूद्दीन निजाम...

प्रश्न मीडिया ट्रायलचा

साहित्य हा समाजाचा आरसा असतो, हे वाक्य सर्वांनी ऐकले असेल. शाळेत असताना यावर निबंध लिहिण्याचीही संधी मिळाली असेल. चित्रपट हा साहित्याचाच एक भाग मानला...

अभियंतादिन

आज १५ सप्टेंबर आजचा दिवस संपूर्ण देशात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस. १५ सप्टेंबर १८६१...

समाजाभिमुख अभियंता

१५ सप्टेंबर हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतरत्न, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसानिमीत्त हा दिवस ‘अभियंता दिन’ म्हणून देशभरामध्ये...

लोह व प्रथिनेयुक्त ‘फालसा’

फालसा हा पानझडी व फळधारी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात वाढणारा आहे. या पानझडी वृक्षाचे मूळस्थान दक्षिण आशिया खंडातील असावे असा अंदाज...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...