24.1 C
Latur
Friday, September 25, 2020
Home विशेष स्थायी विकासाची दृष्टी असणारे सर्वसमावेशक नेतृत्व

स्थायी विकासाची दृष्टी असणारे सर्वसमावेशक नेतृत्व

एकमत ऑनलाईन

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे ९१ व्या वर्षी ५ ऑगस्ट रोजी दु:खद निधन झाले. माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी एका लेखात डॉ. निलंगेकर यांच्याविषयी जे गौरवोद्गार काढलेले ते सार्थच म्हणावयास हवेत. मंत्रिपदापासून ते मुख्यमंत्रिपदावर असताना डॉ. निलंगेकर यांनी सतत लोकोपयोगी निर्णय घेतले. मुख्यमंत्रिपदावर तर ते जेमतेम वर्षभरच होते. औरंगाबाद हायकोर्ट स्थापनेचा निर्णय घेऊन तिथल्या पायाभूत सुविधा त्यांनीच उभ्या केल्या. स्वच्छ चारित्र्याचे आणि निर्व्यसनी सत्पुरुष असा त्यांचा उल्लेख अंतुले यांनी केला आहे.

निलंगेकरांना मुख्यमंत्रिपद ज्या पध्दतीने सोडावे लागले त्यामुळे व्यथित झालेल्या अंतुले यांनी त्यांच्यावर अकारण अन्याय झाल्याची खंत व्यक्त केली. तथापि काँग्रेस हायकमांडनेदेखील त्यांच्यावरील अन्याय दूर केला नाही म्हणून एक सच्चा मित्र म्हणून बॅ. अंतुले यांनी मनापासून त्या लेखात खेद प्रगट केलाय. आणि ती खरीच गोष्ट होती. अत्यंत क्षुल्लक बाबीवरून नैतिकतेच्या कारणावरून निलंगेकरांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आजच्या काळात कुणाचा विश्वास बसू नये अशीच ती घटना होती.

डॉ. निलंगेकरांना किमान पाच वर्षे तरी मुख्यमंत्रिपद मिळावयास हवे होते असे वाटते. त्याचे कारण आम जनतेच्या विकासासाठी आवश्यक दूरदृष्टी त्यांच्याकडे होती यात शंकाच नाही. याशिवाय त्यांना स्वातंत्र्य चळवळीचा वसा होता. ते उच्च विद्याविभूषित होते. तथापि या गोष्टीचा तितकासा गवगवा झाला नाही. मुळात त्यांचा स्वभावसुध्दा आपल्या कुठल्याही कामाचा गवगवा किंवा जाहिरात करण्याचा नव्हताच. ते अत्यंत मितभाषी होते आणि संयमीदेखील. ते स्वकष्टाने आणि स्वकर्तृत्वाने अगदी तालुका पातळीपासून सुरुवात करून राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. डॉ. निलंगेकरांची शैक्षणिक आणि राजकीय कारकीर्द बघितली तर थक्क होऊन जावे अशी स्थिती. परंतु म्हणावी तेवढी प्रसिद्धी याबाबतही त्यांना मिळाली नाही ही खरीच गोष्ट आहे.

Read More  आपलं मनच आपल्या कामाची ग्वाही देणार असेल तर

१९४८ साली त्यांनी गुलबर्गा येथून मॅट्रिक म्हणजे दहावी पास केली. १९५३ ला हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून ते बी.ए. झाले. तर नागपूर विद्यापीठातून एम. ए. राज्यशास्त्र व एलएल. बी. पदवी मिळवली. नंतर १९८६ सालात त्यांनी नागपूर विद्यापीठाचीच, ‘मराठवाड्यातील राजकीय जागृती, चळवळी बदल’ या विषयावर पीएच.डी घेतली.
त्याआधी गुलबर्गा येथे माध्यमिक शाळेत असताना त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. शिक्षणानंतर काही काळ वकिली करून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

तो सर्वसामान्य ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत ठरावा. अगदी तालुका पातळीवर त्यांनी सुरुवात केली. १९५८ पासून चार वर्षे निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तालुका, जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य व अध्यक्ष आणि नंतर १९६२ ते १९८४ व १९८६ पासून ते २०१४ पावेतो आमदार निलंगा विधानसभा मतदारसंघात. जून १९८५ ते मार्च ८६ दरम्यान विधानपरिषदेचे आमदार व त्याच काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एवढा प्रचंड अनुभव आणि प्रदीर्घ कारकीर्द तेही अगदी तालुक्यापासुन सुरू करून थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत, अन्य कुणाची नसावी. बॅ. अंतुले आणि वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मंत्रिपदावरील कामगिरीचा देखील गौरवपूर्ण उल्लेख केला तो उगाच नाही.

लातूर व जालना जिल्ह्याची निर्मिती त्यांच्याच काळात झाली. निलंगेकरांनी सिंचनाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांना विकासाची उत्तम दृष्टी होती असे खुद्द वसंतदादांनी म्हटले. लोकाभिमुख, चारित्र्यसंपन्न, खात्याचा समग्र अभ्यास व परिपूर्ण माहिती यामुळे विधिमंडळात अतिशय कार्यक्षम मंत्री म्हणून काम. एक दूरदृष्टी असणारा उत्तम प्रशासक आणि विश्वासू मित्र म्हणून वसंतदादांनी त्यांना गौरविले. आपल्याकडे येणा-या सामान्य कार्यकर्त्याला देखील डॉ. निलंगेकरांनी आपुलकीने वागविले. लोकसंग्रह वृत्ती आणि संघटनकौशल्य यांच्या जोरावर त्यांनी इतका प्रदीर्घ काळ आपले स्थान टिकविले. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकरांच्या काळात विकासकामांची जंत्रीच उभी राहिली. सिंचनाच्या क्षेत्रात उजनी धरण, लोअर तेरणा प्रकल्प, कृष्णा प्रकल्प, आदी अनेक मोठ्या व लघु पाटबंधारे योजना प्रत्यक्ष कार्यान्वित झाल्या.

Read More  ऑगस्ट क्रांतीदिन चिरायू होवो!

डिसेंबर १९८५ मध्ये राजीव गांधींच्या काळात मुंबईत अ. भा. काँग्रेसच्या शताब्दी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या प्रभावी कार्याचे कौतुक खुद्द वसंतदादांनी केले होते. माजी खासदार जनार्दन वाघमारे यांनी त्यांच्याविषयी म्हटलेय, डॉ. निलंगेकरांचे जीवन म्हणजे विधायक राजकारणाचा वस्तुपाठ आहे. सभ्यता आणि रुजुता यांचा संगम त्यांच्या ठायी आहे. तर संयम आणि संतुलन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्यवच्छेदक लक्षणेच आहेत. हे अगदी सार्थच म्हणावयास हवे. डॉ. निलंगेकर मंत्री झाल्यानंतर बहुधा आमच्या गावात आले होते त्यावेळी आम्ही जि. प.शाळेत शिकत होतो. गावात त्यांची भव्य मिरवणूक काढलेली आठवते.

२०१४ साली माझे अमेय प्रकाशनाकडून अनुवादित पुस्तक ‘अपना स्ट्रीट’ प्रसिद्ध झाले होते. निलंगा येथील कोर्टात कामासाठी गेलो असताना २०१४ साली मेच्या पहिल्या आठवड्यात दुपारी चार वाजता मी एका पक्षकारासोबत त्यांच्या बंगल्यावर गेलो आणि भेटून माझे पुस्तक त्यांना दिले. येरोळ गावातल्या आठवणी निघाल्या. डॉ. निलंगेकरांनी त्यांची लहानपणीची एक गोष्ट त्यादिवशी आवर्जून आम्हाला ऐकवली. शाळेत असताना एक पाकीट त्यांना सापडले होते; परंतु ते त्यांनी जशाला तसे हेडमास्तरांना नेवून दिले. त्या पाकीटात पन्नास रुपये होते. म्हणजे त्या काळातील मोठीच रक्कम.

आपल्या आईचे संस्कार यावरही ते बोलले आणि आजच्या राजकारणावर त्यांनी भाष्य केले. औरंगाबाद खंडपीठ स्थापणेसाठी स्व. इंदिरा गांधी यांना गळ घालून तसेच तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग यांची सही घेणे, ही हकीकत मी त्यांच्याच तोंडून त्यादिवशी ऐकली. औरंगाबाद हायकोर्टाच्या इमारतीचा आराखडा घाईघाईने दिल्ली हायकोर्टाच्या आर्किटेक्टकडून मंजुरी घेऊन केंद्रातून अधिसूचनाच कशी आणली, आणि १९८१ ला अखेर खंडपीठ स्थापन झाले.

Read More  तो लढा, ती जिद्द, ते नेते…१९४२ चा क्रांतीचा जयजयकार

ही हकीकत ऐकून आम्ही खरेच भारावून गेलो. वकील लोकांमध्ये लिहिणारे कमीच परंतु तुम्ही लिहिताय, ही चांगली गोष्ट आहे. न्या. चपळगावकर, बाबा कदम अशी काही मंडळी लिहितात. मी तुमचे हे पुस्तक जरूर वाचणार, असे आश्वासनसुध्दा त्यांनी दिले ..आणि त्यांची दोन पुस्तके कॉलेजहून मुद्दाम मागवून मला भेट दिली. आश्चर्य म्हणजे आठच दिवसांनी त्यांच्या लेटरपॅडवर, दत्त मंदिरापाठीमागे, औसा रोड, लातूर या पत्त्यावर मला पत्रच आले. ‘न्यायालयीन कामाचा तुम्हाला चांगला अनुभव आहे आणि कष्टकरी महिलांच्या संघर्षाचा इतिहास तुम्ही ‘अपना स्ट्रीट’ या पुस्तकात उत्तम रीतीने मांडलाय. आपण लिहिलेले पुस्तक मी वाचले. भारतात आणि जगात निवारा नसलेल्या लाखो लोकांना जगण्याची आणि संघर्षाची प्रेरणा या पुस्तकाच्या रूपाने मिळेल, अशी मी अपेक्षा करतो.’ आणि खाली  आ. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, व सही.

माजी पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांच्या पत्राची मला आठवण आली. ही दोन्ही पत्रे मी जपून ठेवलीत, हे सांगावयास नकोच. न्यायक्षेत्र, शिक्षण, सहकार, विधिमंडळ कामकाज आणि सिंचन यात स्थायी विकासाचे काम डॉ. निलंगेकरांनी केले. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण पाच वर्षे मिळावयास हवी होती. असे अजूनही आपल्याला वाटते यातच सर्व आले.

-अ‍ॅड. प्रभाकर येरोळकर
लातूर , मोबा.: ९८६०४ ५५७८५

ताज्या बातम्या

गोलंदाजाची धुलाई : राहुलचे शतक, पंजाब जिंकला

दुबई : बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने तुफानी शतक झळकावले. बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई करत त्याने नाबाद १३२ धावांची खेळी केली आणि...

लातूर जिल्ह्यात २९४ नवे रुग्ण; ४ बाधितांचा मृत्यू, मृतांच्या संख्येत घट

लातूर : जिल्ह्यातील रुग्णसंख्येत सातत्याने चढउतार पाहावयास मिळत असून, गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी २९४ नव्या रुग्ण वाढले आहेत, तर या आठवड्यात मृतांच्या संख्येत...

‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी; 4 जणांचे अहवाल समाधानकारक

पुणे- सीरम इन्स्टिट्युने तयार केलेल्या 'कोव्हीशिल्ड'या करोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला बुधवार (दि.23) पासून सुरवात झाली आहे. दरम्यान, आज ससून रुग्णालयातील 4...

प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

2 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं; प्रकृतीत सुधारणा नसल्याचं परिपत्रकात लिहीलं चेन्नई-प्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक आहे. मागच्याा महिन्यात त्यांना...

उस्मानाबादेत ‘सह्याद्री’ हॉस्पीटलवर कारवाई; १० हजार रूपये दंडही ठोठावला

मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली होती तक्रार  ६०० रूपये शुल्क आकारण्यात यावे असे राज्य शासनाचे निर्देश ; रॅपीड ऍन्टीजेन टेस्टसाठी तब्बल...

सीमेवर अभूतपूर्व स्थिती : परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य, वाटाघाटीतूनच तोडगा शक्य

नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय क्षेत्रात घुसखोरीच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन सीमेवर...

रियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची...

शेतकरी आक्रमक : पंजाबमध्ये शेतक-यांचा रेल रोको; राज्यात तीन दिवस बंद, १४ रेल्वे रद्द

चंदीगड : विरोधकांचा विरोध डावलून तीन महत्त्वाची कृषी विषयक विधेयके संसदेत मंजूर झाल्यानंतर पंजाबमधील शेतक-यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. शेतक-यांनी आज पंजाबमध्ये ३...

कामगार कायद्यांत बदल : ईएसआयसीची सुविधा आता सर्व जिल्ह्यांत

 धोकादायक कंपन्यांना ईएसआयसीशी जोडणे बंधनकारक नवी दिल्ली : केंद्र सरकारने कामगार कायद्यात सुधारणा करण्यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या विधेयकांना संसदेत मंजुरी मिळाली. या तीनही विधेयकांत असंघटित क्षेत्रात...

देशात रुग्णसंख्या ५७ लाखांवर; ८६ हजारांवर नवे रुग्ण, मृतांचा आकडा ९१ हजारांवर

नवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या अजूनही मंदावलेली नाही. दररोज ८० ते ९० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून अचानक...

आणखीन बातम्या

‘अतुल्य’ नुकसानीच्या गर्तेत पर्यटन क्षेत्र

कोविड जागतिक महामारीमुळे स्थानिक, आंतरराराज्यीय, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारचा पर्यटनव्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णत: ठप्प आहे. पर्यटनक्षेत्रातील क्रूज, कॉपोर्रेट, साहसी पर्यटन, वारसास्थळे...

जीन एडिटिंगचे धोके

कोरोना विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून जन्माला आला हे अद्यापतरी पुराव्यानिशी सिद्ध झालेले नसले तरी या दाव्यात तथ्य नाही असे म्हणता येत नाही. या प्रकारामुळे...

मुंबईचा वाळवंटातील पहिला विजय

रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांच्या खडूस कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या १३व्या पर्वात अबूधाबी येथील पाचव्या सामन्यात बुधवारी कोलकता नाईट रायडर्स संघाचा ४९ धावांनी...

आर्थिक घसरण आणि पर्यावरण

अर्थव्यवस्था ऊर्जितावस्थेत असतानाच पर्यावरण संरक्षणाच्या चळवळी आणि अन्य प्रयत्न गतिमान असतात. अर्थव्यवस्था मंदावल्यानंतर लोक आत्मसंरक्षणाला प्राधान्य देतात आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष होते. सरकारला हे दोन...

मराठा आरक्षणासाठी आता कायदेशीर लढाई लढावी लागेल

दिनांक ९ जुलै २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत, हे प्रकरण स्वतंत्र खंडपीठाकडे सुनावणीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. मा.न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मागील एक...

षटकारांची आतषबाजी

शारजाच्या छोटया मैदानाचा फायदा घेत फलंदाजांनी केलेल्या षटकारांच्या आतषबाजीत रंगलेल्या आयपीएलच्या तेराव्या पर्वातील चौथ्या सामन्यात राजस्थानने तगड्या चेन्नई संघाचा १६ धावांनी पराभव केला. राजस्थानचा...

ही कोणती सामाजिक सुरक्षा?

आयुष्मान भारत योजनेच्या यशस्वितेचे ढोल-नगारे वाजवून मोदी सरकार असा प्रचार करीत आहे की, ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विम्याचे कवच विनामूल्य पुरविले...

जड झाले ‘ओझे’…

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्था सुमारे पंचवीस टक्क्यांनी आकुंचन पावली. मार्च महिन्यात लागू केलेला कडक लॉकडाऊन हे याचे मुख्य कारण ठरले. अंदाजे तीन...

कॉम्रेड विठ्ठल मोरे: पुरोगामी डावा विचार निखळला

शहीद भगतसिंग महाविद्यालय किल्लारी येथील ७ डिसेंबर २००४ रोजीची माझी मुलाखत अविस्मरणीय, वेगळे वळण देणारी ठरली. मुळातच किल्लारी गावची पहिलीच भेट कुतुहलाने, औत्सुक्याने भारावलेली...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....
1,264FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...